तरूणांमधील वाढती व्यसनाधिनता ही गंभीर बाब – प्रफुल्ला मोहिते यांचे प्रतिपादन

0

नाशिक  | व्यसनमुक्त समाज घडवणे हे सद्यस्थितीतील सर्वात मोठे आव्हान आहे. दुर्देवाने व्यवसधीनता कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडे पंधरा वर्षांची मुले देखील व्यसनाचा गर्तेत अडकले आहेत. तरुणाईत वाढती व्यसनधीनता ही गंभीर बाब, असल्याची खंत पुणे येथ्लृील ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती संस्थेच्या  संचालिका प्रफुल्ला मोहिते यांनी व्यक्त केली.

ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.कुर्तकोटी सभागृहात आयोजित लेखक तुमच्या भेटीला व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प प्रफुल्ला मोहिते यांनी गुंफले. ‘महिलांचे सबलीकरण : आर्थिक, भावनिक, शाररिक व वैचारीक’ या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्योती स्टोअर्सचे वसंत खैरनार, माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते उपस्थित होत्या.

मोहिते म्हणाल्या, पु.ल.देशपांडे यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही व्यसनमुक्तीचे कार्य हाती घेतले. ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्रात सद्यस्थितीत 150 पुरुष व 19 महिलांवर उपचार सुरु आहेत. माझे पती व्यसनी होते. संसार करताना अनेक यातना मी भोगल्या आहेत. मात्र, त्यात अडकून न पडता मी स्वत:ला सावरले. सोलपूरमध्ये महिला सुरक्षा समितीत काम केल्यामुळे पुरुष प्रधान संस्कृतीचे वाईट दर्शन मी अनुभवले आहेत.

त्यामुळे पुण्यात ‘मुक्तांगण’चे काम करताना आम्ही सहविचार सभेची स्थापना केली. व्यसनी पतीचे अत्याचार महिलांना सहन करावे लागतात. त्यामुळे महिलांची घुसमट तर होते. शिवाय शाररिक व मानसिक दृष्ट्या देखील त्याचे परिणाम होतात. सहविचार सेभेमुळे महिलांच्या अत्याचारांना वाचा फुटली.

स्त्रियांना जगण्याची आम्ही नवी उमेद दिली. हजारो वर्षांपासून स्त्री च्या मनावर पती हा परमेश्वर ही संकल्पना बिंबवण्यात आली आहे. ही भाकड कल्पना दूर करण्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केला. मात्र, दुर्देवाची बाब म्हणजे स्त्रिया स्वत: मध्ये बदल करायला तयार नाही. महिलांचे सबलीकरण करण्यासाठी विचारांची लढाई लढण्यासाठी तयार रहा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

*