Video : त्र्यंबकमध्ये साकारल्या जातायेत पर्यावरण पूरक गणेश मूर्ती; पाहा ग्राऊंड रिपोर्ट

0

देवयानी ढोन्नर |  सृष्टी गणेशच्या उक्रमातून पाण्यात सहज विरघळणारे नॉन टॉक्सिक गणेश मुर्ती उपलब्ध करण्यात आल्या आहेत. येथील भुषण थेटे, विनय ढेरगे यांनी या गणेशमुर्ती भक्तांसाठी वाजवी किमतीत विक्रीस ठेवल्या आहेत.

भुषण थेटे यांनी गणपती तयार करण्यासाठी लागणारी माती आणि रंग कसे तयार केले जातात याबाबत प्रक्रिया प्राजेक्टरच्या माध्यमातून पडद्यावर देखील दाखविली जाते.

बीज गणेश मूर्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे हा लाल व काळया मातीत तयार केलेला गणपती आहे. केवळ मुकुट हळदी पासूनरंग तयार करून रंगीत केलेल्या या गणेशमुर्तीच्या उदरात वनस्पती बी टाकण्यात आले आहेत.

विसर्जन करतांना कुंडीत थोडी माती घेऊन ही गणेशमुर्ती उभी ठेवायची नंतर पाण्याचीधार धरली की काही वेळात हि गणेशमुर्ती विरघळते. कालांतराने मुर्तीत असलेले बीज अंकुरतात आणि फळ अथवा फुल झाडांच्या स्वरूपात श्रीगणेश आपल्या सोबत कायम राहतो.

तसेच पर्यावरणाची विशेष काळजी घेत शाडुच्या मातीचे गणपती तयार करण्यास राज्याबाहेरून माती मागवावी लागते त्यावर मात करण्यासाठी लाल आणि काळी माती एकत्रकरून मुर्ती तयार करणे त्यावर डिंकाचा थरदेणे. तसेच रंग तयार करतांना हळद, अंबेहळद, कुंकु आदि पारंपारीक खडे रंग वापण्यात आले आहेत.

पुजा करतांना पाणीपडल्यास या रंगाचा ओघळ येवू नये म्हणूनत्यावर खळीचा कोट चढविण्यात आला आला आहे. या मुर्तींच्या किमती देखील वाजवी आहेत.

51 रूपयांपासून ते 500 रूपयांपर्यंतआकारा प्रमाणे हे इकोफंडली गणेश मुर्तीउपलबध्द आहेत. यांच्या विसर्जनानंतर कोणत्याही प्रकारे रंगाचे अथवा तेलाचे तवंगनिर्माण होत नाहीत.

सार्वजनीक मंडळांनीपुजेसाठी हे गणेश मूर्ती  घ्यावेत आणि उत्सव मुर्तीएक मेकांना देवाण घेवाण करावी आणि हा गणेश उत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा अशी  इच्छा येथील तरुणांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*