Photo Gallery : हिरवाईने नटला इगतपुरी, त्र्यंबक परिसर

0
नाशिक | नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी याठिकाणी दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. पावसाळ्यात त्र्यंबक व इगतपुरीतील डोंगराळ भागाला अनेक ठिकाणचे पर्यटक भेट देत असून याठिकाणी आता गर्दी वाढू लागली आहे.

सुट्टीचा दिवस बघून पर्यटकांचे जत्थे आता याठिकाणी जाऊन येथील हिरवाईचा आनंद घेत आहेत. सध्या या परिसरात भाताच्या आवणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकजण भात लागवडीचा आनंद घेतात तसेच फोटोशूट देखील करतांना दिसून येतात.

पावसाची रिपरिप तर कधी मुसळधार यामुळे येथील परिसराने हिरवी झालर पांघरली आहे. अनेकजन येथील मनोहारी दृश्ये बघून समाधानी होतात.

(सर्व फोटो : पंकज जोशी, देशदूत नाशिक)

LEAVE A REPLY

*