Video : डिजिटल आविष्कारातून ‘ते’ करतात हजारो द्राक्ष बागायतदारांची मदत

0
नाशिक | द्राक्षांची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. देशामध्ये सर्वात जास्त द्राक्षे नाशिक जिल्ह्यातून उत्पादित होतात. अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षशेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत अग्रो टुरिझमचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.

शेती या विषयात उच्चशिक्षणाची पदवी घेऊन आधुनिक शेतकरी घडविण्यासाठी सध्या प्रयत्न करत आहेत. सोशल मिडिया, मोबाईल अॅपच्या माध्यमातून ते थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधत असून शेतकऱ्यांना ऑनलाईन सल्ला मसलतदेखील देताना दिसून येतात.

नाशिक जिल्ह्यात मोबाईल अॅपच्या माध्यमातून आधुनिक शेतीची सुरुवात पीएस अग्रो ग्रुपचे संचालक सुनील जी. शिंदे यांनी केलेली दिसून येत आहे. त्यांनी ग्रेप मोबाईल अॅप मास्टर नावाचे एक मोबाईल अॅपची निर्मिती केली असून  आज हजारो शेतकरी या अपच्या माध्यमातून नाममात्र शुल्कात शेतीत येणाऱ्या समस्यांचे निराकरण करत आहेत.

द्राक्षावर खोडअळी, अर्धवट काडी पिकणे, करपा, झान्थोमोनस, केवडा(दाऊनी मिल्ड्यू), भुरी (Powdery Mildew), अशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. यामुळे सुनील जी. शिंदे यांनी मोबाईल अपच्या माध्यमातून प्रगती साधली आहे.

आज या मोबाईल अॅपचे दहा हजारापेक्षा अधिक युजर्स असून शेतात एखादी समस्या भेडसावत असेल तर या मोबाईल अॅपचे नाव घेतले जाते. शिंदे यु-ट्यूबच्या माध्यमातून व्हिडीओ तयार करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.

वाचा या आठवड्याचा द्राक्ष सल्ला : 

LEAVE A REPLY

*