द्राक्ष उत्पादकांनी आरोग्याची काळजी घ्यावी – डॉ. गोकुळ इंडाईत

0

नाशिक | द्राक्ष बागेस रासायनिक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. फवारणीदरम्यान काळजी न घेतल्यास रासायनिक औषधांचे अंश नाका तोंडावाटे पोटात शरीरात जाऊन आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी द्राक्षे उत्पादकांनी शेती करताना संरक्षक उपकरणांचा वापर करून आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला डॉ. गोकुळ इंडायित यांनी दिला.

ते नाशिकमधील द्राक्ष विज्ञान मंडळ आयोजित द्राक्ष पिक एप्रिल छाटणी आणि व्यवस्थापन चर्चासत्रात शेतकऱ्यांना संबोधित करत होते. याप्रसंगी अध्यक्ष डी.बी. मोगल, द्राक्ष तज्ञ मंगेश भास्कर, एन.डी. पाटील, सुनील शिंदे आदींची उपस्थिती होती.

द्राक्ष तज्ञ मंगेश भास्कर म्हणाले की, द्राक्ष उत्पादकांनी एप्रिल छातानीत काडी व्यवस्थापन व अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास ऑक्टोबर छातानीत हमखास दर्जेदार उत्पादन मिळेल.

त्यानंतर एन.डी. पाटील यांनी सांगितले की, जमिनीत सेंद्रिय कर्ब उत्तम ठेवले तर दिलेली खते व अन्नद्रव्ये द्राक्षे वेलीस उपयुक्त ठरतील व शेतकऱ्यांना पाणी नियोजन याबाबत माहिती दिली.

द्राक्षवेलीवर मर्यादित कडी संख्या ठेवून वेली अन्नद्रव्ये व्यवस्थापन सुयोग्य केल्यास ऑक्टोबर छातानीत द्राक्षे घड निर्मिती जोमदार होईल असे सुनील शिंदे यांनी सांगितले.

प्रारंभी कार्यक्रमाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आला. याप्रसंगी सेल्फी विथ ग्रेप्स स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक आयोजक डॉ. वसंत ढिकले यांनी केले. चर्चासत्रासाठी नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यातील द्राक्ष बागायितदार शेतकरी उपस्थित होते.
युवा द्राक्ष बागायितदारांनी द्राक्ष विज्ञान मंडळाच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करून दर्जेदार उत्पादन घेण्याकडे वळावे. या प्रयोगाची सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार केल्यास असंख्य शेतकरी जोडले जातील. दर्जेदार उत्पादन मिळेल यातून द्राक्ष शेतीत क्रांती घडून येईल. 
– डी. बी. मोगल, अध्यक्ष 

LEAVE A REPLY

*