Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कार अपघातात द्राक्ष निर्यातदार ठार

Share

पंचवटी | वार्ताहर

रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला वाचविताना पिंपळगाव बसवंत कडून नाशिककडे येणाऱ्या वाहन उड्डाणपुलावरून खाली पडून झालेल्या अपघातात चालक ठार झाला आहे. घटनेनंतर याठिकाणी काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

शनिवार (दि. ६) रोजी वरून साहेबराव गायकवाड वय.३५ रा. पालखेड, ता. दिंडोरी हे आपली कार क्रमांक एम एच १५ एफ झेड ३००१ या वाहनाने पिंपळगाव बसवंतकडून नाशिकच्या दिशेने येत असताना सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास आडगाव येथील उड्डाण पुलावर त्यांच्या गाडीसमोर अचानक एका व्यक्तीने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वरून याने आपल्या गाडीचे हँडब्रेक ओढून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र, पावसाने रस्ता निसरडा झाला असल्याने वाहन थेट उड्डाणपुलावरून खाली रस्त्यावर येऊन पडल्याने झालेल्या अपघातात वरून गायकवाड यांचा मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्नालयात पाठविले. तसेच रस्त्यात पडलेले अपघातग्रस्त वाहन बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!