Type to search

‘ग्रेप काऊंटी रिसॉर्ट’ला शासनाचा वसुंधरा पुरस्कार

नाशिक

‘ग्रेप काऊंटी रिसॉर्ट’ला शासनाचा वसुंधरा पुरस्कार

Share

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांचे ‘वसुंधरा-2019’चे पुरस्कार जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जाहीर झाले आहेत. यावेळी व्यावसायिक वर्गातील पुरस्काराचा मान नाशिकमधील पंचतारांकित मानांकन असलेले ‘ग्रेप काऊंटी रिसॉर्ट’ला मिळाला आहे.

राज्यात तसेच विविध शहरांत प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पर्यावरणावर बर्‍याच संस्था, कार्पोरेट कंपनी, व्यक्ती काम करीत असतात. याद्वारे वेगवेगळ्या गटामध्ये उत्कृष्ट काम करणार्‍या संस्थांना महाराष्ट्र शासनाद्वारे पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येत असते.

यावेळी व्यावसायिक वर्गातील पुरस्काराचा मान नाशिकमधील पंचतारांकित मानांकन असलेले ग्रेप काऊंटी रिसॉर्ट यांना मिळालेला असून सदरचा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार ग्रेप काऊंटी रिसॉर्टचे संचालक किरण चव्हाण यांनी स्वीकारला.

ग्रेप काऊंटी रिसॉर्टमध्ये 33 हजारांपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत. सोलर पॅनल सिस्टमचा वापर केलेला आहे. ज्यामुळे 30 टक्के विजेची बचत होते. रेन वाटॅर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे.

ज्यामुळे 14 कोटी लिटर पाण्याचा साठा होते. त्यामुळे संपूर्ण रिसॉर्टमध्ये असलेले हिरवेगार सौंदर्य टिकवण्यात मोठी मदत होते. त्यानंतर रिसॉर्टचे किचनमधून निघणार्‍या टाकाऊ अन्नपदार्थांच्या कचर्‍यापासून खत तयार करून तेच खत झाडांना वापरण्यात येते आणि वेस्ट पाण्याचे नियोजनदेखील उत्कृष्ट पद्धतीने केलेले आहे व ह्याच सर्व बाबींचा बोेध घेत ग्रेप काऊंटी रिसॉर्टला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ‘वसुंधरा-2019’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!