ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन

0

वरीष्ठ अधिकार्‍यांकडून पिळवणुकीचा आरोप

कर्जत (प्रतिनिधी)- पंचायत समितीच्या ग्रामंपचायत विभागाच्या 3 विस्तार आधिकांर्‍याच्या जाचाला कंटाळून आज बुधवार (दि.2) सकाळी 10 वाजल्यापासून कर्जत तालुक्यातील सर्व 70 ग्रामसेवक बेमुदत संपावर गेले आहे. काम बंद ठेवून ग्रामसेवकानी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यामुळे 91 ग्रामपंचायतीचे कामकाज आज दिवसभर बंद होते.
कर्जत पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीचे वरीष्ठ अधिकार्‍यांमार्फत ग्रामसेवकांना दफ्तर तपासणीच्या नावाखाली पिळवणूक करीत असल्याचा आरोप करून तालुक्यातील ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन केले. यासंदर्भात गटविकास अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. या त्रासामुळे तालुक्यात विकास कामावर परीणाम झाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांवर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात करावी, अन्यथा तोपर्यत पंचायत समितीच्या मासीक व पाक्षीक मिटींगला न बसता निशेष म्हणून बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामसेवकांनी दिला आहे.
यावेळी पंचायत समितीसमोर संघटनेचे तालुका अध्यक्ष कैलास तरटे, तात्यासाहेब ढोबे, वर्शा थोरात, आशा तापकीर, शितल तापकीर, अमोल बरबडे, अंकुश वेताळ, एम. पी शेख, के. बी. अंधारे, आर. जी शेलार, बी. जी शिंदे, व्ही. के बरबडे, एम. व्ही घेरडे, ए. ए. आटोळे, ए. जी. बदे, डी.एम रायकर, डी. आर. राउत, ए. ए भोईटे, ए. एस मुळे, एल. के गदादे, ए. टी मनोहर, ए. आर. केसकर, एम.एल माने, डी. बी आजबे, आर. सी धनवडे, एस. व्ही मिसाळ, बी. डी गलांडे, एस.ए. मोकाशी, एल. एस मोहिते, व्ही. के शेटे, जी. आर शेटे, जी. ए शेजाळ, एस. एस भोसले, श्रीमती आर. बी. कदम, व्ही. डी कवळे यांच्यासह ग्रामसेवक हजर होते.

LEAVE A REPLY

*