गुंडगिरीच्या निषेधार्थ सात्रळला ग्रामस्थांची सभा

0
सात्रळ (वार्ताहर) – राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील गुंडगिरी, चोरी, छेडछाड आदी घटनांच्या निषेधार्थ खंडोबा मंदिर येथे सात्रळ, सोनगाव, धानोरे या गावांतील ज्येष्ठ नागरिक, राजकीय, सामाजिक व तिन्ही गावांतील तरुणांची सभा पार पडली. यावेळी ग्रामस्थांनी गुंडगिरीचा निषेध केला.
अंकित गोविंद आसावा यांच्या दुकानाची शेडची जाळी कापून माल चोरून नेणार्‍या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले होते. परंतु आरोपी जामिनावर सुटून आल्यावर अंकित आसावा व त्यांचे मेहुणे योगेश गिते यांना जबरदस्त मारहाण झाली. या घटनेच्या निषेधार्थ बैठक पार पडली.
बैठकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू म्हणाले, गुन्हेगारांना कुठल्याही प्रकारची जात नसते. चोरी करणे हीच त्यांची जात व धर्म असतो. अशा कुठल्याही प्रकाराला गावकर्‍यांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्या गावकर्‍यांनी भविष्यात एकत्र येऊन अशा प्रवृत्तीचा विरोध करावा. जि. प. चे माजी सदस्य सुखदेव ताठे म्हणाले, अशा प्रवृत्तीचा विरोध परिसरातील तरुणांनी केला पाहिजे. संपूर्ण गाव तरुणांच्या पाठीशी उभे राहील. पोलीस यंत्रणा जर त्यांचे काम योग्य पद्धतीने करीत नसतील तर आपण कायदा हातात घेण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
सात्रळचे उपसरपंच गणेश कडू म्हणाले, गावाने गुन्हेगारीचा त्रास फार सहन केला. परंतु येथून पुढे तो खपून घेतला जाणार नाही. भविष्यात सात्रळ, सोनगाव, धानोरे बंद ठेवून निषेध पाळण्यात येणार आहे. असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
यावेळी प्रतापराव कडू, अनिल लोढा, संजय नागरे, संतोष पलघडमल, नाजीम इनामदार, मुन्ना इनामदार, सर्जेराव शिंदे, पंकज कडू, ज्ञानदेव गिते, सोमनाथ वाघचौरे, अविनाश नालकर, हंबीर कडू, योगेश चोरमुंगे, अ‍ॅड. विजयराव कडू, संजय पलघडमल, योगेश गिते, अजित जोर्वेकर, सखाहरी पलघडमल, शिवाजी डुक्रे, बलराज डुक्रे आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*