Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

राज्यातील ग्रामसभांवर प्रतिबंध

Share
राज्यातील ग्रामसभांवर  प्रतिबंध gramsabha, restriction

संगमनेर (वार्ताहर) – महाराष्ट्र शासनाने कोरोनो संदर्भात माहिती देण्यासाठी ग्रामपातळीवर दर आठवड्याला ग्रामसभा घेण्याचे आदेशित केले होते. मात्र आता नव्याने राज्याच्या ग्रामविकास विभागाने सदरचे परिपत्रक मागे घेतले असून यापुढे ग्रामसभा न घेण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाने संपूर्ण राज्यभर संचारबंदी जारी केली असल्यामुळे यापुढे लोकांना एकत्र करणारे ग्रामसभेसारखी बैठक घेण्यात येणार नाही.

त्याऐवजी धोरणाच्या प्रादुर्भावा संदर्भात जागृती करण्यासाठी ग्रामस्तरावर भित्तीपत्रक वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गावातील रस्ते, नाले नियमित स्वच्छ ठेवण्यात यावेत. तसेच जनतेला व्यक्तिगत स्वच्छतेसंदर्भात आवाहन करण्यात यावे .वेळेवर हात धुणे. त्यासाठी साधनाचा उपयोग करणे .गावातील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, मलनिःसारण व्यवस्थापन, रोगराई पसरू नये म्हणून करावयाच्या फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गावात शहरातून कोणी व्यक्ती आल्यास अथवा गावातील कोणी व्यक्ती आजारी पडल्यास तात्काळ डॉक्टर ,वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान राज्य ग्रामसेवक संघटनांनी ग्रामपातळीवरील वसुली दरमहा होणाऱ्या मासिक बैठका ,विविध उपकराची वसुली, ग्रामपंचायती च्या  सुरू असणाऱ्या कामांच्या मुदतीत वाढ करून देण्याची मागणी करणारे निवेदन स्थानिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!