पुणतांब्याच्या ग्रामसभेत पदाधिकारी व अधिकार्‍यांची गैरहजेरी

0

ग्रामपंचायत कारभाराबाबत तक्रारींचा पाढा

पुणतांबा (वार्ताहर)- पुणतांबा ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेस सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य सरकारी अधिकार्‍यांनी पाठ फिरविल्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला अखेर नामदेव धनवटे व बाळासाहेब चव्हाण यांनी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा ठराव मांडला ग्रामस्थांनी सर्वानुमते ठराव संमत केल्यानंतर ग्रामसभेचे कामकाज सुरळीत सुरू झाले.
ग्रामसचिवालयाच्या सभागृहात उपसरपंच प्रशांत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणतांबा विकास आघाडीचे संस्थापक धनजय जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.धनंजय धनवटे, जि.प. सदस्य श्याम माळी, प्राणिल शिंदे, शुकलेश्वर वहाडणे, बाळासाहेब चव्हाण, सुभाषराव वहाडणे, अमोल सराळकर, काशीनाथ धनवटे, साहेबराव बनकर, सोपानराव शिंदे, प्रा. बखळे, भाऊसाहेब केरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसेवक सोमनाथ पटाईत यांनी विषयवाचन केले.तसेच महात्मा गांधी जयंतीनिमित ग्रामस्वच्छता अभियान पंधरवाडा पाळण्यात येणार असून ग्रामस्थ सेवाभावी संस्था यांनी स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन केले स्वच्छता अभियानाचा विषय निघताच अनेक ग्रामस्थांनी गावातील गटार व्यवस्था रस्ते तसेच इतर मूलभूत सेवा सुविधांबाबत तक्रारींचा पाढाच वाचला.
इंदिरानगर भागातील गटार व्यवस्थेबाबत त्या भागातील ग्रामस्थांनी ग्रामसेवकांना चांगलेच धारेवर धरले 14 व्या वित आयोगाचा निधी आल्यानंतर कामे मार्गी लागतील असे ग्रामसेवक व उपसरपंचांनी स्पष्ट केले. घरकुलाचा विषय निघताच गावातील घरकुलांची चौकशी व्हावी काही घरकुलात भाडेकरू राहतात असा आरोप अनेक ग्रामस्थांनी केला.
डॉ. धनवटे यांनी ग्रामपंचायत कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. एकात्मिक पाणलोट क्षेत्र व महात्मा फुले जल आभियानामार्फत परिसरात राबविण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या यादीचे वाचन करण्यात आले. प्रशांत वाघ यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

*