ग्रामसेवक बदलीच्या मागणीवरुन बेलपिंपळगाव ग्रामसभेत गदारोळ

0
बेलपिंपळगाव (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ग्रामसभेत अनेक ग्रामस्थांनी उठून ग्रामसेवकांची बदली करा असे म्हणत आरडाओरडा केल्याने गदारोळ झाला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. शारदा बापू औटी होत्या.
सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना निकष वाचून दाखवण्यात आले तसेच गावातील या योजनेत बसलेल्या शेतकर्‍यांची नावे वाचण्यात आली.
ग्रामविकास अधिकारी पी. के. वरखडे यांनी मागील सभेत झालेल्या विषयांवरील कार्यवाहीची माहिती दिली. आज मात्र ग्रामसभा वादळी झाली अनेक घरकुल लाभार्थिंना जागा उपलब्ध नाही म्हणून कामे सुरू केली नाहीत. त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात यावी मागणी करण्यात आली. आहे त्या जागेवर बांधकाम करून घ्यावे अशी मागणी अनेक लाभार्थी यांनी केली
अनेक अधिकारी आज ग्रामसभेला हजर नव्हते. अनेक वेळा सांगून देखील काही अधिकारी जाणूनबुजून ग्रामसभेला हजेरी लावत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
ग्रामसेवक श्री. वरखडे यांची आठ दिवसांत बदली करावी या मागणीसाठी अनेक ग्रामस्थांनी आवाज उठवला. गावातील अनेक समस्या आहे. त्या दुरुस्ती करणे आवश्यक आहे पण ग्रामसेवक जाणूनबुजून गावाला त्रास देत आहे अशी अनेकांनी नाराजी व्यक्त केली. गावातील अनेक रस्ते विकास कामे बाकी आहेत ती कामे दिवाळीपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही सरपंच यांनी दिली.
गावात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली आहे त्यातून गटारीचे पाणी जाऊन तेच पाणी गावातील नळाद्वारे येते ती दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गावात कुठेही स्वच्छता अभियान राबविण्यात आले नाही. त्यामुळे अनेक नागरिकांनी ग्रामसेवकांना धारेवर धरले. अनेक वाडीवस्तीवर अक्षयप्रकाशचे काम बाकी आहे ते दिवाळीआधी पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
गावात एकतरी स्वच्छतागृह (मुतारी) बांधावे अशी मागण्ी करण्यात आली. जुन्या बाजारतळावर अंतर्गत गटारी केल्या आहेत पण त्यावर झाकण नसल्याने ग्रामस्थ त्यात पडले. त्यामुळे या गटारींच्या ड्रेनेज वॉलचे काम तात्काळ करून घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
पीक विमा मिळावा, मागील मंजूर दुष्काळ निधी दिवाळीपूर्वी खात्यात जमा व्हावा नाहीतर अनेक नागरिक उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला.अशा अनेक गोष्टींमुळे ग्रामसभा वादळी झाली.
यावेळी मुक्ता राऊत, उषा शिंदे, संभाजी शिंदे, दीपक चौगुले, किशोर बोखारे, कृषी अधिकारी श्री. गायके, तलाठी श्री. आव्हाड, बाळासाहेब शिंदे, सुभाष साठे, चंद्रशेखर गटकळ, सुखदेव कदम, दत्तात्रय राऊत, गणेश चौगुले, बापू औटी, सखाराम कांगुणे, विजय गोसावी, बाबासाहेब गटकळ, वसंत रोटे, वसंत शेरकर, दिगंबर कांगुणे, संजय साठे, श्रीकांत भांगे, अशोक कनगरे, रमेश गटकळ,
दत्तात्रय साठे, हर्षवर्धन शिंदे, भीमराज साठे, योगेश शिंदे, सोमनाथ सरोदे, कृष्णा शिंदे, संजय शिंदे, रावसाहेब गायकवाड, अशोक शिंदे, विलास सरोदे, अप्पासाहेब रोटे, मुमताज सय्यद, दिगंबर धीर्डे, अशोक कांबळे, बाळासाहेब शेंडगे, बाळासाहेब साठे, अरुण वरघुडे, प्रा किशोर गटकळ, प्रा. अमीन सय्यद, विष्णूपंत शिरसाठ यांच्यासह ग्रामस्थ हजर होते.

 

LEAVE A REPLY

*