173 गावांत ग्रामसभा तहकूब, 159 गावांत ग्रामसभा घेण्याचा आदेश पायदळी

0

गांधी जयंती 

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील प्रत्येक गावात 2 ऑक्टोबरला ग्रामसभा घेण्याचे आदेश जिल्हा परिषद पातळीवरून देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 1 हजार 311 ग्रामपंचायतीमध्ये तब्बल 159 गावांत ग्रामसभा झाल्याच नाहीत. तर 173 ठिकाणी सभा होऊन त्या वेगवेगळ्या कारणामुळे तहकूब करण्यात आल्या. यात बहुतेक ठिकाणी सभेसाठी आवश्यक गणपूर्ती झालीच नाही.
2 ऑक्टोबरला होणार्‍या ग्रामसभांसाठी जिल्हा परिषद पातळीवरून ग्रामपंचायतींना ग्रामसभेचे आदेश देण्यात आले होते. या आदेशात त्यादिवशी विषय पत्रिकेवर कोणते विषय घ्यावेत याचा मसूदाही देण्यात आला होता. मात्र, जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्याकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही.
दरवर्षी प्रत्येक ग्रामपंचयातींमध्ये 4 ग्रामसभा बंधनकारक आहेत. मात्र, यंदा 205 गावांत ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून निवडणुकीची आचारसंहिता होती. मात्र, आचारसंहिता असणार्‍या गावात अधिकार्‍यांना ग्रामसभा घेता येत होती आणि नियोजित कार्यक्रमांबाबत निर्णय घेता येत होते.
प्रत्यक्षात तसे झालेले दिसत नाही. जिल्ह्यात 229 गावात ग्रामसभांचे व्हिडीओ चित्रिकरण झाले नाही. ग्रामसभांमध्ये वाढलेल्या वादामुळे ग्रामसेवक युनियनच्यावतीने यापुढे ग्रामसभेला पोलीस संरक्षण मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी ग्रामसेवक उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे ग्रामसभांचे भवितव्य अंधारात आहे.

तालुकानिहाय तहकूब ग्रामसभा –
अकोले 7, संगमनेर 1, कोपरगाव 40 राहुरी 20, राहाता 10, श्रीरामपूर 8, नेवासा 19, शेवगाव 8, पाथर्डी 4, कर्जत 9, नगर 47 यांचा समावेश आहे. श्रीगांेंदा, पारनेर, जामखेड या तालुक्यात एकाही ठिकाणी ग्रामसभा तहकूब झालेली नाही. 

LEAVE A REPLY

*