कर्जत तालुक्यामध्ये 92 टक्के मतदान

0
कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या सरंपच व सदस्य निवडीसाठी आज 91 टक्के मतदान झाले यामध्ये सरंपच पदाच्या 48 तर सदस्यासाठी 239 उमेदवरांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
थेट जनतेमधुन संरपच निवड होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वत्र मोठी उत्सकता व तेवढीच चुरस दिसून आली. आज सकाळी कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायती साठी आज मतदान झाले. मतदान सुरू होताच अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या उमेदवार आणण्यासाठी वाहणांचा वापर करण्यात येत होता.
बोहरगावी असलेले मतदार खास आणण्यात आले होते. वृद्व अपंग व्यक्तीचा मतदानाचा हक्क बजावण्यात आला.काही ठिकाणी किरकोळ बाचाबाचीच्या प्रकार वगळता षांततेने मतदान झाले.तालुक्यात सर्वात कमी मतदान अळसुंदे यथे 85.97 टक्के, तर सर्वात जास्त निंबे येथे 96.25 टक्के झाले.
कर्जत तालुक्यात खालील प्रमाणे झालेले मतदान: कोपर्डी 94.15, अळसुंदे 85.97, बहिरोबावाडी 92.10, कापरेवाडी 91.65, म्हाळंगी 92.85, मुळेवाडी 91.77, कौडाणे 90.71, निंबे 96.25.
ग्रामपंचायतीचे सरपंचपद यावेळी प्रथमच जनतेतून निवडले जाणार असल्यामुळे सर्वच गावातील प्रमुख नेत्यानी या पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती यावेळी ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये खर्चाचे रेकॉर्ड मोडले गले आहे.
निवडणूकीसाठी सर्वत्र कडक बंदोबस्त उपविभागीय पोलीस आधिकारी सुदर्षन मुंडे याच्या मार्गदर्षना खाली पोलीस निरीक्षक वंसत भोये यांनी ठेवला होता. सोमवारी दिनांक 9 रोजी कर्जत तहसील कार्यालयामध्ये मतमोजणी होणार आह

LEAVE A REPLY

*