गाव आमदारांचे भवितव्य मशिन बंद!

0

82.71%  मतदान, 195 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतमोजणी 

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतींसाठी शनिवारी 82.71 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली. सोमवारी सकाळी 10 वाजेपासून तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. प्रथमच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होत असल्याने मतदार राजाने कौल कोणाच्या बाजुने दिला याची उत्सुकता वाढली आहे. अनेक ठिकाणी चुरसीच्या लढती होत असून काही ठिकाणी मातब्बर नेत्यांच्या समर्थकांनी एकमेकांना आव्हान दिले आहे.

जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतींमधील 1 हजार 591 सदस्य पदासाठी निवडणूका लढलेल्या 3 हजार 550 उमेदवारांचे भवितव्य शनिवारी इलेक्ट्रान मशीनमध्ये कैद झाले. नोंव्हेंबर महिन्यांत 205 ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी निवडणूका जाहिर केल्या होत्या. निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमदेवारी अर्ज माघारीपर्यंत 10 सरपंचपदाच्या आणि 15 सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या होत्या.

शनिवारी 195 ग्रामपंचाायतींसाठी शनिवारी मतदान झाले. पहिल्यांदा जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगले तापले होते. यंदा निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ केली आहे. यात सरपंचपदासाठीच्या उमेदवारांना 50 हजार ते पावणेदोन लाख रुपयांपर्यंतची खर्च मर्यादा होती. मात्र, उमदेवारांनी मोठ्या प्रमाणात दिवाळी आधीच मत खरेदी केली यात अनेक मतदारांची चंगळ झाली अशी चर्चा दिवसभर होती.

दरम्यान, शनिवारी सकाळी 195 ग्रामपंचायतींसाठी शांततापूर्ण परिस्थितीत मतदानाला सुरू झाली आहे. काही तालुक्यात सकाळी मतदानाला उत्साह होता. तर काही ठिकाणी मतदान धिम्यागतीने सुरू होते. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनूसार सकाळी सोडेनऊपर्यंत 14 टक्के, साडे अकरापर्यंत 32 टक्के, दुपारी 4 पर्यंत 70 टक्के आणि सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 82.71 टक्के मतदानांची टक्केवारी नोंदवली गेली.

195 ग्रामपंचायतमध्ये 4 लाख 44 हजार 980 मतदार होते. यातील 1 लाख 95 हजार पुरुष आणि 1 लाख 72 हजार महिला अशा 3 लाख 68 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 82.71 टक्के झाली. आता प्रत्येक तालुक्यातील मतदान यंत्र सील करून त्या-या तालुक्याच्या ठिकाणी स्टाँग रुम ठेवण्यात येणार आहेत.

सामेवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून त्यांतर लगेच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यंदापासून निवडून येणार्‍या सरपंच आणि सदस्य यांना निवडणूक शाखेतर्फे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
………….
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्या-तालुक्यातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येत्या वर्षभरात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आप-आपल्या तालुक्यात काय राजकीय परिस्थिती राहू शकते, याची चाचणी या निमित्ताने तालुक्याच्या नेत्यांना घेता येणार आहे.
…………..
केवळ संरपंचपदासाठी मतदान झालेल्या ग्रामपंचायती संगमनेर- चिकणी, वडझारी, जांभुळवाडी.
नेवासा – सुरेशनगर.
श्रीगोंदा – बनपिंप्री.
…………..

अकोले –
73.15 पावसामुळे मतदारांची तारांबळ
शिळवंडी ग्रामपंचायत आधीच बिनविरोध

 संगमनेर –  81.11, मतदारयादीत तफावत, घुलवाडीत संताप
ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रथमच वापर

कोपरगाव – 81.74, मातब्बरांच्या कार्यकर्त्यांत कुरबुुरी
सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर रांगा

श्रीरामपूर – 84.69, वांगी खुर्दला सर्वाधिक मतदान, पाच ग्रामपंचायत
सत्तेसाठी झुंज

राहाता – 85.16, सकाळपासून मतदानासाठी गर्दी, नपावाडी येथे दोन गटात बाचाबाची

राहुरी – 85.04, सकाळपासून मतदानासाठी गर्दी, कोंढवड,
ताहराबाद येथे दोन गटात वाद

नेवासा85.37नेत्यांसाठी निकाल प्रतिष्ठेचा , नगर 84.96अपवाद वगळता शांतता, पारनेर 84.05समर्थकांच्या विजयासाठी नेत्यांनी लावला जोर, पाथर्डी 75.65दुपारनंतर मतदान केंद्रांवर वाढली गर्दी,शेवगाव 81.04पहिल्या टप्प्यात जोरदार मतदान, कर्जत 91.11खर्चाने
मोडले
आजवरचे रेकॉर्ड, 
जामखेड 85.34मतदार बाहेर काढताना कार्यकर्त्यांची दमछाक,  श्रीगोंदा 82.40,मतदारांचा प्रतिसाद, निकालाची उत्सुकता

 

 

तालुकानिहाय मतदान (टक्केवारी)
अकोले 73.15, संगमनेर 81.11, कोपरगाव 81.74, श्रीरामपुर 84.69, राहाता 85.16, राहुरी 85.4 , नेवासा 85.37, नगर 84.96, पारनरे 84.5, पाथर्डी 75.65, शेवगाव 81.04, कर्जत 91.11, जामखेड 85.34, श्रीगोंदा 82.40 एकूण 82.71.
……………
तालुनिहाय स्थिती
अकोले : पावसाने मतदारांची तारांबळ
संगमनेर : घुलेवाडीत मतदार यादीत घोळ
श्रीरामपूर: शांतते मतदान प्रक्रिया पूर्ण
नेवासा : गडाख- मुरकुटे यांची प्रतिष्ठापणाला
कोपरगाव : सायंकाळी उशीरापर्यंत मतदारांच्या रांगा
राहुरी : कोंढवड, ताराबाद वगळता मतदान शांततेत
राहाता : साकुरीतील एका बुथवरील मतदान यंत्र बंद
नगर : सारोळा, सोनेवाडी, नारायण डोहला तणाव
पाथर्डी : भालगाव, कोल्हार, तिसगावमध्ये पोलीस बंदोबस्त
श्रीगोंदा : मतदान प्रक्रिया शांततेत
शेवगाव : दिग्ग्जची राजकीय प्रतिष्ठपणाला
कर्जत : रांगा लावत मतदारांचा मतदानाला प्रतिसाद
जामखेड : तीन ग्रामपंचायतींसाठी चूरशीत मतदान
पारनेर : भाळवणीत अटी-तटीची लढत

 

LEAVE A REPLY

*