Tuesday, April 23, 2024
Homeनगरश्रीरामपूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी; कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

श्रीरामपूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी; कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

कोविड 19 या संसर्गजन्य आजाराने लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा पहिला टप्पा 15 जानेवारी रोजी पार पडत आहे. त्यात

- Advertisement -

तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून त्याकरिता नियुक्त केलेल्या प्रशिक्षणार्थी कर्मचार्‍यांना नुकतेच प्रशिक्षण दिले गेले.

निवडणूक कामी विविध खातेतील कर्मचारी नियुक्त केले आहेत. केंद्राध्यक्ष,मतदान कर्मचारी यांना निवडणुकीसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक यंत्राचे प्रशिक्षण देताना शहरातील खासदार गोविंदराव आदिक सभागृहामध्ये तहसीलदार प्रशांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. कर्मचार्‍यांना अधिकची माहिती होण्यासाठी आणि सराव होणेसाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत याठिकाणी या निवडणूक कामाकरिता नियुक्त केलेले प्रत्येक केंद्राचे केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी क्रमांक 1 यांना ईव्हीएम यंत्राचे प्रशिक्षण देण्याची सुविधा केली आहे.

याकामी प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार तथा या ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक गोवर्धने, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार अशोक उगले यांचे मार्गदर्शनाखाली शासकीय तंत्रनिकेतन संस्थान निदेशक जितेंद्र भगत, पुरुषोत्तम चौधरी हे काम करत आहेत. या कामी श्रीधर बेलसरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे .त्यांना शकील बागवान, संदीप पाळंदे, अवधूत कुलकर्णी, असलम शेख हे प्रशिक्षणात उत्तम सहकार्य करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या