श्रीगोंदा : घोगरगावात भोस व बेलवंडीत शेलारांना धक्का; पाचपुतेंनी काष्टी राखली

0
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये माजी मंत्री बबनराव पाचपुते गटाने काष्टीमध्ये सत्ता ताब्यात ठेवली तर, बेलवंडीमध्ये जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अण्णांसाहेब शेलार यांच्या सरपंच पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला.
तिथे पाचपुते गटाचे सरपंच निवडणूक आले आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्या घोगरगावमध्येही भोस गटाला पराभवाला सामोरे जावे लागले. तिथे आमदार जगताप गटाचे उगले सरपंचपदी निवडून आले. पारगाव सुद्रिक मध्येही पाचपुते गटाचे सर्वाधिक सदस्य निवडून आले मात्र नागवडे, जगताप गटाचे बोडखे सरपंचपदी निवडून आले.
तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालयात झाली. यामध्ये दहा पैकी तीन ग्रामपंचायतींमध्ये पाचपुते गटाचे सरपंच झाले. उर्वरित सात ग्रामपंचायती मध्ये आ. राहुल जगताप, आ. अरुणकाका जगताप यांच्यासह नागवडे गटाची सत्ता आली.
बेलवंडीत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार गटाला धक्का देत पाचपुते गटाच्या सुप्रिया पवार सरपंचपदी निवडून आल्या तिथे पाचपुते गटाला सहा जागा तर शेलार गटाला अकरा जागा मिळाल्या. काष्टीत माजी मंत्री पाचपुते गटाच्या सुलोचना वाघ निवडून आल्या. तिथे विरोधी जगताप- नागवडे गटाला चार जागा मिळाल्या. घोगरगाव मध्ये भोस गटाला पराभवाला सामोरे जावे लागले. तिथे जगताप गटाचे सरपंच निवडून आले. तांदळी दुमालामध्येही आ. जगताप गटाने बाजी मारली. तर माठ मध्ये नागवडे-पाचपुते गटाला सरपंचपद व सात जागा मिळाल्या. पारगाव सुद्रिक मध्ये सरपंच नागवडे, जगताप गटाचे तर सर्वाधिक सदस्य पाचपुते गटाचे निवडून आले.
घोगरगाव- सरपंचपदी बाळासाहेब बापूराव उगले यांना 1619 मते मिळवून विजयी झाले.
विरोधी दिलीपराव बाबुराव भोस यांना 1104 मते पडली. सदस्यपदाचे उमेदवार व त्यांना मिळालेली मते – सुरेश उत्तम तरटे- 373 (विजयी), शरद संपत तरटे- 304, नितीन पंढरीनाथ उगले- 455 (विजयी), बेरड कानिफनाथ सीताराम-229, तरटे सोंडे राजेंद्र 396 (विजयी), तरटे मीना गोपीनाथ 285, उगले सोमीनाथ उद्धव 335 (विजयी), शेख निसार नुसा 236, मोरे स्वाती अरुण 267, शेख हसीना कमाल 287 (विजयी), घोलवड मारुती किसन 360, चारुडे राहुल संभाजी 378 (विजयी), शिंदे आशाबाई बाळकृष्ण 366 (विजयी), शिंदे शैला दीपक 365, बोरुडे मंगल संतोष 366 (विजयी), बोरुडे सिंधूबाई लक्ष्मण- 363, उल्हारे सुदाम दगडू 370 (विजयी), उल्हारे संदीपान चंद्रभान 356, भोसले सुजाता मिलिंद 367(विजयी) भोसले शिबिका बापूसाहेब 60, गारुडकर अनिता दिगंबर 403 (विजयी), बोरुडे मीना रमेश 216.
चवरसांगवी- सरपंचपदी गावडे जगन्नाथ बापूराव हे 115 मते मिळून विजयी झाले. तर विरोधी उंदरे कानिफ किसन 107, घोलवड सुभाष बापूराव 9. सदस्यपदाचे उमेदवार व मते- घोलवाड विलास बाबू 70 (विजयी), घोलवाड नवनाथ बापू 22. गावडे सुनील नानाभाऊ 28, घोंगडे सतीष गंगाराम 43 (विजयी), माळशिखरे सविता दादासाहेब 28, पवार अरुणाबाई बाबासाहेब 42 (विजयी), बिनविरोध उमेदवार- पवार साखराबाई बबन, हिंगे घनश्याम बन्सी, उंदरे राणी संतोष, खडसे रखमाबाई जिजाबा.
बनपिंप्री- सरपंचपदी पठारे भाऊसाहेब शाहूराव हे 548 मते मिळवून विजयी झाले तर विरोधी पठारे नितीन भागचंद यांना 540 मते पडली. बिनविरोध उमेदवार- वाबळे सचिन कानिफ, जगताप सविता अनिल, कदम जनाबाई लहू, पठारे सुभाष दगडू, जगताप चैताली नानासाहेब, पठारे अलका गोरख, पठारे रवींद्र बाबासाहेब, पठारे किरण प्रकाश अशी आहेत. एका जागेसाठी उमेदवार न मिळाल्यामुळे ती रिक्त राहिली आहे.
तांदळी- सरपंचपदी निगडे अनिता संजय हे 1231 मते मिळवून विजयी झाले तर विरोधी भोस सुनंदा टिळक यांना 167 व शेळके मंदाबाई बापूसाहेब यांना 677 मते मिळाली. सदस्य पदाचे उमेदवार व मिळालेली मते- काळेवाघ राजू श्रावण 367 (विजयी), शिंदे कैलास भानुदास 227, शिंदे दादा लक्ष्मण 12, बुणगे शारदा विठ्ठल 392 (विजयी), बुणगे शोभा पोपट 214, भोस आशा नरसिंग 354 (विजयी), शेळके शोभा शांताराम 240, अजय सुनील शेळके 52, धालवडे सुभाष गौतम 144, पोपट नाना 299 (विजयी), कदम मनीषा केशव 184, कोरडकर सुरेखा अशोक 315 (विजयी), भोस रत्नबाई जयसिंग 169, भोस सुजाता राजेंद्र 327 (विजयी), तरटे निखिल भाऊसाहेब 167, भोस महेश गौतम 336 (विजयी), काळेवाघ दगडू किसन 117, शिंदे विजय विठोबा 385 (विजयी), धावडे अनुसया रामभाऊ 115, भोस राणी लक्ष्मण 386 (विजयी), गंगाधरे रामदास योगीराज 210, बोरुडे संतोष भिकाजी 250 (विजयी), धालवडे मंगल रामभाऊ 170, मांढरे मनीषा सुभाष 288 (विजयी).
तरडगव्हाण- सरपंचपदी डोके नवनाथ भागचंद हे 337 मते मिळवून विजयी झाले. तर विरोधी राजगुडे नेमीचंद मल्हारी 226 व शेख सादिल कालिंदर 26 मते मिळाली. सदस्यपदाचे उमेदवार व मिळालेले मते पुढिल प्रमाणे- बेरड रोहिदास अंबादास 127 (विजयी), राजगुडे नेमीचंद मल्हारी 92, बेरड अलकाबाई रायचंद 96, बेरड सुलोचना संभाजी 121 (विजयी). बिनविरोध सदस्य-गोवर्धन झुंबर डोके, योगिता चंद्रकांत वाळके, भीमाजी सोमनाथ गोलवाड, सविता भाऊसाहेब पठारे, भोसले नीलम संतोष.
काष्टी- सरपंचपदी वाघ सुलोचना पोपटराव या 4335 मते मिळवून विजयी झाल्या तर विरोधी वाघ मनीषा अंकुश यांना 3563 मते मिळाली. सदस्य पदाचे उमेदवार व मते- पाचपुते प्रकाश नर्सिंगराव 408, पाचपुते राहुल सुदाम 56, पाचपुते सुनीलकुमार बाजीराव 932 (विजयी), कोकाटे स्वाती संभाजी 339, टीमुने संगीता प्रकाश 1071 (विजयी), धुमाळ पूनम शिवाजी 1042 (विजयी), मनुचार्य संगीता संतोष 336, पाचपुते चांगदेव रामदास 696 (विजयी), पाचपुते राजू सयाजी 534, माने बेबी तात्या 598, माने शीतल पोपट 630 (विजयी), राहिंज नवनाथ तात्या 992 (विजयी), राहिंज प्रेमराज बाळासाहेब 574, पाचपुते अमोल पांडुरंग 750, पाचपुते जालिंदर माणिक 774 (विजयी), पाचपुते सचिन सुदाम 46, गावडे सारिका जनार्दन 916 (विजयी), राहिंज सारिका गणेश 639, पवार राहुल सतीश 705, शिरोळे रामदास सोपाना 715 (विजयी), गवते ज्ञानदेव पांडुरंग 803 (विजयी), पाचपुते बाळासाहेब गोविंद 619, दांगट प्रतिभा रवींद्र 892 (विजयी), दांगट सुनीता अशोक 527, पाचपुते नानासाहेब वामनराव 391, पाचपुते संदीप अशोक 786 (विजयी), कोकाटे मनीषा संदीप 845 (विजयी), कोकाटे मंदा दत्तात्रय 334, फाळके ललिता लालासाहेब 874 (विजयी), मोटे आशा बंडू 297, दरेकर महेश दिलीप 788 (विजयी), रसाळ अतुल झुंबरराव 351, घोलवड सुनीता विनोद 430, पवार जयश्री अमोल 699 (विजयी), कोकाटे धनश्री दादासाहेब 800 (विजयी), जाधव ज्योती बापू 331.
पारगाव सुद्रीक- सरपंचपदी बोडखे बबन तुळशीराम हे 2474 मते मिळवून विजयी झाले. तर विरोधी रेपाळे आबासाहेब नारायण यांना 1946 मते मिळाली. सदस्यपदाचे उमेदवार व मिळालेली मते- मोटे राजेंद्र आप्पा 481 (विजयी), मोटे रामदास नारायण 291, एरंडे शशिकांत कैलास 339, मोटे गोविंद लक्ष्मण 437 (विजयी), आल्हाट निशा बाळासाहेब 66, आल्हाट रेखा विक्रम 222, घोडके अश्विनी मंगेश 480 (विजयी), मडके संजय हरिभाऊ 434, लबडे संदीप अशोक 549 (विजयी), कुलांगे रतनबाई पांडुरंग 614, जगताप मंगल बाळासाहेब 639 (विजयी), माळवे वंदना कांतीलाल 618 (विजयी), कापरे जयश्री नितीन 314 (विजयी), हिरवे शारदा नाना 292, हिरवे नवनाथ एकनाथ 508 (विजयी), हिरवे सुरेश विश्‍वनाथ 413, खेतमाळिस विजया दिलीप 526 (विजयी), खेतमाळिस सविता सुदाम 391, जगताप कमल विश्‍वनाथ 606 (विजयी), मडके संगीता अनिल 315, गोरखे जालिंदर दिनकर 103, गोरखे भाऊसाहेब विश्‍वनाथ 692 (विजयी), गोरखे सुभाष विठ्ठल 333, आमटे छगन आश्रू 662 (विजयी), मडके बाबासाहेब बापूराव 464.
माठ- सरपंचपदी घेगडे सविता नरसिंग या 594 मते मिळवून विजयी झाल्या तर विरोधी घेगडे शांताबाई परशराम यांना 537 मते मिळाली. सदस्यपदाचे उमेदवार व मते- खेडकर शरद तुकाराम 141, खेडकर शिवाजी ज्ञानदेव 183 (विजयी), खेडकर ज्योती त्रिंबक 189 (विजयी), घेगडे कामिनी रोहिदास 190 (विजयी), घेगडे नंदा मधुकर 132, घेगडे संध्या किशोर 138, घेगडे उमेश आनंदा 269 (विजयी), पवार सुधाकर सुभाष 182, रणदिवे मंदा पोपट 229 (विजयी), रणदिवे सारिका भाऊसाहेब 223, पवार अरुणा विश्‍वनाथ 250 (विजयी), बरगे कौशला जयसिंग 192, घेगडे अनिल सुदाम 208 (विजयी), घेगडे खंडू शिवाजी 157, देवीकर अमोल नामदेव 167, देवीकर दगडू रामचंद्र 182 (विजयी), घेगडे माधुरी विलास 179 (विजयी), शेळके तुळसाबाई शिवाजी 176, घेगडे शांताबाई परशराम 537, घेगडे सविता नरसिंग 594 (विजयी).
थीटेसांगवी- सरपंपदी वाळके वैजयंताबाई देविदास या 440 मते मिळवून विजयी झाल्या तर विरोधी शेळके अयोध्या अर्जुन यांना 433 मते मिळाली. सदस्यपदाचे उमेदवार व मते- उगले किसनराव भानुदास 206 (विजयी), वाल्हेकर दीप्ती मोहन 120, बचाटे संगीता बलभीम 190 (विजयी), भोसले सोनिया चंद्रकांत 123, शेळके अर्जुन रामचंद्र 175 (विजयी), ससाणे आत्माराम मुरलीधर 50, देवकाते संजनाबाई ज्ञानदेव 172 (विजयी), वाळके वैजयंताबाई देविदास 52, वाळके नीळकंठ यदू 125, वाळके विष्णू बन्सी 198 (विजयी), वाळके द्वारकाबाई वामन 121, वाळके मांडाबाई गोरख 221 (विजयी), वाळके विद्या अरुण 209 (विजयी), वाळके सविताबाई विवेक 97.
बेलवंडी- सरपंचपदी पवार सुप्रिया संग्राम या 3444 मते मिळवून विजयी झाल्या तर साळवे सुवर्णा संजय यांना 3279 मते मिळाली. सदस्यपदाचे उमेदवार व मते-लांडे उर्मिला विजय 552, शिंदे शोभा अशोक 630 (विजयी), इथापे संजय पांडुरंग 568, ढवळे बाळू लक्ष्मण 624 (विजयी), बेल्हेकर संदीप दत्तात्रय 586, शेलार अशोक बबन 611 (विजयी), डाके उत्तम धोंडिबा 695 (विजयी), डाके संजय हरिभाऊ 189, घोडेकर छाया भास्कर 637 (विजयी), वाळके लता अंकुश 246, चोभे दादासाहेब संपतराव 592, तरटे संदीप शांताराम 652 (विजयी), भुजबळ गणेश दशरथ 659 (विजयी), शेलार निवृत्ती नामदेव 584, हिरवे नीता जनार्दन 586, हिरवे पार्वतीबाई महादू 647 (विजयी), काळाने बाजीराव हरी 630, काळाने मधुकर बबन 727 (विजयी), आरकस मंदाबाई विठ्ठल 746 (विजयी), शेलार रुपाली रामदास 607, काळाने मंदाकिनी अरुण 817 (विजयी), मुठाळ मंदाकिनी त्रिंबक 538, काळे ताराबाई अंबादास 158, चव्हाण कावेरी किरण 521, भोसले सपना अजित 584 (विजयी), दातीर भाऊसाहेब भानुदास 629, पुराणे पंडित सीताराम 681 (विजयी), लबडे आशाबाई भीमा 692 (विजयी), लबडे सविता अरुण 604, शेख सलिम हुसेन 484 (विजयी), हवालदार मुबारक इस्माईल 273, पवार उषा दीपक 402 (विजयी), वायदंडे प्राजक्ता दीपचंद 349, बेंद्रे अलका संभाजी 428 (विजयी), क्षीरसागर रंजना रामदास 318.

आठच्या आकड्याने केला घात –
बनपिंप्रीमध्ये नितीन पठारे, चवरसांगवीमध्ये कानिफ उंदरे व थिटेसांगवीमध्ये अयोध्या शेळके या तीनही सरपंचपदाच्या उमेदवारांचा अवघ्या 8 मतांनी पराभव झाला. काही सदस्यांनाही अल्प मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे अनेकांची संधी हुकली.

LEAVE A REPLY

*