शेवगाव : प्रस्थापितांना जोरका झटका

0

शेवगावात राष्ट्रवादीकडे 8, भाजपाकडे 2 तर आघाडीकडे 2

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या 12 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 8 गावचे सरपंचपद पटकावीत राष्ट्रवादीने बाजी मारली असून भाजपने 2 तर स्थानिक आघाडीने 2 गावचे सरपंचपद पटकावले आहे. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकांत मतदारांनी प्रस्थापितांना जोरदार झटका दिला आहे.
निकालानंतर फटाक्यांचा आवाज विजयी उमेदवारांचा उत्साह वाढवत होता. मात्र पराभुतांच्या चुकणार्‍या काळजाच्या ठोक्यात भर घालत होता. राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे सदस्य कृष्णा उर्फ गंगा पायघन यांच्या गटाचा सरपंचपदाचा उमेदवार आखेगाव ग्रामपंचायतीत तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला, तर राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य मंगेश थोरात यांच्या खानापूर गावात सरपंचपदासाठी भाजपचा उमेदवार निवडून आला. पंचायत समिती सदस्या मीराताई लांडे यांच्या जोहरापूर ग्रामपंचायतीत त्यांच्या गटाचा सरपंचपदाचा उमेदवार अवघ्या 37 मतांनी विजयी झाला. तेथे भाजपने सदस्याच्या तीन जागा मिळविल्या.
तालुक्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या व अनेक पुरस्कार मिळालेल्या अमरापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विद्यमान सरपंच विजय पोटफोडे यांच्या पत्नी संगीता पोटफोडे यांनी अत्यंत अटीतटीच्या लढतीत 14 मतांनी बाजी मारली. त्यांना नवख्या उमेदवार आशा बाबासाहेब गरड यांनी कडवी झुंज दिली. येथे संगीता पोटफोडे यांना 603 तर आशा गरड यांना 589 मते मिळाली. इतर उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे- वंदना नामदेव गरड- 187, वंदना बाळासाहेब चौधरी- 218, रुपाली संतोष पोटफोडे- 297, सपना राम पोटफोडे- 158, यास्मिन सय्यद- 72. विजयी सदस्य- रंजना केदार दत्तात्रय भुजबळ (दोघे बिनविरोध), हरिश्चंद्र चौधरी, शारदा बोरुडे, अनिल बोरुडे, सुनंदा अडसरे, विद्या गायकवाड, मनीषा खैरे, संजय म्हस्के, महादेव खैरे, शारदा खैरे.
वाघोली ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी व जनशक्ती मंच अशी युती झाली होती. तेथे भाजपाचे युवा कार्यकर्ते उमेश भालसिंग यांनी बाजी मारली. सरपंचपदासाठी भालसिंग गटाचे बाबासाहेब गाडगे विजयी झाले. तसेच भाजपचे सहा सदस्य विजयी झाले. येथे गाडगे यांना 942 तर राष्ट्रवादीचे अ‍ॅड. गोरक्षनाथ जमधडे यांना 864 मते मिळाली. विजयी सदस्य- मीरा पवार, रेखा शेळके (दोन्ही बिनविरोध), भरत आल्हाट, मोतिराम काळे, सुनिता दातीर, बापु चितळे, अंबिका शेळके, अर्चना भालसिंग, दिनकर फुंदे.
आखेगाव येथे तर मतदारांनी सर्वांना आचंबित करीत सरपंचपदी अपक्ष बाबासाहेब गोरडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. त्याचबरोबर त्यांच्या आघाडीचे सर्व 11 उमेदवार निवडून दिले. या ठिकाणी उमेदवारांना मिळालेली मते अशी- बाबासाहेब गोरडे 1170, भगवान काटे- 293, शंकर काटे- 515, रामचंद्र झिंजुर्के- 34, अण्णासाहेब ढोबळे- 16, संजय पायघन- 451, श्रीकांत शिंदाडे- 19. विजयी सदस्य- शंकर काटे, मुक्ताबाई नाचण, गंगूबाई मराठे, शिवाजी नाचण, वृदांवनी डोंगरे, मनोहर काटे, विद्या ससाणे, शीतल नाचण, अमोल ससाणे, भाऊसाहेब पायघन, अंबिका खर्चन.
जोहरापूर येथे सरपंचपदासाठी राष्ट्रवादीच्या पं.स. समिती सदस्या मीराताई लांडे व भाजपचे शिवाजी उर्फ गंगा खेडकर यांच्या गटात अत्यंत अटीतटीची लढत झाली. येथे सरपंचपदी राष्ट्रवादीचे जालिंदर वाकडे अवघ्या 37 मतांनी विजयी झाले. वाकडे यांना 612 तर भाजपचे नितीन जाधव यांना 575 मते मिळाली. अपक्ष ताराचंद घुटे यांना 75 मते मिळाली. या ठिकाणी भाजपचे गंगा खेडकर यांच्या गटाचे 3 सदस्य निवडून आले. विजयी सदस्य- राजेंद्र आढागळे, रोहन लांडे, अवंतिका वाघमारे, शिवाजी खेडकर, कल्पना खेडकर, शोभा पालवे, रविंद्र उगलमुगले, जयश्री उगलमुगले, सुरेखा देवढे.
सुलतानपूर खुर्द (फलकेवाडी) येथे सरपंचपदी अपक्ष बाळासाहेब मरकड विजयी झाले. त्यांना 262 मते मिळाली. येथे इतर उमेदवारांना मिळालेली मते अशी- शिरीष काळे- 183, प्रसाद फलके- 112, रोहिणी फलके- 224, संभाजी शिंदे-240. विजयी सदस्य- प्रविण फलके, मनीषा फलके, मनीषा मरकड, विजय काटे, सुनीता फलके, शारदा फलके, रवींद्र डोईफोडे, दिनकर डोईफोडे, लताबाई शिंदे (तिघे बिनविरोध).
खानापूर येथे सरपंचपदी भाजपाचे अण्णा शाहुराव जगधने विजयी झाले. त्यांना 585 मते मिळाली, राष्ट्रवादीचे लक्ष्मण जगधने यांना 351, अपक्ष राजेंद्र जगधने यांना 43 व किशोर ससाणे यांना 18 मते मिळाली. येथे राष्ट्रवादीला सदस्यपदाच्या 6 व भाजपला 3 जागा मिळाल्या. विजयी सदस्य- प्रदीप आव्हाड, शीतल थोरात, सरोजा चेडे, राजेंद्र जगधने, हिराबाई खोसे, रामदास गोरे, विजय थोरात, शैला थोरात, सुनंदा थोरात.
खामगाव- येथे सरपंचपदी मुज्जमिल मन्सूरमिया पटेल यांची निवड झाली तर सदस्यपदी कुसूम विलायते (बिनविरोध) मनीषा तुजारे, कुशीवार्ता बडधे, मोसीम पटेल, सुरेश भोंगळे, सुभाष बडधे, नरगिस काझी हे निवडून आले. प्रभूवाडगाव येथे राष्ट्रवादीच्या गंगूबाई रंगनाथ बटूळे विजयी झाल्या. त्यांना 541 मते मिळाली. अंजली ज्ञानदेव बटूळे यांना 418 व गुलबक्ष सर्जेराव बटूळे यांना 247 मते मिळाली. भायगाव येथे राष्ट्रवादीच्या दोन गटातच लढत झाली. येथे मुरलीधर दुकळे 632 मते घेत सरपंचपदी विजयी झाले. तर एकनाथ लांडे यांना 601 मते मिळाली. येथे आढाव व लांडे गटाचे 6 सदस्य तर सरपंच दुकळे गटाचे 3 सदस्य विजयी झाले. विजयी सदस्य- राजू सौदागर, राणी शेकडे, मंगल नेव्हल, नारायण आढाव, कविता सौदागर, मनीषा आढाव, अण्णासाहेब जर्‍हाड, संदीप शिरसाठ, नर्मदाबाई जगधने.
कुरुडगाव येथे जालिंदर काळे हे 554 मते घेत सरपंचपदी निवडून आले. तेथे अशोक औटी यांना 497 मते मिळाली. तर खामगाव येथे सरपंचपदी मुजम्मील मन्सूर पटेल 275 मते मिळवून विजयी झाले. येथे वसीम काझी यांना 217 व दिगंबर बडधे यांना 157 मते मिळाली. विजयी सदस्य- अप्पासाहेब औटी, छाया औटी, आशाबाई कुटे, योहान निळ, सुभद्रा निळ, प्रकाश भराट, जालिंदर भराट, राधिका काटे.
मतमोजणीचे काम तहसीलदार दीपक पाटील व त्यांच्या सहकार्यानी व्यवस्थित पार पाडले. निकालानंतर विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला.

 

LEAVE A REPLY

*