संगमनेर : 35 ग्रामपंचायतीसाठी 81.11 टक्के मतदान

0

ओझर खुर्दमध्ये उच्चांकी तर घुलेवाडीत निच्चांकी मतदान, घुलेवाडीत मतदार याद्यांचा घोळ

संगमनेर (प्रतिनिधी)-तालुक्यातील 38 ग्रामपंचायतींपैकी 35 ग्रामपंचायतींसाठी काल मतदान झाले. या ग्रामपंचायतींसाठी सरासरी 81.11 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान ओझर खुर्द 97.19 टक्के तर सर्वाधिक कमी मतदान घुलेवाडी 56.79 टक्के झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
35 ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेसाठी 160 केंद्र निर्मिती करण्यात आली होती. सुमारे 1400 कर्मचारी मतदान प्रक्रियेत सहभागी झाले होते. निवडणूक निरीक्षक तथा प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनखाली निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार साहेबराव सोनवणे, नायब तहसिलदार दत्तात्रय जाधव, निवडणूक नायब तहसिलदार अशोक रंधे हे मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.
तळेगाव दिघे येथे 85 टक्के मतदान
तळेगाव दिघे प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 85.12 टक्के मतदान झाले. एकूण 5741 मतदारांपैकी 4887 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ चकमकी वगळता दिवसभर उत्साहात व शांततेत मतदान पार पडले.
तळेगाव दिघे येथील बूथ क्रमांक एकमध्ये 1179 पैकी 1036, बूथ क्रमांक दोनमध्ये 1177 पैकी 999, बूथ क्रमांक तीनमध्ये 1126 पैकी 937 बूथ क्रमांक चारमध्ये 1173 पैकी 891, बूथ क्रमांक पाचमध्ये 1186 पैकी 1024 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 5741 मतदारांपैकी 4887 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या उमेदवारासह समर्थक कार्यकर्त्यांची दिवसभर मतदान घडवून आणण्यासाठी लगबग सुरु होती. दुपारी अडीचच्या सुमारास पंधरा ते वीस मिनिटे पावसाने हजेरी लावल्याने मतदार संख्या रोडावली होती. मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने मतदान सुरळीत झाले. किरकोळ शब्दिक चकमकी वगळता मतदान शांततेत पार पडले. या निवडणुकीत 854 मतदारांनी निरुत्साह दाखवीत मतदानास येणे टाळले.
पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांनी तळेगाव येथे भेट देत पाहणी केली. पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, सहायक फौजदार बाळासाहेब घोडे व अशोक जांभूळकर यांनी दिवसभर चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदान पार पडल्यानंतर आभार सभेत उमेदवारांच्या समर्थकांनी विजयाचे दावे-प्रतिदावे केले.
साकुर 83 टक्के मतदान
साकुर प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकुर, जांभुळवाडी, जांबुत ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सरपंचपद जनतेतुन निवडण्याची पहिलीच वेळ असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.
साकुर ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिला राखीव असल्याने शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवार नंदा शंकरराव खेमनर विरूद्ध जनसेवा मंडळाच्या उमेदवार ज्योती बंडु खेमनर अशी सरळ लढत झाली. मिनी आमदार म्हणून सरपंच यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
साकुर ग्रामपंचायतीत एकूण सहा प्रभागात 5933 मतदारांपैकी 5148 मतदारांनी आपला मतदान हक्क बजावला. तर प्रभागनुसार प्रभाग क्र 1 मध्ये 1061 मतदारांपैकी 819 मतदान झाले. प्रभाग क्र 2 मध्ये 1208 मतदारांपैकी 995 मतदान झाले.
प्रभाग क्र 3 मध्ये 1073 मतदारांपैकी 850 मतदान झाले . प्रभाग क्र 4 मध्ये 910 मतदारांपैकी 689 मतदान झाले, प्रभाग क्र 5 मध्ये 887 मतदारांपैकी 714 मतदान झाले. तर प्रभाग क्र 6 मध्ये 694 मतदारांपैकी 585 मतदान झाले असून एकुण 86.77 टक्के मतदान झाले. तसेच जांभुळवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत झाली असून एकुण 2102 मतदारांपैकी 1750 मतदारांनी हक्क बजावला असून एकूण 83.25 टक्के मतदान झाले.
तर जांबुत ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकुण सहा उमेदवार रिंगणात होते. तसेच एकुण 1902 मतदारांपैकी 1589 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून एकुण तीन प्रभागापैकी प्रभाग क्रमांक 1 मध्ये 459 मतदारांपैकी 370 मतदारांनी मतदान केले. तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये 755 मतदारांपैकी 666 तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये 688 मतदारांपैकी 553 मतदारांनी मतदान केले असून एकुण 83.54 टक्के मतदान झाले.
तर या तिनही ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रिये दरम्यान दिवसभरात अनुचित प्रकार घडला नसल्याने निवडणूक शांततेत पार पडली. तर यावेळी मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जोर्वे प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार जोर्वे ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रकिया शांततेत पार पडली. प्रभाग 1 मध्ये 618 पैकी 529, प्रभाग 2 मध्ये 762 पैकी 659, प्रभाग 3 मध्ये 847 पैकी 711, प्रभाग 4 मध्ये 719 पैकी 661, प्रभाग 5 मध्ये 892 पैकी 751 मतदान झाले. एकूण मतदान 3838 पैकी 3271 मतदान झाले. 85.23 टक्के मतदान झाले. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, सौ. कांचनताई थोरात यांनी सकाळी 8 वाजता मतदानाचा हक्क बजावला.
आश्‍वी खुर्द प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील आश्‍वी व जोर्वे गटातील ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणूकीत किरकोळ बाचाबाचीच्या घटना सोडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. उंबरी-बाळापूरची तिरंगी लढत सोडता बहुतांशी ग्रामपंचायतीसाठी थेट नामदार विखे व आमदार थोरात गटात लढत झाली आहे.
शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आश्‍वी परिसरात पावसाने हजेरी लावल्याने मतदान प्रक्रिया एक तास मंदावली होती. तर पाऊस थांबल्यानतंर मतदारांनी स्वता: घरातून बाहेर पडत मोठ्या उत्साहाने मतदान करत लोकशाहीचा आपला हक्कं बजावत विक्रमी मतदान केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, पोलीस निरीक्षक अनिल कटके व पोलीस उपनिरिक्षक राजकुमार हिगोंले यांनी शिर्डी मतदार संघातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
ग्रामपंचायतनिहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणेः- चिंचोलीगुरव-3036 पैकी 2287 (75.33 टक्के), वडझरी बुद्रूक-1026 पैकी 944 (92.01 टक्के), सायखिंडी-2099 पैकी 1829 (87.14 टक्के), चिकणी-2049 पैकी 1645 (80.28 टक्के), हंगेवाडी-1003 पैकी 905 (90.23 टक्के), घुलेवाडी-12,622 पैकी 7168 (56.79 टक्के), रहिमपूर-1914 पैकी 1730 (90.39 टक्के), ओझर खुर्द-1317 पैकी 1280 (97.19 टक्के), वाघापूर-1054 पैकी 950 (90.13 टक्के), दरेवाडी-824 पैकी 661 (80.22 टक्के), निमगावभोजापूर-1323 पैकी 1175 (88.81 टक्के), कनकापूर-637 पैकी 567 (79.01 टक्के), निमोण-4382 पैकी 3493 (79.71), वडझरी खुर्द-867 पैकी 685 (79.01 टक्के), कोल्हेवाडी-4012 पैकी 3403 (84.82 टक्के), खराडी-1184 पैकी 1103 (93.16 टक्के), निळवंडे-1969 पैकी 1544 (78.42 टक्के), करुले-1060 पैकी 960 (90.57 टक्के), उंबरीबाळापूर-2821 पैकी 2438 (86.42 टक्के), धांदरफळ बुद्रूक-3817 पैकी 3157 (82.71 टक्के), निंबाळे-965 पैकी 848 (87.88 टक्के), पोखरी हवेली-1462 पैकी 1265 (86.53 टक्के), गुंजाळवाडी-7158 पैकी 5790 (80.89 टक्के), धांदरफळ खुर्द-2116 पैकी 1842 (87.05 टक्के), पिंपरणे-2156 पैकी 1918 (88.96 टक्के), कोळवाडे-1233 पैकी 1037 (84.10 टक्के), निमगावजाळी-4142 पैकी 3492 (84.31 टक्के), सादतपूर-1050 पैकी 922 (87.81 टक्के), अंभोरे-3207 पैकी 2782 (86.75 टक्के), मालुंजे-1829 पैकी 1653 (90.38 टक्के)
35 ग्रामपंचायतींसाठी एकूण मतदार 93 हजार 850 पैकी 76 हजार 118 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर सरासरी 81.11 टक्के मतदान झाले.

महाराष्ट्रात प्रथमच संगमनेरात ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर –
निवडणूक मतदान प्रक्रिया राबवितांना महाराष्ट्रात प्रथमच संगमनेर मध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करण्यात आला. 35 ग्रामपंचायतींसाठी नेमण्यात आलेल्या 160 केंद्रप्रमुखांशी निवडणूक निर्णय अधिकारी साहेबराव सोनवणे यांनी एकाचवेळी 1400 कर्मचार्‍यांशी थेट संपर्क साधला. मोबाईल व्हॉईस कॉलचा वापर करण्यात आला. मतदान प्रक्रिया सुरु असतांना केंद्राध्यक्षांना वेळोवेळी सूचना, सध्यस्थितीची माहिती, मतदान संपल्यानंतर साहित्य जमा करण्याच्या सूचना यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करण्यात आला. दरम्यान दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. मतदानाचे साहित्य संगमनेरच्या क्रिडा संकुलात जमा करावयाचे होते. मात्र पावसामुळे नियोजन कोलमडणार असल्याचे लक्षात येताच निवडणूक निर्णय अधिकारी साहेबराव सोनवणे यांनी एकाचवेळी 1400 केंद्राध्यक्षांशी संपर्क साधून मतदान साहित्य क्रिडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे जमा करण्याच्या सूचना केल्या. या यंत्रणेचा वापर आत्पकालिन परिस्थितीत केला जातो. मात्र प्रथमच या यंत्रणेचा वापर निवडणूक मतदान प्रक्रियेच्यावेळी करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमता व अचूकता वाढल्याचे दिसून आले.

 

घुलेवाडीत ‘बीएलओ’ व मतदान  केंद्रातील याद्यांमध्ये तफावत –
जिल्ह्यात सर्वाधिक महसूल असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. घुलेवाडीच्या मिनी आमदारकीसाठी 11 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे कुणाच्या अंगावर विजयाचा गुलाल पडणार याची उत्सुकता असतांना काल मतदानाच्या दिवशी घुलेवाडी ग्रामपंचायत मतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांची नावे नसल्याने मतदारांनी तीव्र संताप व्यक्त केला.
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणूकीत मतदान करतांना नावे होती, मात्र ग्रामपंचायतीच्या मतदानावेळी यादीत नाव नसल्याने मतदारांनी ‘बीएलओ’च्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत मतदारांची खर्‍या यादीची मागणी केली. याप्रकारामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. घटनेची माहिती तहसिलदारांना देण्यात आली. माहिती मिळताच तहसिलदार साहेबराव सोनवणे हे घुलेवाडीत दाखल झाले.
मतदार याद्या चुकीच्या आल्या आहेत, ‘काही’ंच्या यंत्रणेने मतदारांना आधीच चिठ्ठ्या दिल्या होत्या. त्यामुळे चिठ्ठीवरील नंबर व मतदार यादीतील नंबर वेगळे होते. नंबर वेगळा तर नाव दुसरे असे निदर्शनास आले. ही बाबत काही जागरुक मतदारांनी तहसिलदारांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तहसिलदारांनी स्वतः आणलेल्या याद्या देवून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. मात्र त्या याद्यांमध्ये देखील तफावत असल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरु होती. मतदान केंद्रातील मतदार यादी व ‘बीएलओ’कडील यादी यांच्यामध्ये तफावत होती. मतदान अनुक्रमांक न सापडल्याने अनेक मतदार मतदान न करताच निघून गेले. या सर्व प्रकारात सुमारे एक ते दीड तास मतदान प्रक्रिया रेंगाळली होती.

LEAVE A REPLY

*