संगमनेर तालुक्यात आ. थोरातांचे निर्विवाद वर्चस्व

0
* घुलेवाडीत थोरात गटाला पराभवाचा धक्का
* धांदरफळ खुर्दमध्ये युवकांची सभापतींना धोबीपछाड
* जोर्वेत सरपंच थोरातांचा तर बहुमत विखेंकडे
* गुंजाळवाडीत उपसभापतींचे वर्चस्व सिद्ध
संगमनेर (प्रतिनिधी) – मिनी विधानसभा म्हणून उत्सुकता वाढलेल्या तालुक्यातील 38 ग्रामपंचायतींपैकी 35 ग्रामपंचायतींवर माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले असून 3 ग्रामपंचायतींवर विखे गटाने तर दोन ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष उमेदवारांनी सरपंच पदाची बाजी मारली आहे.
संगमनेर तालुक्यातील 38 ग्रामपंचायतींपैकी डोळासणे, कर्जुले-गुंजाळवाडीपठार, रणखांब या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरीत 35 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. सरपंचपदासाठी 117 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी विजयी 35 झाले तर सदस्यपदासाठी 707 उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यापैकी 280 उमेदवार विजयी झाले.
निवडणूक निरीक्षक तथा प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक निर्णय अधिकारी साहेबराव सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली 35 ग्रामपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये सुरळीत पार पडली. यासाठी 16 टेबल लावण्यात आले होते. एकापाठोपाठ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीस प्रारंभ झाला. सुरुवातीला घुलेवाडीची मतमोजणी झाली. तर सर्वात शेवटी मालुंजे ग्रामपंचायतीची झाली.
गेल्या 7 तारखेला झालेल्या एकूण 38 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीनंतर समोर आलेल्या निकालातून 38 गावांचा गावगाडा हकण्यासाठी जनतेतून निवडल्या गेलेल्या सरपंचांमध्ये बहुसंख्य सरपंच हे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या आधिपत्याखाली शेतकरी विकास मंडळाच्या माध्यमातून विजयी झाले आहेत.
या विजयाचा मोठा वाटा राजकीयदृष्ट्या जमेचा असला तरी तालुक्यातील घुलेवाडी गावाच्या महत्वपूर्ण निवडणुकीत थोरात गटाचा झालेला पराभव हा सर्वांच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानला जात आहे. अशीच परिस्थिती धांदरफळ खुर्द या गावात निर्माण झालेली आहे. तालुक्याच्या सभापती निशाताई कोकणे यांचे वर्चस्व असतांनाही या गावात थोरात गटाचा झालेला पराभव धक्कादायक मानला जात आहे.
माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी या मिनी विधानसभेत राजकीय घडामोडी घडवून आणल्या. यामध्ये काही गावांची जबाबदारी काही संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी पार पाडली होती. मात्र गावातील तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये तसेच संस्थांची पदे असलेल्या पदाधिकार्‍यांमध्ये योग्य तो सुसंवाद न राहिल्यामुळेच अनेक गावांमध्ये थोरातांना मानणारे दोन गटच एकमेकांसमोर उभे राहिले.
या गटबाजीचा फायदा तालुक्यातील थोरात विरोधकांनीही अचुकपणे हेरत एका गटाला छुपे समर्थन दिले. याचा विपरीत परिणाम निकालामध्ये प्रत्यक्षपणे दिसून आला आहे. 35 गावांचे सरपंच हे थोरातांना मानणारे असले तरी अनेक ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या ही संमिश्र निवडून आली असल्याने विकास कामांच्या निर्णय प्रक्रियेबाबत कशी भूमिका घेतली जाते हे येणारा काळच ठरवेल.
निकालाच्या माध्यमातून गावाला गृहित धरुन वागणार्‍या पुढार्‍यांनाही जनतेने चपराक दिली असून भविष्यात विचारात घेतल्याशिवाय राजकीय निर्णय करता येणार नाही हे देखील युवकांनी मतांच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. अतिशय कमी मतांच्या फरकाने झालेला विजय अथवा झालेला पराभव हा सर्वांनाच आत्मपरिक्षण करायला लावणारा आहे.
सर्व विजयी उमेदवारांचा आमदार थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पा. खेमनर, लक्ष्मणराव कुटे, बाबा ओहोळ, इंद्रजितभाऊ थोरात, भाऊसाहेब कुटे, रामदास वाघ, अजय फटांगरे, आर. बी. रहाणे, रामहरी कातोरे, मीनानाथ वर्पे, बाळासाहेब मोरे, सुभाष गुंजाळ, नवनाथ आंधळे, दत्तु खुळे, शिवाजी जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. तांबे म्हणाले, निवडणुका या लोकशाहीचा पाया आहे. संगमनेर तालुक्यात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘एक परिवार’ म्हणून सगळेजण काम करत आहेत. या निवडणूकीत आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर मैत्रीपूर्ण लढती झाल्या.
देशात सध्या भाजपाचे सरकार असूनही संगमनेर तालुका मात्र कायम काँग्रेसच्या विचारांशी बांधिल राहिला आहे. एकजूट व पक्ष संघटना, कार्यकर्त्यांची मोठी फळी ही आमदार थोरात यांची ताकद आहे. सर्वांनी झाले गेले विसरुन गावच्या व तालुक्याच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ म्हणाले, आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची फळी सक्षमपणे काम करीत असून गावोगावच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी तरुणांनी काम करावे. राजकारणात सुशिक्षीत व सुसंस्कृत तरुणांची मोठी गरज असून ग्रामपंचायत निवडणुकींमधून कार्यकर्ते निर्माण होतील. असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
या सर्व विजयी उमेदवारांचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पा. खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, सत्यजित तांबे, बाबा ओहोळ, रामदास पा.वाघ, अजय फटांगरे, निशाताई कोकणे, शंकर पा. खेमनर, शिवाजीराव थोरात, अमित पंडित, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजित थोरात, शरयुताई देशमुख आदिंनी अभिनंदन केले आहे. यावेळी आमदार थोरात समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालांची उधळण करुन विजयी उमेदवारांच्या मिरवणूका काढल्या.
सरपंचपदाकरिता निवडून आलेल्या उमेदवारांची नावे- घुलेवाडी- सोपान रामचंद्र राऊत (अपक्ष, 3081), अंभोरे- भास्कर लहानू खेमनर (1657, शेतकरी), चिंचोलीगुरव- प्रमिला रमेश बर्डे (1534, शेतकरी), चिकणी- शिवाजी मारुती वर्पे (993, शेतकरी), दरेवाडी- सुमन सुखदेव दरगुडे (391, शेतकरी), धांदरफळ बुद्रुक- भानुदास गंगाधर शेटे (1534, शेतकरी), धांदरफळ खुर्द- रोहिदास संपत खताळ (अपक्ष, 913), गुंजाळवाडी- वंदना विलास गुंजाळ (3134, शेतकरी), हंगेवाडी-नितीन सोमनाथ सांगळे (485, शेतकरी), जांभूळवाडी- महादू दगडू कुदनर (1039, शेतकरी), जांबूत बुद्रूक- उत्तम पंढरीनाथ बुरके (500, शेतकरी), कनकापूर- बाळासाहेब कारभारी चौधरी (278, शेतकरी), करुले-कल्पना भाऊसाहेब कोल्हे (411, शेतकरी), जोर्वे- रवींद्र विलास खैरे (1686, शेतकरी), खराडी-शिवाजी श्रीपत चत्तर (598, शेतकरी), कोल्हेवाडी- दत्तात्रय निवृत्ती खुळे (1799, शेतकरी), कोळवाडे-जयश्री अनिल कुदळ (605,), मालुंजे-संदीप भाऊसाहेब घुगे (985), निंबाळे-गणपत किसन पर्बत (502), निमगावभोजापूर-सुरेश नामदेव फटांगरे (674), निमगावजाळी- अमोल भाऊसाहेब जोंधळे (1312), निमोण-संदीप भास्करराव देशमुख (1329), निळवंडे-गोरक्षनाथ पंढरीनाथ वाकचौरे (733), ओझर खुर्द-पुंजाहरी तुकाराम शिंदे (665), पिंपरणे-इंद्रायणी संतोष वाकचौरे (1151), पोखरीहवेली-अनिल शंकर गायकवाड (471), रहिमपूर-बाजीराव बाबासाहेब सिंदे (850), सादतपूर-अंजनी संदीप कडलग (412), साकुर-नंदा शंकर खेमनर (3638), सायखिंडी-नवनाथ दगडू शिंदे (1174), तळेगाव दिघे-बाबासाहेब प्रभाकर कांदळकर (2410), उंबरीबाळापूर-अरुण हरिभाऊ भुसाळ (1091), वडझरी बुद्रूक-अशोक बाजीराव गोर्डे (228), वडझरी खुर्द-ज्ञानेश्‍वर जिजाबा सुपेकर (277), वाघापूर-शिवाजी चिंतामण शिंदे (576).
ग्रामपंचायतनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणेः-कनकापूर-पंढरीनाथ प्रभू शिंदे (139), लीला अशोक पचपिंड (145), बाबू साहेबराव मोरे (144), करुले-विजय पुंजा आखाडे (180), निळवंडे-शशीकांत सुभाष पवार (305), सायखिंडी-शशिकांत आत्माराम गांडोळे (362), मनीषा शिवाजी गडकरी (375), पार्वती पुंजा नन्नवरे (347), सुखदेव धोंडीबा गायकवाड (334), गोरख रामचंद्र भंडकर (384), शारदा वामन पारधी (372), नामदेव चांगदेव पारधी (439), धांदरफळ खुर्द-योगेश पंढरीनाथ खताळ (276), अनुराधा किसन खताळ (270), संतोष दत्तात्रय काळे (237), संदीप विठ्ठल ठोंबरे (220), ताराबाई कोंडाजी गुंजाळ (324), साकुर-कुसुम भाऊसाहेब पवार (716), शंकरराव हनुमंताराव खेमनर (786), गवराम गणपत वराळे (761), उषा बाबाजी मोरे (858), चांगदेव भागाजी खेमनर (612), हफिसा रज्जाक मोमीन (634), सरला राजेंद्र कल्याणकर (645), दादा अब्दुल पटेल (470), चंद्रकला राजेंद्र सोनवणे (541), शोभा बाळासाहेब डोके (520), प्रकाश रामचंद्र शेलार (396), रफिक सिकंदर चौगुले (511), नैना गणेश तिरवाडी (501), किशोर बापू गाडेकर (402), चिंचोलीगुरव-बाबासाहेब रावसाहेब सोनवणे (465), राधा किसन गोसावी (463), पल्लवी सचिन आभाळे (426), संपत दादा सोनवणे (378), सरला खंडेराव सोनवणे (328), विलास जगन्नाथ सोनवणे (285), कविता राजेंद्र गोडगे (303), मनीषा अनिल गोडगे (298), भास्कर रामचंद्र बर्डे (312), दिलीप भिमराज गोडगे (334), सिंधू यमाजी गोडगे (312), वडझरी बुद्रूक-दामू बाळू राऊत (146), रंजना एकनाथ कांदळकर (135), जाईबाई चांगदेव वेताळ (145), निमगावजाळी-दीपाली विजय जोंधळे (387), मानसी नंदकुमार वदक (405), विनायक भास्कर टिळेकर (270), लताबाई भाऊसाहेब अरगडे (298), तान्हाजी भागवत माळी (299), शिवनाथ सर्जेराव डेंगळे (296), सुशीला सुनील टिळेकर (286), मुकुंद भानुदास जाधव (585), मंगल सोमनाथ खरात (553), भावना लक्ष्मण बिडवे (467), अनिल तान्हाजी डेंगळे (371), संगीता अण्णासाहेब साठे (433), अरुणा अशोक जोंधळे (370), सादतपूर-भारत ज्ञानदेव मगर (182), प्रकाश मच्छिंद्र गोरे (151), कुसुम ज्ञानदेव मगर (213), अण्णासाहेब रंगनाथ कडलग (141), शोभा बाळासाहेब मगर (139), मनीषा जालिंदर काळे (135), कोल्हेवाडी-बंडू चंद्रभान वाळके (276), वैशाली बाळासाहेब दिघे (326), जालिंदर मच्छिंद्र दिघे (332), सोनाली सारंगधर वामन (316), अशोक किसन बलसाने (362), पोपट सावळेराम कोल्हे (377), मंदा गोरक्षनाथ कोल्हे (391), संजय लहानू कोल्हे (431), हिराबाई खंडू अरगडे (431), मंगल संजय कोल्हे (428), अनिल गणपत खुळे (500), विमल सुरेश खुळे (389), मनिषा मधुकर खुळे (461), खराडी-सखाराम रामा माळी (204), मंगल दिपक पवार (203), संगिता गंगा पांडव (242), राजेंद्र भाऊसाहेब कोटकर (214), पुष्पा अरुण वाघ (205), कविता मच्छिंद्र साबळे (198), अनिल जगन्नाथ पवार (263), संजय रेवनाथ साबळे (246), शीला गणेश धुमाळ (262), उंबरीबाळापूर-नानासाहेब सुखदेव उंबरकर (309), सुशीला भाऊसाहेब अंजनकर (304), मंदाबाई रामराव भुसाळ (260), साहेबराव सखाराम बर्डे (214), नानासाहेब सखाराम भुसाळ (241), इंदुबाई संजय डोखे (301), मंदाबाई गोपीनाथ उंबरकर (321), वैशाली भाऊसाहेब भुसाळ (313), विजय थॉमस शेळके (268), नामदेव तुकाराम डोखे (330), उज्ज्वला शिवाजी सारबंदे (232), अंभोरे-रावसाहेब अनाजी गवारी (395), अनिल शिवराम खेमनर (398), शबाना शाकीर मणियार (406), भाऊसाहेब येसू खेमनर (391), तृप्ती भाऊसाहेब खेमनर (345), अलका म्हाळू पुणेकर (359), अर्चना विकास कोटकर (414), मिराबाई रामदास खेमनर (372), यशवंत भिकाजी गायकवाड (385), शरद राधू खेमनर (332), शेवंताबाई सावळेराम मालगुंडे (369), मालुंजे-छबुबाई कारभारी सोसे (325), वंदना राजेंद्र आव्हाड (356), सुभद्रा सिताराम चौधर (328), गणेश महादू सोसे (315), लक्ष्मी भाऊसाहेब काकड (315), संगीता बाळासाहेब नागरे (297), जनार्दन तुकाराम खरात (323), भानुदास सोमनाथ दोंड (290), लक्ष्मीबाई मोहन वाघ (325), गुंजाळवाडी-अमोल संभाजी गुंजाळ (584), विजया योगेश तळपे (565), नीलिमा युवराज गुंजाळ (588), राजू सदाशिव गुंजाळ (385), मंदा नामदेव गुंजाळ (480), नामदेव धोंडिबा गुंजाळ (387), शतानंद जगन्नाथ खामकर (404), स्वाती बच्छाव निघुते (378), सतीश रामभाऊ वाकचौरे (512), पोपट कारभारी अरगडे (545), नयना कैलास रहाणे (571), अमोल विलास गुंजाळ (575), ललिता मारुती शिंदे (537), नंदिनी संजय राहाणे (443), दत्तात्रय मधुकर मंडलिक (745), प्रमिला संतोष शेळके (636), अनिता दिलीप पवार (537), घुलेवाडी-दत्तात्रय चिमण राऊत (645), शंकर ऊर्फ हरी रावसाहेब ढमाले (688), सुवर्णा चंद्रकांत वाकचौरे (831), दिलीप रामजी पराड (879), मच्छिंद्र दशरथ राऊत (692), मंगल सोमनाथ राऊत (644), चंद्रकांत लहानू पानसरे (395), भाऊसाहेब लहानू सातपुते (542), पुंजाबाई त्रिंबक पावबाके (654), जिजाबाई बाळासाहेब सातपुते (556), हंगेवाडी-दादासाहेब विश्‍वनाथ पवार (124), दत्तू कचरु घुगे (117), लहानबाई संतोष कांगणे (190), मिराबाई अरुण सांगळे (189), प्रविण अंकुश कांगणे (232), लताबाई सदाशिव सांगळे (246), शोभा रवि कांगणे (207), जोर्वे-संदीप गोरक्षनाथ यादव (217), सविता बाळासाहेब दिघे (178), राजेंद्र श्रीपत थोरात (303), वाल्हूबाई शिवाजी इंगले (459), दिलीप राधू इंगळे (339), मिना शांताराम वाकचौरे (429), मिना सुनिल इंगळे (391), गोकुळ गणपत दिघे (503), अलका सखाराम पवार (453), स्वाती भारत दिघे (440), दिपक बाबूराव बारे (416), हरीश तुळशीराम जोर्वेकर (393), मीराबाई नानासाहेब थोरात (405), वाघापूर-बाबासाहेब गंगाधर शिंदे (198), अनिता अप्पासाहेब शिंदे (194), विनोद भास्कर घोलप (187), आशा संजय जाधव (186), चंद्रभान बाळा पानसरे (203), मंगल बाळू शिंदे (196), पुष्पा मच्छिंद्र पवार (198), ओझर खुर्द-एकनाथ सुभाष पिंपळे (298), निकिता जयराम शिंदे (233), नंदाबाई रामदास शेपाळ (229), बकुनाथ दत्तू साबळे (327), बाबासाहेब मंगू बनवाले (336), ताराबाई गणेश शेपाळ (320), शांताराम रघुनाथ कदम (235), गयाबाई लक्ष्मण थोरात (227), अर्चना दीपक शेजूळ (226), रहीमपूर-दादाभाऊ मुरलीधर पिंगळे (341), उषाताई श्रीपाद गुळवे (326), शारदा गीताराम शिंदे (304), सोमनाथ नामदेव शिंदे (346), जयराम निवृत्ती वाळूंज (360), अनिता रामनाथ गुळवे (370), रामनाथ नवनाथ शिंदे (305), इंदुबाई सीताराम शिंदे (293), मनीषा कैलास गाडे (306), धांदरफळ बुद्रुक-रामनाथ गंगाधर कवडे (320), रुपाली गणेश मेहेत्रे (276), मारुती रामचंद्र कोल्हे (229), पूजा शरद तोरकडी (355), आशाबाई अशोक कोल्हे (389), मंगल दिनकर देशमुख (373), सखाराम विठ्ठल गोर्डे (431), सोनाली सुभाष शिंदे (372), शिवाजी मारुती काळे (388), जयश्री कैलास डेरे (369), अशोक हरिभाऊ खरात (396), नानासाहेब लक्ष्मण वाकचौरे (409), सुमन गंगाधर खुले (333), जांबूत बुद्रुक-वर्षा संदीप पारधी (235), तुकाराम भाऊसाहेब झिटे (446), सुशीला शरद मोहिते (353), राजेंद्र सयाजी घुले (317), रतन लक्ष्मण पारधी (284), निमोण-दगडू मुरलीधर घुगे (520), चंद्रकला शरद सांगळे (506), लता चांगदेव गाडेकर (521), पंढरीनाथ रामभाऊ घुगे (443), अशोक दादा खरात (433), योगिता नवनाथ आंधळे (486), भास्कर केरु तुपसुंदर (525), अनिता गणपत घुगे (502), ज्योती एकनाथ मंडलिक (657), अमजद रमजान अत्तार (297), प्रमिला देविदास मोरे (338), कोळवाडे-भाऊसाहेब जयवंत कडू (202), मंगेश लालू वर्पे (233), सुनीता मधुकर गोंधे (206), उल्हास शंकर घोडे (189), अर्चना आण्णा साबळे (154), बालिका सुरेश काळे (164), गोरक्ष सीताराम कुदळ (272), जयश्री अनिल कुदळ (292), हिरा नामदेव गुंजाळ (253), निमगावभोजापूर- नीलेश सुनील गांडोळे (239), रोहिणी मोहन फटांगरे (239), संतोष रंगनाथ कडलग (241), प्रेरणा अमोल कडलग (230), रुपाली भगवान कडलग (271), किरण दगडू सोनवणे (292), जिजाबाई कोंडीराम सूर्यवंशी (294), ज्योती संतोष कडलग (283), तळेगाव दिघे-शोभा आण्णा कांदळकर (516), आशा मच्छिंद्र दिघे (521), विकास आण्णासाहेब गुरव (617), सुनिल नामदेव दिघे (405), पुष्पा मच्छिंद्र दिघे (644), निलम विजय जगताप (523), मीना संजय कदम (491), राधा नवनाथ भागवत (463), काशिनाथ पुंजा जगताप (470), चांगदेव बाळू दिघे (510), रोहिणी संपत दिघे (490), अनिल रामचंद्र कांदळकर (613), रमेश सावित्रा दिघे (522), लता नानासाहेब दिघे (513), पोखरीहवेली-अशोक तुकाराम गायकवाड (161), कृष्णा साहेबराव गवांदे (182), लताबाई शांताराम गायकवाड (176), बाळासाहेब शिवाजी गवांदे (315), भीमाबाई सुदाम खैरे (352), प्रज्ञाबाई गजानन घुगे (366), महेश वाल्मिक दये (185), उषा दिलीप दये (192), सुप्रिया सुभाष दवंगे (209), निंबाळे-भागिरथी माधव काठे (157), नितीन रामदास मेहेत्रे (137), लीला नंदू मेहेर (142), कांतीलाल सीताराम घोलप (259), शोभा दत्तात्रय भुजबळ (174), पिंपरणे-अरुण नामदेव राहिंज (306), सुमन आण्णासाहेब ठोंबरे (296), कुंदा संतोष राहिंज (273), संजय पंढरीनाथ बागुल (264), सुवर्णा मधुकर काळे (255), उत्तम कांता भालेराव (252), दादाभाऊ सुकदेव गायकवाड (310), शैला मंजाबापू साळवे (291), अजित भास्कर देशमुख (252), अर्चना सोमनाथ खंडागळे (275), शोभा कुंडलिक ठोंबरे (259), दरेवाडी-सुमन सुकदेव दरगुडे (107), शिवाजी गवडीराव गायकवाड (170).

गटतट विसरून गावच्या
विकासासाठी एकत्र काम करा ः आ. थोरात
लोेकशाहीमध्ये निवडणूका या अपरिहार्य असून सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुका हसत खेळत लढविल्या आहेत. सुसंस्कृत राजकारण ही आपली परंपरा असून निवडणुकीनंतर सर्व मतभेद विसरून विकास कामाला आपण सुरुवात करतो. सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीतील गट-तट, मतभेद विसरुन एकत्र येऊन गावच्या विकासासाठी काम करावे, असे आवाहन करताना पराभूत व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून आ. थोरात यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

विखेंच्या मतदारसंघात आ. थोरात समर्थकांची बाजी
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातील जोर्वे, कोल्हेवाडी, ओझर, हंगेवाडी, कनकापूर, रहीमपूर या ग्रामपंचायतींवर थोरात समर्थकांनी झेंडा फडकविला आहे.

 

LEAVE A REPLY

*