पारनेरमध्ये सेनेची राष्ट्रवादीला धोबीपछाड!

0

राष्ट्रवादीचे बालेकिल्ले कोलमडले : भाळवणी, ढवळपुरी, पळशी, वनकुटेमध्ये धक्का

झेडपीत ‘पराभूत’ गावात बनले सरपंच.! –
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये सेनेचे उमेदवार पराभूत झाले होते. मात्र त्याचा वचपा सेनेने ग़्रामपंचायत निवडणुकीतून काढला आहे. ढवळपुरी गटात राष्ट्रवादीच्या सुप्रिया झावरे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागलेल्या लिलाबाई रोहोकले या भाळवणीच्या सरपंच झाल्या. तसेच पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनंदा धुरपते यांच्याकडून पराभूत झालेल्या सेनेच्या सुमन तांबे या गोरेगावच्या सरपंच झाल्या तर ढवळपुरी गणातून सेनेच्या ताराबार्ई चौधरी यांच्याकडून पराभूत झालेले राष्ट्रवादीचे डॉ. राजेश भनगडे ऐनवेळी सेनेत प्रवेश करून ढवळपुरीचे सरपंच झाले. ढवळपुरी गटातून पराभूत झालेले तिघेही ‘गावचे आमदार’ झाले आहेत. 

पारनेर (प्रतिनिधी) – तालुक्याचे लक्ष लागलेल्या पारनेरमधील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला. यात सेनेने राष्ट्रवादीला धोबीपछाड दिली असून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या ढवळपुरी, भाळवणी, पळशी, वनकुटे ग्रामपंचायतींवर सेनेचा भगवा फडकला. तर गोरेगावमध्ये पुन्हा जिल्हा परिषदेचे कृषी व पशु संवर्धन समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनाच जनतेने कौल दिला आहे. सेना 9, राष्ट्रवादी 4 तर काँग्रेसने 2 ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.

सोमवारी सकाळी 11 वाजता पारनेर तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत 16 ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांची नावे जाहीर झाली. यात पुन्हा एकदा सेनेला तालुक्यात कौल मिळाला आहे.
ऐन ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने पंचायत समितीच उपसभापती दीपक पवार व पक्ष मार्गदर्शक अशोक सावंत यांनी थेट सुजित झावरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा खालवली. याचा फटका राष्ट्रवादीला बसला.

हीच संधी ओळखून आ.विजय औटी यांनी राष्ट्रवादीचे प्राबल्य असणार्‍या टाकळी ढोकेश्‍वर व ढवळपुरी गटातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या ग्रामपंचायतींवर लक्ष केंद्रीत केले. राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या भाळवणी, ढवळपुरी, पळशी व वनकुटे या ग्रामपंचायतींवर अखेर भगवा फडकला.

गावनिहाय सरपंच व सदस्य पदाची अंतिम यादी पुढीलप्रमाणे : 1) सिध्देश्‍वरवाडी – सरपंच युवराज प्रभाकर गुंजाळ (516 मते) विजयी सदस्य : योगेश भाऊसाहेब नरवडे, रखमाबाई बाबा नरवडे, उज्वला राहुल नखादे, रघुनाथ तुळशिराम कौठकर, विनायक कुशाबा कावरे, संगीता गोरख चत्तर, लताबाई विजय चत्तर विजयी झाले.

2) हत्तलखिंडी – विद्यमान सरपंचांना धक्का, सरपंचपदी इंद्रभान हरिभाऊ शेळके (विजयी)सदस्य : अंकुश दिलीप शेळके, अरविंद शिवाजी आतकर, मीना संतोष शेळके, सुनीता दिनेश गायकवाड, उज्वला संतोष गायकवाड, अलका किरण शेळके, स्वाती अनिल शेळके, नलिनी महेंद्र गायकवाड, सुदाम शंकर साळवे, अंकिता शिवाजी ठुबे, संजीवनी किसन गायकवाड, सतीश भाऊसाहेब शेळके, बाबाजी दत्तात्रय शेळके, बबन गबाजी ठुबे, इंद्रभान हरिभाऊ शेळके,

3) कोहोकडी – सरपंच पदी : साहेबराव नामदेव पानगे(विजयी). सदस्य पदी : नवनाथ सुकदेव खंडेकर, वैशाली बाबाजी गोगडे, चंद्रकला रतन कनिच्छे, विठ्ठल दादाभाऊ चौधरी, विमल तुळशिराम गायकवाड, कविता पोपट चौधरी, बाळू सखाराम गोगडे, खंडू बाजीराव टोणगे, सोनिया ज्ञानदेव गायकवाड, सोमनाथ सीताराम गायकवाड, सरूबाई शंकर गायकवाड.

4) गुणोरे – सरपंच पद : राधाबाई प्रमोद खोसे.विजयी सदस्य : कचरू बाळाजी कारखिले, रंजना रोहिदास ढवळे, दीपाली दत्तात्रय गोपाळे, शैलाबाई अरुण बढे सुभाष गुलाब गाडीलकर, राणी नवनाथ सराफ, दत्तात्रय वामन गाडीलकर, जयश्री एकनाथ मेसे, विठ्ठल राणू खोसे यांचा समावेश आहे.

5) भाळवणी – सरपंचपदी लीलाबाई भाऊसाहेब रोहोकले (विजयी 1455 मते), मिराबाई तरटे (पराभूत 720 मते), उषा रोहोकले (पराभूत 314 मते), वनिता रोहोकले (पराभूत 880 मते). विजयी सदस्य : प्रभाग 1 मधून कोंडीभाऊ तरटे (359मते), सौ. मंगल लहू चेमटे (302), प्रभाग क्रमांक दोन मध्ये रूपाली संदीप व्यवहारे (248), मनिषा कांगुणे (392), प्रभाग क्रमांक तीन मधून संदीप बाबाजी ठुबे (478), शांताबाई मारूती कपाळे (319), सुरज गोविंद भुजबळ (423), प्रभाग क्रमांक चार मधून नितीन मुरकुटे (257), ठकूबाई आप्पा रोहोकले (387), ताराबाई भास्कर रोहोकले (234) व प्रभाग क्रमांक पाच मधून भागुजी सावित्रा रोहोकले (310), रमेश निवृत्ती रोहोकले (323) आणि उषा सीताराम रोहोकले हे उमेदवार विजयी झाले.

6) पिंपळगाव तुर्क – सरपंच पद : गोकुळ वामन वाळुंज (विजयी 388 मते), सरदार छबूलाल शेख (पराभूत). विजयी सदस्यपद : विजय सोपान गवळी, फैय्याज उस्मान शेख, उषा विजय गायकवाड, फर्जना इसाक शेख, सुनील आनंदा शिंदे, सुमन बबन वाळुंज, मनीषा आनंदा वाळुंज हे विजयी झाले आहेत.

7) पळशी – सरपंच पद : मंगल गणेश मधे (विजयी 2076 मते), रूपाबाई मच्छिंद्र दुधवडे (पराभूत 840). विजयी सदस्यपद : राजू महिपती दुधवडे, पल्लवी सुनील जाधव, अप्पासाहेब गंगाधर शिंदे, किरण सर्जेराव सुडके, विजय भिमा पथवे, कोमल संकलेश मोढवे, सुमन गोरख मेंगाळ, रावसाहेब सखाराम उघडे, तुकाराम बिरू झिटे. बिनविरोध सदस्य कविता पाराजी जाधव, राधाबाई रामदास गांडाळ, शिवाजी राजू गायकवाड, बबीता राजू चिकणे यांचा समावेश आहे.

8) गोरेगाव – बाबासाहेब तांबेच्या ग्रामवैभव पॅनलच्या 12 जागा विजयी तर विरोधी ग्रामस्वराज्य पॅनेलचा दारुण पराभव. सरपंचपदी सुमन बाबासाहेब तांबे (विजयी 2017 मते), अभयसिंह काशिनाथ नांगरे (पराभूत), चंद्रकांत रामभाऊ नांगरे(पराभूत), निवडणुकीचा निकाल : सुनील रघुनाथ नांगरे(पराभूत), संपतराव हरिभाऊ नरसाळे (विजयी 605मते), वंदना बाबासाहेब नरसाळे (विजयी 555), वर्षा बाजीराव पानमंद (पराभूत), शोभा सोमनाथ तांबे (विजयी 551मते), जया गणेश नरसाळे (पराभूत), अण्णासाहेब शंकर नरसाळे (विजयी 393), उमाजी भास्कर नरसाळे (पराभूत), स्मिता शिवाजी काकडे (विजयी 422), रंजनाबाई जयसिंग शेरकर (पराभूत), वामन सखाराम चौरे(विजयी 499), कृष्णा भागुजी नरसाळे (पराभूत 322),

शिवराम नामदेव नरसाळे(विजयी 506), त्रिभूवन हिरामण लष्करे (पराभूत), समिंद्राबाई विठ्ठल नरसाळे (विजयी 493), संगीता शिवाजी नांगरे(पराभूत), गणेश भागा नरसाळे (पराभूत), संपत देवराम नरसाळे (विजयी 399), मंदा राजू पातारे(पराभूत 250), संध्या शिवाजी पातारे(विजयी 398), अनुसया संपत नरसाळे (विजयी 451), संजीवनी राजू नरसाळे (पराभूत).

9) वनकुटे/तास – सरपंच पदी : चरपटीनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनल (शिवसेना) विरुद्ध राष्ट्रवादी जनसेवा पॅनलमध्ये लढत झाली. सरपंचपदी राहुल बबन झावरे (विजयी 469), भानुदास बाजीराव गागरे(पराभूत), सदस्यपदी : अर्जुन वसंतराव कुलकर्णी, ताराबाई बबन मुसळे, वर्षा करण बर्डे, बाबासाहेब भाऊसाहेब पिंपळे, बाळासाहेब भाऊसाहेब गागरे, सुनिता अशोक वाबळे, इंदुबाई पंढरीनाथ साळवे, दीपक भाऊसाहेब खामकर, सुमन रामदास बर्डे, गणपत पंढरीनाथ काळनर, रंजनाबाई सीताराम औटी, भीमराज रेवजी गांगड, ताराबाई पोपट काळे,

10) पुणेवाडी – सरपंचपद : बाळासाहेब कोंडिभाऊ रेपाळे (विजयी), मंगल संजय रेपाळे (पराभूत), दत्तात्रय सावळेराम ठाणगे (पराभूत), बाबासाहेब हरिभाऊ चेडे (पराभूत). निवडणुकीचा निकाल : कीर्ती बबुशा लांडे (पराभूत), रत्नाबाई मोहन पुजारी (पराभूत), नंदा फक्कड चेडे (विजयी), राजश्री बाबासाहेब चेडे (पराभूत), जनाबाई मारूती रेपाळे (पराभूत), अरूणा युवराज दुस्मान (विजयी), शोभा विशाल रेपाळे (पराभूत), अश्‍विनी योगेश बोरूडे (पराभूत), संगीता सावकार पोटे (पराभूत), फुलाबाई भास्कर पोटे (विजयी), प्रतीक्षा रमेश डमरे (पराभूत), स्वाती बन्सी रेपाळे (पराभूत), वर्षा प्रकाश पुजारी (विजयी), संजय बजाबा रेपाळे (पराभूत), उत्तम बबन रेपाळे (पराभूत), विशाल प्रकाश दुस्मान (विजयी), सुदाम सुखदेव रेपाळे (पराभूत), दिलीप अप्पाजी पुजारी (पराभूत), नारायण भाऊ चेडे (पराभूत), गणेश भानुदास बोरूडे (विजयी), मंदा सिताराम बोरूडे (पराभूत), सुजाता स्वप्नील पुजारी (विजयी), मिनाबाई मोहन बोरूडे (पराभूत), नारायण गणपत रेपाळे (पराभूत), अमोल ज्ञानदेव रेपाळे (विजयी), अशोक शंकर डमरे (पराभूत), धर्मराज किसन शिंदे (पराभूत), दादाभाऊ गवराम चेडे (पराभूत), गोरख पाराजी पोटे (विजयी).

11) ढवळपुरी- सरपंचपदी डॉ.राजेश किसनराव भनगडे(विजयी)सदस्य : अशोक झुंगाजी फलके, छबुबाई भिकाजी चितळकर, विकास सगाजी भनगडे, प्रियंका नंदकुमार गावडे, वत्सला किसन भुसारी. बिनविरोध 11 सदस्य – संगीता राजू केदार, साहेबराव मानसिंग राठोड, संतराम शिवाजी कुटे, महादू दगडू जाधव, विकास सीताराम आव्हाड, सुनीता दामोदर कुडाळ, पाराजी नथूराम वाव्हळ, चितळकर सुनीता सुखदेव, माणिक बिराजी कोळपे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

12) चोंभूत – सरपंचपदी : शिवाजी झुंबर माळी(विजयी) विजयी सदस्य : बाळासाहेब बाबुराव मेहेर, विद्या अंकुश म्हस्के कल्पना पोपट भालेराव शिवाजी बाळासाहेब दरेकर, रावसाहेब गेणूभाऊ माळी, कल्पना दिलीप घोलप,संतोष पोपट खाडे, सुरेखा हनुमंत पारखे, संगिता सुभाष माळी.13) पाडळी कान्हूर – सरपंच पद : हरीश दत्तात्रय दावभट (707 मते विजयी), राधुजी सावित्रा सिनारे (पराभूत 580), शेतकरी पॅनल विरोधात सहकार पॅनेलमध्ये लढत. शेतकरी 7 तर सहकार 2 जागा विजयीविजयी सदस्य : चंद्रभागा मंजाबापू सुंबे, अनिता भाऊसाहेब सुंबे, राजेंद्र भाऊसाहेब सुंबे, कविता आबा सुंबे, रंजना संतोष सुंबे, गणेश सीताराम सुंबे संपत धोंडिभाऊ काळे, अश्विनी नितीन दावभट, सुरेश रावसाहेब काळे.

14) भोंद्रे – सरपंच : जयश्री विशाल झावरे (विजयी 148), सीमा बबन झावरे, सुरेखा इंद्रभान झावरे, उर्मिला मनोहर झावरे. सदस्यपद : मारूती ठका झावरे (बिनविरोध), मनीषा अरुण झावरे (बिनविरोध), राजेंद्र बाळासाहेब झावरे (विजयी 76), गणेश भास्कर झावरे (पराभूत), अलका शांताराम झावरे (बिनविरोध), नवनाथ सदाशिव शेळके(विजयी 107), संतोष बाळू झावरे (पराभूत), पुष्पा सुधाकर शेळके(विजयी137), मनीषा संतोष झावरे(विजयी 118).

15) करंदी – सरपंच पद : काँग्रेस व सेनेचे नामदेव बबन ठाणगे (विजयी 681 मते), सोमनाथ गवराम चौधरी(पराभूत), शरद निवृत्ती गोरे (पराभूत 562). सदस्यपद : भास्कर दिनकर गव्हाणे (विजयी 332 मते), गोरख देवराम गव्हाणे (पराभूत 152), शारदा पाटीलबा गांगड (विजयी 323), सोनाली विलास चौधरी (विजयी 282), संजना दौलत चौधरी (पराभूत 69), शोभाबाई विश्‍वनाथ गव्हाणे (पराभूत 47), मंगल प्रकाश ठाणगे (पराभूत 117), सुमन दशरथ चौधरी, सीताराम किसन ठाणगे(मते 200), अंकुश महादू ठाणगे (200 मते), मनिषा रामदास ठाणगे (विजयी 203), अंकिता पांडुरंग थोरात (पराभूत 192), मंगल साहेबराव चौधरी (विजयी 203), वैजयंता विजय थोरात (पराभूत 192), पाटीलबा जबाजी ठाणगे (पराभूत 175), दत्तात्रेय तुकाराम ठाणगे (पराभूत 15), अर्जुन राधू ठाणगे (विजयी 211), जितेंद्र जयंवत उघडे (विजयी 198), कल्पेश रमेश उघडे(पराभूत 35), करंदीकर राजेंद्र शंकर (पराभूत 170), मीराबाई रामचंद्र ठाणगे (पराभूत 165), मीना सोपान गांगड (पराभूत 24), सुनीता हार्दिक औटी (विजयी 211 मते).

 

LEAVE A REPLY

*