पारनेरमधील पाच ग्रामपंचायतींसाठी 87 टक्के शांतते मतदान

0

पारनेर (प्रतिनिधी)- जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या पारनेर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीसाठी रविवारी शांतते मतदान झाले. सांयकाळी मिळालेल्या आकडेवारीनूसार या पाच ग्रामपंचायतींसाठी 86.80 टक्के मतदान झाले होते.

तालुक्यातील राजकियदृष्ट्या अतिशय महत्वाच्या समजल्या जाणार्‍या कान्हुरपठार, वाडेगव्हाण या ग्रामपंचायतसह काकणेवाडी, मावळेवाडी, यादववाडी या पाच ग्रामपंचायतच्या निवडणुका पारपडल्या. रविवारी निवडणूका असणार्‍या गावात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. आज (सोमवारी) मतमोजणी होऊन निकल जाहीर होणार आहे. वाडेगव्हाण ग्रामपंचायतया 11 पैकी 7 जागा बिनविरोध झाल्या होत्या.

उर्वरित जागेवर मतदान घेण्यात आले एकुण मतदान 2 हजार 253 पैकी 1 हजार 935 टक्केवारी 85. 88 आहे. कान्हूर पठार एकुण मतदान 5 हजार 299 पैकी 4 हजार 65 टक्केवारी 76.72 टक्के, मावळेवाडी एकुण मतदान 677 पैकी 659 टक्केवारी 97.34 टक्के, यादववाडी एकुण मतदान 1 हजार 89 पैकी 1 हजार 18 टक्केवारी 94.34 टक्केवारी, काकणेवाडी एकुण मतदान1 हजार 48 पैकी 1 हजार टक्केवारी 95.41 टक्के मतदान झाले.

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या कान्हूरपठार व वाडेगव्हाण या गावांचा समावेश या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आहे. जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांचे कान्हूरपठार व पंचायत समितीचे माजी सभापती गणेश शेळके यांच्या वाडेगव्हाण गावाचा या निवडणुकीमध्ये समावेश असल्याने तालुक्याचे लक्ष या गावाच्या निकलाकडे लागले आहे.

LEAVE A REPLY

*