नेवासा : वडाळ्यात सत्तांतर, गोधेगावात चिठ्ठीने संधी

0
नेवासा (तालुका व का. प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींची मतमोजणी काल पूर्ण झाली. प्रथमच थेट जनतेेतून सरपंच निवडणार्‍या या निवडणुकीत वडाळ्यात भाजपाला धक्का बसला त्यांचे स्थानिक नेते दिलीप मोटे यांच्या पॅनलमधील स्वतः मोटे यांच्यासह सरपंचपदाचे उमेदवारही पराभूत झाले.
कांगोणी ग्रामपंचायत राखण्यात आमदार मुरकुटे गट यशस्वी ठरला. भेंडा खुर्द व सुरेशनगर येथे राष्ट्रवादीला यश मिळाले तर गोधेगावात चिठ्ठीच्या साथीने अपक्ष उमेदवार मिनी आमदारकी जिंकण्यात यशस्वी ठरला. गडाख गटाचे गेल्यावेळीप्रमाणे बहुसंख्य ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखले गेले आहे तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांच्या पॅनलने सत्ता मिळवली आहे.
तालुक्यातील निम्म्याहून अधिक सरपंच क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे विजयी झाले आहेत. माका, वडाळा बहिरोबा, माळीचिंचोरा या तिन्ही प्रमुख ग्रामपंचायतींवर त्यांनी वर्चस्व प्राप्त केले आहे. त्याशिवाय शिरेगाव, चिंचबन, हिंगोणी येथेही यश मिळवले आहे. काही ग्रामपंचायतीत स्थानिक आघाड्याद्वारे पॅनल बनवले गेले होते. मुरकुटे गटाचे कार्यकर्ते 5 सरपंच आपले असल्याचा दावा करत आहेत. मात्र कांगोणीतील निर्विवाद सत्ता वगळता या गटाला अन्यत्र निर्विवाद वर्चस्व मिळवता आले नाही.
सरपंचपदाच्या व सदस्यपदाच्या निवडणुकीत वडाळा बहिरोबा येथे भाजपाच्या दिलीप मोटे गटाला मोठा धक्का बसला असून तिथे सत्तांतराची परंपरा कायम राहिली आहे. दिलीप मोटे यांच्यासह सरपंच पदाचे उमेदवार पराभूत झाले आहेत.
दुसर्‍या प्रतिष्ठेच्या माळीचिंचोरे ग्रामपंचायतीचा गड राखण्यात माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे यशस्वी ठरले असून त्यांचा सरपंचपदाच्या उमेदवारासह 9 ग्रामपंचायत सदस्य विजयी होऊन वर्चस्व राखण्यात यश मिळाले असले तरी मतांची संख्या मात्र कमालीची घटली आहे. गेल्यावेळी केवळ एक सदस्य विजयी झालेल्या विरोधकांना 4 जागा जिंकण्यात यश आले असून मतांमधील अंतर 70 ते 75 मतांचे राहिले असल्याने विरोधकांची ताकदही वाढली असल्याचे स्पष्ट झाले.
तालुक्यातील माका ग्रामपंचायतीत क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे सरपंचपदाचे उमेदवार व सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक नाथा विश्‍वनाथ घुले यांचा राजकारणातील प्रवेश यशस्वी ठरला असून त्यांचा थोड्याशा मताने का होईना विजय झाला आहे. या ग्रामपंचायतीत क्रांतीकारीला यश आले.
तालुक्यातील गोधेगाव ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठीच्या निवडणुकीत दोन उमेदवारांना समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठी काढून उमेदवार विजयी घोषित करण्यात आला. विजयी उमेदवाराने अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती.
तालुक्यातील भेंडा व सुरेशनगर या दोन्ही ग्रामपंचायतींत राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळवले. आमदार मुरकुटे यांची सासुरवाडी असलेल्या कांगोणीत अपेक्षेप्रमाणे यश मिळवण्यात ते यशस्वी ठरले. कांगोणीत भाजपा आमदार मुरकुटे यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले.
वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीच्या एका प्रभागासाठी फेरमतमोजणी मागणी अर्ज करण्यात आला. मात्र सदर मागणी उशिराने निकाल घोषित केल्यावर करण्यात आल्याने तहसीलदार यांनी फेटाळून लावली.
निवडणूक मतमोजणीसाठी पाच टेबल लावण्यात आले होते. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू झाली. सरपंच व सदस्यपदासाठी प्रभागनिहाय मतमोजणी पूर्ण करण्यात आली.
दुपारी साडेबाराच्या सुमारास मतमोजणीचे कामकाज पूर्ण झाले. मतमोजणीसाठी निवडणूक असलेल्या गावांतील कार्यकर्त्यांनी परिसरात मोठी गर्दी केली होती. विजयानंतर गुलालाची उधळण करून फटाके फोडले जात होते. तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर, प्रदीप पाठक, अव्वल कारकून भाऊसाहेब मंडलिक आदी अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली. पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सरपंचपदाच्या उमेदवारांना मिळालेली मते –

वडाळा बहिरोबा

विजयी- मीनल चांगदेव मोटे (1636) पराभूत- उज्ज्वला बाबासाहेब मोटे (1225), सुनीता दत्तात्रय मोटे (283), नोटा-10, एकूण मतदान 3154

माळीचिंचोरा
विजयी- सुरेखा एकनाथ धानापुने (1642), पराभूत- आशाबाई संजय नारळे (1219), नोटा- 34, एकूण मतदान- 2895
माका
विजयी-नाथा विश्‍वनाथ घुले (842), पराभूत- अनिल रघुनाथ घुले (830),सहदेव मुरलीधर लोंढे (687), लक्ष्मण तुळशीराम पांढरे (355), बळीराम पुंजा काळे (70), किसनराव आंबुजी भानगुडे (26), नोटा-15, एकूण मतदान-2825.
कांगोणी
विजयी-अप्पासाहेब कारभारी शिंदे (1217), पराभूत- सोमनाथ बाबासाहेब कराळे (874), रामदास बबनराव सोनवणे (72), नोटा-7, एकूण मतदान- 2170.
भेंडा खुर्द
विजयी-सुनील शाबाजी खरात (625), पराभूत- भाऊसाहेब दादा खरात (577), भाऊसाहेब जालिंदर शिंदे (297), मंगल बाबासाहेब अढागळे (116), नोटा-8, एकूण मतदान-1623.
सुरेशनगर

विजयी-पांडुरंग दगडू उभेदळ (378), पराभूत-राजेंद्र नामदेव शिंदे (66), नोटा-1, एकूण मतदान-445.
हंडीनिमगाव
विजयी-गोविंदराव आबाजी जावळे (509), पराभूत- पूजा भिवाजी आघाव (406),अलका राजेंद्र वाघमारे (14), सतीश मारोती पिटेकर (01), नोटा-2, एकूण मतदान- 932.
अमळनेर

विजयी-भारती अच्युतराव घावटे (592), पराभूत- इंदुबाई सोपान सुपनर (505), प्रमिला नामदेव पवार (160), कुंदा कर्णासाहेब पवार (64), नोटा- 6, एकूण मतदान- 1327.
शिरेगाव
विजयी-भारती रावसाहेब पवार (839), पराभूत- अर्चना प्रदीप माळी (620), रोहिणी किसन मोरे (215), कलाबाई रामदास बर्डे (59), नोटा-6, एकूण मतदान- 1739.
गोधेगाव
विजयी-राजेंद्र शिवाजी गोलांडे (356) चिठ्ठी टाकून विजयी, पराभूत-बाबासाहेब गोविंद शेळके (356), दिलीप दत्तात्रय शेलार (313), नोटा-11 एकूण-1036.
हिंगोणी
विजयी-प्रकाश तुकाराम झिने (415), पराभूत- श्रीकांत रमाकांत सोनवणे (359), नोटा-2, एकूण मतदान- 776.
खुपटी
विजयी-राजश्री गोरक्षनाथ तनपुरे (776), पराभूत- राधाबाई भीमराज कार्ले (584), नोटा-5, एकूण मतदान- 1465.
चिंचबन
विजयी-विठ्ठल कोंडीराम शिंदे (250), पराभूत- गोरक्षनाथ गणपत काकडे (242), नोटा-2, एकूण मतदान- 494.

नेवाशातील ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी व पराभूत उमेदवारांची मते –

हंडीनिमगाव

प्रभाग 1-विजयी- नवनाथ पिराजी पिटेकर (173), कविता शिवाजी जाधव (159),करुणा भारत इंगळे (154). पराभूत- ज्ञानेश्‍वर रुस्तूम भणगे (115), ताराबाई अरुण जाधव (123), मीनाबाई भाऊसाहेब गरड (132).
प्रभाग 2- विजयी- रामभाऊ बन्सी धनळे (147), अशोक त्रिंबक पिसाळ (156), मथुराबाई एकनाथ पिटेकर (155). पराभूत- विजय मच्छिंद्र धनाळे (110), रतन रावसाहेब जावळे (106), रेखा दिगंबर पिसाळ (106).
प्रभाग 3-विजयी- नितीन भास्कर कांबळे (236), अनिता अशोक कांबळे (234), जयश्री संतोष भणगे (204).
पराभूत- संपत सुधाकर कांबळे (135) सरुबाई नागू कांबळे (124), कमल माणिक चावरे (167).

भेंडा खुर्द

प्रभाग 1 विजयी-लंकाबाई संजय गजरे (361), विजयाबाई बहिरूनाथ नवले (390) पराभूत- रंजना भाऊसाहेब गोंडे (100), सुवर्णा संदीप चौधरी (139).
प्रभाग 2- विजयी-हिरालाल सीताराम धनवडे (273), सुनीता संदीप खरात (340), सुमन गोरख मोरे (386) पराभूत-पिराजी नारायण धनवडे (146), इंदूबाई बाबासाहेब नवले (8), वैभव उद्धव नवले (107), रावसाहेब उत्तम महापुरे (39), रंजना भाऊसाहेब खरात (231), वंदना बाळू महापुरे (165).
प्रभाग 3-विजयी-उमेश सुभाष मंडाळे (266), रवींद्र काशिनाथ नवले (308), संगीता सखाराम नवले (273). पराभूत- अर्जुन किसन महापूर (89), बाळू भाऊसाहेब महापूर (181), सुजय अरुणराव नवले (229), इंदूबाई बाबासाहेब नवले (22), शोभा दत्तू बाविस्कर (22), विजया नामदेव महापुरे (210).
कांगोणी

प्रभाग 1 विजयी-सोमनाथ दगडू गांगले (298), अरुण दत्तात्रय गाडेकर (249), सोनाली तुकाराम ठोंबळ (298). पराभूत- सोपान विठ्ठल वीरकर (174), ज्ञानदेव तुकाराम कोकाटे (222), मंदा सुभाष भालेकर (171).
प्रभाग 2-विजयी – कुसूम बाबासाहेब शिंदे (191), सुनीता सखाहरी कर्डिले (210). पराभूत- राजू भाऊसाहेब मोकाटे (137), छाया दिलीप कुसळकर (118).
प्रभाग 3-विजयी-लक्ष्मण उत्तम वडागळे (251), छाया दिलीप वडागळे (293), निर्मला नवनाथ शिंदे (266). पराभूत- कंकर गोपीनाथ वडागळे (232), प्रतीभा अमोल वडागळे (191), जयश्री बाबासाहेब चौधरी (215)
प्रभाग 3- विजयी- नवनाथ कचरू सोनवणे (488), मंगल किरण पुंड (533), ताराबाई पोपट कर्डिले (558). पराभूत- बजरंग जनार्दन तुपे (375), पुष्पा रामभाऊ कराळे (322), सुवर्णा ज्ञानदेव ठोंबळ (354).
अमळनेर

प्रभाग 1 विजयी-कांतीलाल यशवंत पवार (256), अच्यूत पंढरीनाथ घावटे (260), अलकनंदा अरुण धात्रक (266). पराभूत- किशोर विनायक रोकडे (124), शरद शिवराम चव्हाण (117), मंदा सुनील माकोणे (109),
प्रभाग 2 विजयी- रतन रेणूजी कनगरे (358), नवनाथ लक्ष्मण डोईफोडे (205), मिनाबाई सुरेश घावटे (233). पराभूत-श्रीकांत भिवराव भोकरे (215), यमुना चंद्रकांत बेम्बळे (203), ताराबाई रंगनाथ कोळेकर (175), शांताबाई चांगदेव मोरे (157).
प्रभाग-3-विजयी-जया पंकज बेम्बळे (267), बबबाई काशिनाथ आयनर (243), अंजनाबाई दिलीप बाचकर (224). पराभूत- कांताबाई बाळासाहेब राजगुरु (45), लक्ष्मीबाई गंगाधर आयनर (91), कुसूम राजेंद्र पाडळे (71), कुसूमबाई कर्णासाहेब पवार (50), चंद्रभागा भगिरथ माकोणे (45).
माका

प्रभाग 1 विजयी-देवीदास जयवंत भुजबळ (178), सुमन अर्जुन घुले (179), पराभूत- शहदेव मच्छिंद्र लोंढे (141), संभाजी भागीनाथ लोंढे (159), आशाबाई ज्ञानदेव थोरात (146), तृप्ती संतोष भुजबळ (96), मंदा सखाराम लोंढे (178).
प्रभाग 2- विजयी- सुदाम नामदेव घुले (195), शोभा गोरक्षनाथ घुले (172). पराभूत- ज्ञानेश्‍वर नवनाथ घुले (172), संदीप अशोक दारकुंडे (94), म्हातारदेव हनुमंत सोलट (46), शोभा एकनाथ भुजबळ (30), अलकाबाई सुनील शिंदे (142), शोभा कचरु सानप (162).
प्रभाग 3-विजयी दिगंबर तुकाराम आखाडे (163), जयश्री ज्ञानदेव सानप (185), वनिता दिगंबर फलके (188). पराभूत- संजय गंगाधर गाढे (157), भाऊसाहेब गंगाधर घुले (115), द्वारकाबाई जनार्दन नांगरे (7), दत्तात्रय विक्रम शिंदे (22), विमल दत्तात्रय नांगरे (107), कल्पना देवीदास भानगुडे (110), उषाताई अशोक वाघमोडे (64), मीराबाई मोहन पागिरे (125), स्वाती प्रकाश मुळे (146).
प्रभाग 4- विजयी- उषा सत्यवान पिटेकर (141), रमेश निवृत्ती कराळे (205), आशाबाई दिगंबर शिंदे (163). पराभूत- बाबासाहेब दशरथ पिटेकर (138), प्रयागाबाई मधुकर शिरसाठ (138), रावसाहेब यादव शिरसाठ (127), रवींद्र भाऊसाहेब खेमनर (105), बबन विठ्ठल भानगुडे (86), मुरलीधर गणपत रुपनर (148), जनाबाई रामदास दारकुंडे (146), सुमन राधाकिसन भानगुडे (143), कमलबाई मुरलीधर लोंढे (87).
प्रभाग 5- विजयी-आदिनाथ रामभाऊ म्हस्के (280), सुशीलाबाई खंडेराव गुलांगे (239), कमलबाई मुरलीधर लोंढे (222). पराभूत- बाबासाहेब पंढरीनाथ लोंढे (162), शहादेव रामनाथ लोंढे (162), ज्ञानदेव अण्णासाहेब लोंढे (77), सुनंदा बाबासाहेब तवार (150), सुनीता किसन पांढरे (128), संगीता मच्छिंद्र भुजबळ (207), शिला दत्तात्रय म्हस्के (133), सीताबाई रंगनाथ लोंढे (179), वनिता अमोल हाके (102).
माळीचिंचोरा

प्रभाग 1 विजयी-मयुर दत्तात्रय शेंडे (298), शोभा अण्णासाहेब अहिरे (281). पराभूत- पांडुरंग भानुदास शेंडे (249), अलका अशोक अहिरे (254).
प्रभाग 2- विजयी -योगीता अरुण नजन (363), परिगाबाई कारभारी चिंधे (396). पराभूत- नंदाबाई रामू नजन (269), नानाबाई भानुदास शेंडे (235).
प्रभाग 3- विजयी- संतोष विठ्ठल पुंड (190), बाळासाहेब बाबुराव चिंधे (181), वैशाली शिवाजी देव्हारे (214). पराभूत- कैलास लहानू चौधरी (167), अशोक भाऊसाहेब चिंधे (176), विद्यादेवी भीमराज शेंडे (146).
प्रभाग 4- विजयी- राहुल राजेंद्र वाघमारे (385), संजय पंढरीनाथ चिंधे (378), जयश्री विजय पुंड (338). पराभूत- शीला अशोक वाघमारे (201), संतोष बबन चिंधे (204), चंद्रकला प्रमोद चौधरी (239),
प्रभाग 5- विजयी- संजय कारभारी पुंड (416), शोभा संतोष शेंडे (418), अनिता बहिरुनाथ पारखे (436). पराभूत- अविनाशबापू चंद्रभान पुंड (306), सुनीता सुभाष गायकवाड (294), चंद्रकला गुलाब वाघमारे (289).
वडाळा बहिरोबा

प्रभाग 1 विजयी-पावलस गंगाधर गाढवे (290), विजुबाई चतुरशिंग ओनावळे (287), पराभूत- सुशील शिमोन गिरी (132). वर्षाबाई दिलीप मोटे (134).
प्रभाग 2- विजयी- राजेंद्र दादापाटील मोटे (351), रोहिणी दत्तात्रय मोटे (321). पराभूत- श्रीकांत भानुदास मोटे (105), ज्योती संतोष पतंगे (132).
प्रभाग 3- विजयी- अमोल श्रीराम पतंगे (417), राहुल नारायण मोटे (380), चंद्रभागा विश्‍वनाथ मोटे (335). पराभूत- शिवनाथ बाजीराव पवार (246), शिवाजी हरिभाऊ शेळके (283), विद्या बाबासाहेब पतंगे (228).
प्रभाग 4- विजयी- दशरथ लक्ष्मण कांबळे (379), प्रियंका विनोद पवार (329), अलका बाळासाहेब जायकर (354). पराभूत-चंद्रकला दशरथ कवडे (377), रेखा हरिभाऊ पवार (315), मीनल अरुण पवार (126), अलका बाळासाहेब जायकर (354).
प्रभाग 5- विजयी- अतिश आप्पासाहेब मोटे (545), लता राजाराम नवगिरे (540), जयश्री दीपक घाडगे (553). पराभूत- दिलीप उत्तमराव मोटे (264), साखरबाई रखमाजी शिंदे (264), ज्योती राहुल मोटे (256).
हिंगोणी

प्रभाग 1 विजयी-ज्ञानदेव रंगनाथ सोनवणे (115), इंदुमती चंद्रकांत झिने (116). पराभूत- जालिंदर नाथा सोनवणे (109), रोहिणी राजेंद्र झिने (107).
प्रभाग 2- विजयी- ज्ञानेश्‍वर अण्णा खंडागळे (182), अनिता भाऊसाहेब फाटके (190). पराभूत- उत्तम राहू शिंदे (139), सुवर्णा ज्ञानेश्‍वर जमधडे (135).
प्रभाग 3- शिवाजी सोपान सोनवणे (125), मनीषा संतोष झिने (115), रेखा भारत झिने (123),. पराभूत-बाबासाहेब आसाराम झिने (100), मुक्ताबाई अशोक झिने (112), लता बाबासाहेब झिने (99).
शिरेगाव

प्रभाग 1 विजयी-खंडेराव अक्कलवान जाधव (372), बाळासाहेब काशिनाथ जाधव (380), पार्वताबाई शंकर जाधव (391). पराभूत- दादासाहेब शांतिलाल तुवर (319), संजय सखाहरी जाधव (308), सरुबाई नानासाहेब जाधव (294).
प्रभाग 2- विजयी-निरंजन बाजीराव होन (349), भारती रावसाहेब पवार (311), मोहिनी भाऊसाहेब तुवर (284). पराभूत- तुकाराम गिताराम कानडे (194), विमल यशवंत बर्डे (227), प्रमिला धीरज तुवर (258).
प्रभाग 3- विजयी-जालिंदर विश्‍वनाथ बर्डे (259), अर्चना रमेश तुवर (257), अलका अंकुश बर्डे (262). पराभूत- रावसाहेब अनंता बर्डे (237), दमयंती निवृत्ती तुवर (236), सिंधूबाई संतोष बर्डे (226).
चिंचबन

प्रभाग 1 विजयी-अण्णासाहेब नाना जाधव (92), आसराबाई सुभाष रजपूत (94). पराभूत- बाळासाहेब रामदास जाधव (74), सत्यभामा सुधाकर शिंदे (72).
प्रभाग 2 विजयी- दत्तात्रय बहिरू रजपूत (107), कमल पोपट बर्डे (116). पराभूत- शंकर रंगनाथ माळी (92), मुक्ताबाई मच्छिंद्र रजपूत (83).
प्रभाग 3 विजयी- कानिफनाथ पद्मनाथ चव्हाण (78), सुनीता विठ्ठल शिंदे (67), सुनीता छगन बनसोडे (65). पराभूत- सत्यभामा सुधाकर शिंदे (49), शीलाबाई सखाराम मापारी (59), शारदा सोपान चव्हाण (60).
गोधेगाव

प्रभाग 1- विजयी- अशोक जनार्धन औटी (191), सुनीता ज्ञानेश्‍वर आरगडे (182). पराभूत- अनिल सीताराम पठाडे (155), शायारा अब्बास शेख (161).
प्रभाग 2 विजयी- किरण मोहिनीराज जाधव (156), सुवर्णा गोपीचंद पल्हारे (179), सुमन सुनील गव्हाणे (142). पराभूत- नामदेव भाऊसाहेब ठोंबरे (122), कौशल्याबाई मच्छिंद्र पल्हारे (98), छाया दत्तात्रय अवसरमल (129).
प्रभाग 3- विजयी- रामनाथ बाबुराव माली (223), आशाबाई कचरू पठाडे (219). पराभूत- संदीप लहानू नरोडे (175), कडूबाई अशोक जाधव (181).
खुपटी

प्रभाग 1- विजयी- मंदा अण्णासाहेब सकट (274), वैशाली मधुकर गव्हाणे (273). पराभूत- संगीता अनिल कांबळे (130), नंदा गोवर्धनदास गव्हाणे (129).
प्रभाग 2- विजयी- सोन्याबापू कुंडलिकराम चौधरी (357), ज्योती योगेश शिंदे (343). पराभूत- नामदेव मोहन शिर्के (234), रुख्मिनी विठ्ठल शिर्के (244).
प्रभाग 3- विजयी- शशिकांत एकनाथ घोरपडे (296) पराभूत- संगीता अनिल कांबळे (160).

LEAVE A REPLY

*