नगर तालुक्यात सरासरी 84 टक्के मतदान

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील 28 गावांसाठी शनिवारी शांततेत 84 टक्के मतदान झाले. सारोळा कासार, सोनेवाडी टाकळी येथे किरकोळ वादावादी झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
मात्र त्यानंतर परिस्थीती नियंत्रणात आल्याने मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. सरपंचपदासाठी मोठी चुरस असल्याने एका-एका मतांसाठी संघर्ष पाहवयास मिळाला-.
तालुक्यात सकाळ पासून उत्साहात मतदानाला सुरूवात झाली.सरपंचपदासाठी प्रथमच मतदारांना मतदान करण्याची संधी मिळाल्याने मतदारांमध्ये विशेष कुतुहल होते.
मात्र गावांमध्ये यासाठी मोठी चुरस निर्माण झाल्याने एक एक मत गोळा करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती. कार्यकर्ते मतदारांना ने-आण करतांना दिसत होते.दुपारी उन्हाचा पारा चढ़ल्यानंतर मतदार घराबाहेर पडले नाही.
सायंकाळी चार नंतर पुन्हा रांगा लागल्या होत्या. तहसिलदार सुधीर पाटील व त्यांची यंत्रणा सर्व गोष्टींवर लक्ष ठेऊन होती. पोलिस बंदोबस्त चोख होता.
सारोळा कासार येथे उमेदवारांचे चिन्ह असल्याच्या छोट्या चिठ्ठ्या वाटप होत असल्या कारणाने एका गटाने आक्षेप घेत मतदान बंद करण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन्ही गटात जमाव जमा झालयाने तणाव वाढला.
मात्र, पोलिसांनी हरतक्षेप केल्यानंतर परिस्थीती नियंत्रणात आली. सोनेवाडी (चास ) व टाकळी खातगाव, नारायण डोहो येथे ही अशाच प्रकारचा तणाव होऊन दोन्ही गट आमने- सामने उभे राहिले.
मात्र, पोलिसांनी मध्यस्ती करत किरकोळ वाद मिटवले. संवेदनशिल वाटणारे वाळकी, नागरदेवळे, नेप्ती, बाबुर्डी बेंद, कापूरवाडी येथे मात्र कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही.

LEAVE A REPLY

*