कर्जत-जामखेडमध्ये भाजपा एक्सप्रेस सुसाट

0

जामखेडमध्ये शिंदे समर्थक विजयी

जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या रत्नापूर, शिऊर व राजुरी या तीनही ग्रामपंचायतींवर सरपंचपदी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या समर्थकांची वर्णी लागल्याने तीनही ग्रामपंचायतींवर भाजपाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

शिऊर सरपंचपदी हनुमान अंकुश उतेकर (1154 मते), राजुरी सरपंचपदी गणेश श्रीराम कोल्हे (947 मते), रत्नापूर सरपंचपदी दादासाहेब माधव वारे (925 मते) हे विजयी झाले आहेत.रत्नापूर ग्रामपंचायत सदस्यपदी महारनवर शाहजी ज्ञानदेव, माशीमबी पठाण, शेख रसूल रहिम (बिनविरोध), अशोक दगडू ढमडेरे (333 मते), सारिका शरद मोरे (361 मते), जगताप राजश्री धनराज (334 मते), नलवढे सुजित बाबुराव (330 मते), रतन गोरख राजगुरू (322 मते), संगीता लालासाहेब ढवळे (332 मते) भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांच्या गटाच्या सर्व जागा विजयी झाल्या.राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे यांच्या पॅनलला आपले खातेही उघडता आले नाही.

राजुरी सदस्यपदी : कोल्हे मच्छिंद्र युवराज (358 मते), सदाफुले संगीता सुनील (372मते), कोल्हे संजीवनी बबन (430 मते), घुले बाबासाहेब रामदास (184 मते), खाडे आत्माराम सिताराम.( 164 मते), खाडे कुसूम रामदास (158 मते), लटपटे विजय चंदकांत (279 मते), साखरबाई भगवान कोल्हे (302 मते), काळदाते शीतल किरण (278 मते).
शिऊरच्या सदस्यपदी अहिल्याबाई देवकाते, समुद्र प्रिया भगवान ह्या बिनविरोध निवडून आल्या. तर आकाश अभिमान निकम (312 मते), रंजना अंकुश तनपुरे (526 मते), पिपरे भाऊ बारीकराव (511मते), फाळके शेवक शाहजी (447 मते), निकम गयाबाई मच्छिंद्र (324), माने बापूसाहेब प्रल्हाद 325 मते), लटके स्वाती सिध्देश्वर (406 मते).

कर्जत (प्रतिनिधी) – कर्जतमधील 8 तर जामखेडमध्ये 3 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. या दोन्ही तालुक्यांत पालकमंत्री राम शिंदेची असलेली पकड या निवडणुकीतून दिसून आली.
कर्जतमध्ये भाजपाचे 5, काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सरंपच विजयी झाल्याचा दावा करण्यात आला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने 4 सरपंच निवडून आल्याचा दावा युवक अध्यक्ष नितीन धांडे यांनी केला आहे. बहिरोेबावाडी, म्हाळंगी, निंबे, कौडाणे, मुळेवाडी, यांचा समावेश आहेेेे.

अळसुदे ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 1 मध्ये कविता मनोज गाडे व माधवी अनिल गाडे यांना प्रत्येकी 334 समान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यामध्ये माधवी अनिल गाडे यांचा विजय झाला. तर असाच प्रकार निंबे ग्रामपंचायतीमध्येही झाला. दत्तात्रय मारूती सलगर हे चिठ्ठीवर नशीबवान ठरले. कौडाणे ग्रामपंचायतीचा निकालामध्ये गोंधळ उडाला. यावेळी विजयी समजून पराभूत उमेदवाराच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. यामुळे विजयी उमेदवार पुन्हा निकाल पाहण्यासाठी आले व खात्री केल्यावर त्यांनी जल्लोष केला. म्हाळंगंी ग्रामंपचायतीचा निकाल जाहीर होताच दोन गटांमध्ये जोरदार मारामारी झाली मात्र,पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर प्रकरण निवळले.

राज्यामध्ये गाजलेल्या कोपर्डी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. याठिकाणी सत्तापरीर्वतन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड व महेंद्र गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी सूर्यभान सुद्रिक यांनी बाजी मारली. अळसुदे ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका मीनाक्षी साळुुंके,व काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या विरोधात पालकमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी ताकद पणाला लावली होती.

यात बाळासाहेब साळुंके यांच्या नेतृत्वाखालील गटाने बाजी मारली. भाजपा तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांच्या जिल्हा परीषद गटामध्ये चार ग्रामपंचायतीची निवडणूक होती या चारही ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे.
तालुक्यातील आठ ग्रांमपंचायतींचे सरपंच खालील प्रमाणे : कोपर्डी- रोहिणी सूर्यभान सुद्रिक, बहिरोबावाडी- विजय पोपट तोरडमल, कापरेवाडी- प्रमिला संतोष खळगे. अळसुंदे- एकनाथ पांडुरंग वाघमारे, निंबे- रामचंद्र तुकाराम खामगळ. कौडाणे- जगधने वैशाली दीपक, मुळेवाडी- बबन बबासाहेब मुळे, म्हाळंगी- मंदाकिनी महेश जगताप.

निंबे ग्रामपंचायतीमध्ये सरंपच गटाच्या 3 जागा निवडून आल्या तर विरोधकांच्या पाच जागा आल्या आहेत. बहिरोबावाडी येथे पाच सत्ताधारी तर विरोधकांच्या 4, अळसुंदे येथे सत्ताधारीच्या आठ तर विरोधकांच्या 3 जागा आल्या, कोपर्डी येथे सत्ताधारी 6 तर विरोेधकांच्या 3, म्हाळंगी येथे सत्ताधारी 8 तर विरोधकांची 1 जागा निवडून आली आहे.
विजयी उमेदवार खालील प्रमाणे
कापरेवाडी- शीतल तुकाराम मोडके, मधुकर रवींद्र कापरे, मंगल दादा गायकवाड. दादा लक्ष्मण शिंदे, सुभाष कोंेडीबा खराडे, वनिता युवराज तोरमल, आदिनाथ जालींदर गोळे, बंडाबाई तात्या कदम , मंगल साळुजी शिंदे. बहिरोबावाडी – मनोज बाळासाहेब तोरडमल, सचिन भाउसाहेब लाळगे, अंजना कांतिलाल तोरडमल. राजू किसन तांदळे, गंगुबाई सखाराम शिंगाडे, सुमन भाउसाहेब लष्कर, भाउसाहेब दिगंबर तोरडमल, अर्चना यशवंत पठाडे, मंदा पठाडे.
निबें – ग्रामपंचायत वैशाली शिवाजी खामगळ, दादासाहेब भास्कर खामगळ, दत्तात्रय मारूती सलगर, मनीषा रवींद्र कोपनर, जनाबाई राजेंद्र कोपनर, अभिमन्यू अभिमान गलांडे, विमल केरा भिसे.
अळसुंदे – बाळासाहेब गुलाब अनारसे, अनारसे श्रीरंग नारायण, माधवी अनिल गाडे, विजय गोरख आढाव, उषा अनिल अनारसे, बाळू भानुदास बरकडे, अनिता साहेबराव देशमुख, मीराबाई रामदास बरकडे, एकनाथ वामन सांळुके, वृशाली कांतिलाल पालवे, सुनीता उत्तम देवकाते.
कौडाणे – दीपक धनाजी सूर्यवंशी, हिराबाई रामदास सुद्रिक, गौतम नारायण सुद्रिक, सुनीता राजेश गंगावणे
नितीन पांडुरंग गंगावणे, जनाबाई भाउसाहेब सुद्रिक, सुवर्णा लालासाहेब गलांडे,
मुळेवाडी – अरुण विठ्ठल मुळे, सुनीता सुरेश मुळे, सुनील नामदेव मुळे, कविता प्रकाश मुळे, भाउसाहेब पांडुरंग जगताप, संगीता अनिल जगदने, सुनीता देवीदास मुळे.
माळंगी – संजू केरबा शेटे, गहिनीनाथ मारूती डोबांळे, अंजाबाई बारीकराव मासाळ, संदीप बापू शेेगडे, आश्‍विनी राजेंद्र कदम, वर्षा दादा नलवडे, जयबुन मेहबूब बागवान, सचिन आकु्रर वाघमारे, ज्योती सुनील जगताप.
कोपर्डी- शिवाजी चंद्रकांत भवाळ, नानासाहेब कुंडलीक सुद्रिक, छाया संतोष सुद्रिक, अशोक मारूती सुद्रिक, रोहिणी लक्ष्मण कानडे, प्रेमलता अंकुश शिंदे, लालासाहेब काशिनाथ सुद्रिक, शाहीनाज मुबारक पठाण, अंजना बंकट सुद्रिक.

LEAVE A REPLY

*