अकोलेतील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

0

सात राष्ट्रवादी, तीन भाजप तर सेनेला अवघी एक जागा

अकोले (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींपैकी सात गावांचे सरपंच हे राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले आहेत, तर भाजपला तीन व सेनेला एका सरपंच पदावर समाधान मानावे लागले.
तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाला होत्या. त्यातील शिळवंडीची बिनविरोध झाली. उर्वरीत 10 ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान झाले होते.
काल सोमवारी तहसील कार्यालयात दहा वाजता मतमोजणीस सुरुवात झाली.अवघ्या एक तासात संपूर्ण निकाल घोषित करण्यात आले. यातील काही ठिकाणी सरपंचपदी राष्ट्रवादी, भाजप व सेनेचा उमेदवार विजयी झाला असला तरी तेथील ग्रामपंचायती मात्र त्यांच्या ताब्यातून विरोधी गटाकडे गेल्याने गड आला पण सिंह गेला अशी स्थिती निर्माण झाली आहे.
काल निवडणूक निकाल लागलेल्या ग्रामपंचायतींपैकी मुरशेत,भंडारदरा, आंभोळ, लहीत खुर्द, सोमलवाडी व डोंगरगाव या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. शेंडी, गुहिरे व वाकी या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत, तर चास येथे सेनेचा अधिकृत उमेदवार विजयी झाला आहे.
परंतु चास व लहीत खुर्द मध्ये सेनेचे सरपंचपदाच्या उमेदवारांसह 28 सदस्य विजयी झाल्याचा दावा तालुकाप्रमुख मच्छिन्द्र धुमाळ यांनी केला आहे. तर सेनेचे युवा नेते सतीश भांगरे, जि प. चे माजी सदस्य बाजीराव दराडे, पं. स. उपसभापती मारुती मेंगाळ, सदस्य देवराम सामेरे तसेच दीपक पथवे यांच्या नेतृत्वखाली सेनेच्या दुसर्‍या गटाने आंभोळ ग्रामपंचायतीवर भगवा फडकल्याचा दावा केला आहे.
भाजपाने शेंडी, गुहिरे, वाकी व मुरशेत चार ग्रामपंचायतींसह 39 सदस्य विजयी झाल्याचा दावा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत तालुका पातळीवरून सत्ताधारी व विरोधी पक्ष दावे -प्रतिदावे करत असले तरी निवडून येणार्‍या उमेदवाराला गावपातळीवर सर्वांचीच मदत घ्यावी लागत असते.
काही राजकीय दृष्टय्या जागृत गावांत पक्षीय पातळीवर उमेदवारांची रस्सीखेच असते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी सरपंच व सदस्यांचा पक्ष कार्यालयात माजी मंत्री मधुकरराव पिचड,आमदार वैभवराव पिचड, तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव व सरचिटणीस यशवंत आभाळे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत समजल्या जाणार्‍या चास ग्रामपंचायतीवर सेनेचे नेते कैलास शेळके यांच्या नेतृत्वाखालील सरपंचपदाचे उमेदवार बाळासाहेब शेळके हे विजयी झाले. त्यांनी लिंगेश्वर विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य भागवत वाडेकर यांचा तिरंगी लढतीत पराभव केला.
राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन शेळके हे तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. मात्र ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळाले. माजी सरपंच वैशाली विक्रांत शेळके यांचा सुनीता रावसाहेब शेळके यांनी दारुण पराभव केला आहे.
डोंगरगाव ग्राम पंचायतच्या बहुरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विठ्ठल उगले यांच्या नेतृत्वाखालील युवक कार्यकर्ते बाबासाहेब उगले हे विजयी झाले.
त्यांनी सेना भाजप युतीचे अमोल उगले, राष्ट्रवादी चे बंडखोर शंकर उगले व सुरेश हांडे यांचा पराभव केला. येथील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
लहीत खुर्द येथे सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे गेली 25 ते 30 वर्षांपासून सत्ता उपभोगणारे माजी सरपंच डॉ. सुभाष गोडसे यांचा सेनेच्या पाठींब्यावर उभे असलेले राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार अर्जुन गावडे यांनी सरळ लढतीत पराभव केला. येथे ग्रामपंचायतीवर सेनेने बाजी मारली आहे.
तर आंभोळ येथे अगस्ती पतसंस्थेचे शाखाधिकारी कोंडीबा वाजे हे विजयी झाले. येथे राष्ट्रवादीच्याच दोन गटांत लढत झाली.
भांगरे कुटुंबांची सत्ता असलेल्या शेंडी येथे दोन चुलत भावांत लढत झाली. चुरशीच्या लढतीत पं. स.चे माजी सदस्य दिलीप भांगरे यांनी त्यांचे चुलत भाऊ विकास सोसायटीचे चेअरमन विजय भांगरे यांचा पराभव केला. मात्र त्यांना मोठे मताधिक्य मिळविता आले नाही.
प्रथमतः आदिवासी भागातील तर त्यानंतर बिगर आदिवासी भागातील ग्रामपंचातींसाठी मतमोजणी करण्यात आली. निकाल घोषित झाल्यानंतर उमेदवार व त्यांचे समर्थक गुलालाची मुक्त उधळण करत आनंदोत्सव साजरा करत होते, तर पोलीस प्रशासनाच्या वतीने विजयी झालेली मंडळे व उमेदवारांना मिरवणुका न काढण्याच्या लेखी सूचना देण्यात येत होत्या.
अनेक ठिकाणी प्रस्थापितांना डावलत तरुणांनी सत्ता काबीज केल्याचे चित्र समोर आले. सरपंच पदासाठी प्रथमच थेट जनतेतून निवडणूक झाल्यामुळे मतदारराजाला अनेक ठिकाणी सुशिक्षित व चारित्र्यवान उमेदवार निवडून देता आले.
तहसीलदार मनोज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार जगदीश गाडे, नायब तहसीलदार भाऊ भांगरे यांच्या सह निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्व शासकीय खात्यांचे अधिकारी यांनी मतमोजणी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. तर पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व राजूरचे सहाय्क पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या नेतृत्वाखाली अकोलेचे उपनिरीक्षक नितीन बेंद्रे, विकास काळे व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

वाकी व मुरशेत येथील सरपंचपदाच्या निवडणुकीच्या निकालाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. प्रत्यक्षात जे जिंकले त्यांच्या ऐवजी जे पराभूत झाले त्यांनीच विजयी झाल्याचे समजून गुलालाची उधळण केली. मात्र थोड्याच वेळात वस्तुस्थिती स्पष्ट झाली. अगोदर पराभूत झाल्याचे समजून जे नाराज झाले होते, त्यांचे चेहरे आनंदाने फुलले तर आधी विजयाचा गुलाल अंगावर घेणार्‍यांच्या पदरी निराशा आली.

सविस्तर निकाल पुढील प्रमाणे-
चास-सरपंचपदी बाळासाहेब रामभाऊ शेळके (विजयी-596 मते), पराभूत- भागवत वाडेकर-486 व शेळके 374.
प्रभाग 1-विजयी-बाळासाहेब महादू शेळके-310, सुनीता रावसाहेब शेळके -372 व लीलाबाई बाळासाहेब शेळके -300, पराभूत-दीपक शेळके-232, वैशाली विक्रांत शेळके-165 व सुजाता भाऊसाहेब गोडसे-235
प्रभाग 2-विजयी -बाळासाहेब सावळेराम शेळके-202, नीलेश तबाजी दुर्गुडे-207 व मीराबाई गोरक्ष कहाणे -256, पराभूत-अंकुश खैरे-186, राहुल शिंदे-174, रंजना मंगेश शेळके-177 व नितीन शेळके-87.
प्रभाग-3-विजयी-राजाराम शेळके-266, सुनीता अंकुश शेळके-255, कल्पना विष्णू घोडे-बिनविरोध, पराभूत-स्वप्नील शेळके-202 व रेश्मा संभाजी शेळके-205.
लहीत खुर्द-सरपंच विजयी-अर्जुन गावडे- 666, पराभूत डॉ. सुभाष गोडसे-481, नोटा-6.
सदस्य-विजयी-किशोर गोडसे-239, कडाळे सुमन भाऊसाहे-230, गोडसे मीराबाई रामदास-236, संतोष माळी-174, विशाखा संतोष धुमाळ-159, राहुल गोडसे-235 तर राम गोडसे, जाधव सोनाली ज्ञानेश्वर व गोडसे आशाबाई संदीप.
डोंगरगाव-सरपंच विजयी-बाबासाहेब उर्फ नामदेव उगले -630,पराभूत -अमोल उगले -449, हांडे -449 व शंकर उगले -172
बिनविरोध सदस्य -देवराम आगिवले, संतोष कदम, उगले संगीत दत्तू, मेंगाळ अनिता रामदास, उगले अश्विनी बाबासाहेब, उगले योगिता संतोष, उगले भारती सुनील, रामदास उगले, संतोष सरोदे, उगले कविता अरुण व अशोक उगले.
आंभोळ -सरपंच पद -विजयी -कोंडीबा वाजे -530
सदस्य विजयी-चेतन साबळे -301, नामदेव साबळे -187, शेवंते अलका बाळासाहेब -298, दत्तात्रय साबळे -280 व चौधरी मंदा गोरक्ष -270, चौधरी सुनीता सुनील व सोमनाथ तिटकरे
वाकी -सरपंच विजयी -सीमा राम सगभोर -238,
सदस्य विजयी -भाऊराव सगभोर -79, सगभोर मालती धीरेंद्र -107,बिनविरोध -झोले सुशीला श्रावणा, धीरेंद्र सगभोर (दोन प्रभागांत) दोन जागा रिक्त.
सोमलवाडी -सरपंच पद – विजयी- नामदेव सारोक्ते – 195,
सदस्य बिनविरोध – प्रभाकर सारोक्ते, चंद्रभागा रुपाजी कचरे, अंकुश गोडे, गंभीरे रंजना श्रावणा व गंभीरे बुधाबाई पांडुरंग, दोन जागा रिक्त.
मुरशेत -सरपंच पद -विजयी -उभे साळूबाई ठका -219,नोटा -7
बिनविरोध सदस्य -उभे साळूबाई ठका, गोलवड अशोक, पाच जागा रिक्त.
भंडारदरा-सरपंच पद विजयी-पांडुरंग खाडे-476.
बिनविरोध सदस्य-यशवंत खाडे, खाडे मंगला विठ्ठल, खाडे भामाबाई त्र्यंबक, गणपत खाडे, खाडे माधुरी भास्कर, रामदास देशमुख, खाडे लीलाबाई दौलत, दोन जागा रिक्त.
गुहिरे-सरपंचपद विजयी -सोनवणे चंद्राबाई एकनाथ -236
बिनविरोध सदस्य-राजू कातडे ,सारुक्ते बारसाबाई अनिल, सारुक्ते मंगल सुनील व सोनवणे चंद्राबाई एकनाथ, तीन जागा रिक्त
शेंडी -सरपंच पद विजयी -दिलीप भांगरे -404,पराभूत -विजय भांगरे -316 ,नोटा -14
बिनविरोध सदस्य -दत्तू भांगरे ,सुरेश घाटकर, देवराम भांगरे, भांगरे सीताबाई गोगा, रामनाथ खाडे , भांगरे मालती एकनाथ ,दोन जागा रिक्त
शिळवंडी – सर्व बिनविरोध -सरपंचपद -चहादु साबळे, सदस्य -निलेश साबळे, बांडे आशा देवराम, साबळे नंदा सखाराम, कृष्णा साबळे, दीपक साबळे, दोन जागा रिक्त.
अर्जुन गावडे , लहीत खुर्द
बाबासाहेब उगले , डोंगरगाव
बाळासाहेब शेळके, चास
चंद्रभागा सोनवणे , गुहिरे
दिलीप भांगरे, शेंडी
कोंडिबा वाजे, आंभोळ
सीमा सगभोर , वाकी

LEAVE A REPLY

*