सरपंच पदासाठी 46, सदस्य पदासाठी 114 अर्ज

0

अर्ज लवकर दाखल करण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी) – जानेवारी ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी 5 डिसेंबरपासून ऑनलाईन अर्जदाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

तिसर्‍या दिवसाअखेर सरपंच पदासाठी 46 तर सदस्य पदासाठी 114 असे 160 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेच्यावतीने देण्यात आली.

या 67 ग्रामपंचायतीत पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंच निवड होणार आहे. यामुळे गाव पुढार्‍यांसाठी ही राजकीय अस्तित्वाची लढाई म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. यामुळे सर्वत्र चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने गावावर वर्चस्व ठेवण्यासाठी गावपुढार्‍यांनी निवडणुकीपूर्वी जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण गरम झाले आहे. उमदेवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सदस्यपदासाठी अवघे दोन अर्ज दाखल होते. त्यात बुधवारी वाढ झाली आहे.

गुरुवारी सदस्यपदासाठी आणि सरंपचपदासाठी (कंसात) दाखल अर्ज पुढील प्रमाणे आहेत. संगमेनर 1 (1), कोपरगाव 14 (3), श्रीरामपूर 29 (8), राहाता 1 (4), राहुरी 19 (5), नेवासा 4 (2), नगर 6 (4), शेवगाव 17 (4), श्रीगोंदा 3 (5).

अर्ज लवकर दाखल करण्याचे आवाहन
दरम्यान सोमवार (दि.11) रोजी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. यंदा ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात येत असून शेवटच्या दिवशी उमदेवारांनी अर्ज दाखल करण्यास गर्दी केल्यास त्यातून तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे निवडणुका लढविणार्‍यांनी लवकरात लवकर उमदेवारी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*