सरपंच पदासाठी 10, सदस्य पदासाठी 20 अर्ज

0

दुसरा दिवस : 67 ग्रामपंचायतींच्या निवडणुका

अहमदनगर (प्रतिनिधी)- जानेवारी ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मंगळवारपासून (दि. 5) ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. दुसर्‍या दिवसअखेर सरपंच पदासाठी 10 तर सदस्य पदांसाठी 20 असे 30 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेच्यावतीने देण्यात आली.

या 67 ग्रामपंचायतींत पहिल्यांदा थेट जनतेतून सरपंच निवड होणार आहे. यामुळे गाव पुढार्‍यांसाठी ही राजकीय अस्तित्वाची लढाई म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. यामुळे सर्वत्र चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने गावावर वर्चस्व ठेवण्यासाठी गावपुढार्‍यांनी निवडणूकीपूर्वी जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण गरम झाले आहे.

उमदेवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सदस्यपदासाठी अवघे दोन अर्ज दाखल होते. त्यात बुधवारी वाढ झाली आहे. सरपंच पदासाठी बुधवारी 10 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात श्रीरामपूर, राहाता, राहुरीत प्रत्येकी 1 तर नगर, श्रीगोंदा तालुक्यात प्रत्येकी 3 आणि शेवगाव तालुक्यात 3 अर्जांचा समावेश आहे. सदस्य पदासाठी शेवगाव तालुक्यात 9, नगर तालुक्यात 5, श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्यात प्रत्येकी 3 अशा 20 अर्जाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*