ग्रामपंचायत निवडणुक : भालसिंग, बेरड, खर्से गटाला धक्का

0
नगर तालुक्यात धक्कादायक निकाल
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष केशव बेरड, आ. कर्डिले समर्थक, बाबासाहेब खर्से गटाला निकालनंतर धक्का बसला.
कौडगाव ग्रामपंचायतीच्या 13 जागासाठी खर्से चुलते-पुतण्याच्या पॅनलमध्येच लढत झाली. धनंजय खर्से हे विद्यमान सरपंच होते. त्यांच्या पॅनलविरोधात बाजार समितीचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब खर्से यांनी पॅनल उभा करून स्वत:च सरपंच पदाची निवडणूक लढविली.
बाबासाहेब खर्से यांचा पराभव करत धनंजय दिलीप खर्से यांनी सरपंच पदाची निवडणूक जिंकली. नेप्तीत अरुण होळकर गटाने बाजी मारली. वाळकीत भाऊसाहेब बोठे यांच्या आघाडीची सत्ता आली पण ते स्वतः पराभूत झाले. आठवडमध्ये माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ गटाने सरपंचपद गमावले.
नगर तालुक्यातील गावनिहाय सरपंच पदाचे विजयी उमेदवार
नागरदेवळे- सविता राम पानमळकर, जखणगाव- सविता राजाराम कर्डिले, पिंपळगाव कौंडा – सतीश प्रकाश ढवळे, सोनेवाडी (चास)- स्वाती दिलीप सुंबे, दहेगाव- मधुकर मुरलीधर म्हस्के, वडगाव तांदळी- सविता अनिलकुमार ठोंबरे, साकत – जाईबाई बापू केदारे, आठवड- राजेंद्र झुंबर मोरे, सारोळा बद्दी- सचिन सुभाष लांडगे, मदडगाव- सुनीता अनिल शेडाळे, सोनेवाडी- मोतीन चांदणे, आगडगाव- मच्छिंद्र दत्तात्रय कराळे, नांदगाव- सुनीता साईराम सरड, नेप्ती- सुधाकर बापूराव कदम, टाकळी खातगाव- सुनील सुर्यभान नरवडे, राळेगण- निलेश विशाल साळवे, खातगाव टाकळी- संगिता मिठू कुलट, शेंडी- सीताराम आसाराम दाणी, कापूरवाडी- संभाजी गोवर्धन भगत, सारोळा कासार – भारती रवींद्र कडूस, बाबुर्डी बेंद- अशोक भाऊसाहेब रोकडे, वाळकी- स्वाती शरद बोठे, रांजणी- बाळासाहेब नामदेव चेमटे, नारायण डोह- सविता किशोर गायकवाड, पांगरमल- बापूसाहेब आव्हाड, उक्कडगाव-नवनाथ भानुदास म्हस्के.

grampagarmpanchayat

LEAVE A REPLY

*