नेवासा तालुक्यात 85.37 टक्के मतदान

0

नेवासा (शहर प्रतिनिधी) – आज प्रथमच थेट जनतेतून निवड करण्याच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत मोठी उत्कंठा जाणवली आगळ्यावेगळ्या ठरलेल्या या निवडणुकीत 85.37 टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत असल्याने व निवडणुकीत भरगोस मतदान झाल्याने प्रस्थपित व विरोधक संभ्रमात सापडले आहे. आ. बाळासाहेब मुरकुटे व माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या गटामध्ये समोरासमोर लढत होत असून गडाख व मुटकुटे यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक ठरणार असून याचे पडसाद पुढील निवडणुकीत पडण्याची शक्यता आहे. 

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून काही ठिकाणी किरकोळ कुरबुरी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गावकीच्या राजकारणाची दिशा ठरणारी निवडणूक असल्याने आपल्याच पारड्यात जास्तीत जास्त मतदान खेचण्यासाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा लागली होती.त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला आहे.

तालुक्यातील वडाळा बहिरोबा, माळीचिंचोरा, भेंडा खुर्द, खुपटी या ग्रामपंचायती राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या आहे. दुपारी साडे तीनपर्यंत मतदानाने 80 टक्क्याची सरासरी ओलांडली होती.आज सर्वात कमी सुरेशनगर ग्रामपंचायतीसाठी 78.90 टक्के मतदान झाले तर सर्वाधिक चिंचबन ग्रामपंचायतसाठी 92.85 टक्के मतदान झाले.

तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीसाठी एकूण 24457 मतदारांपैकी 20879 मतदारांनी आपला हक्क बजावला असून मतदान प्रक्रियेसाठी 46 बूथ लावण्यात आले होते. निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा येथील पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, सोनई येथील सहायक पोलीस निरीक्षक किरण शिंदे, शिंगणापूर येथील सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती राऊत यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

ग्रामपंचायत     एकूण मतदान   झालेले मतदान    टक्केवारी –

 हंडीनिमगाव       1067          932              87.24 

गोधेगाव            1185          1034            87.25

कांगोणी            2456           2170            88.35

सुरेशनगर          564             445             78.90

माका               3291           2825           85.84

अमळनेर          1487           1327            89.24

शिरेगाव           1962            1739            88.63

चिंचबन           532            494                92.85

खुपटी             1722          1465              85.07

हिंगोणी            840           776                 92.38

माळीचिंचोरा       3559       2895                81.34

वडाळा बहिरोबा    3928      3154                80.29 

भेंडा खुद              1864       1623             87.07

LEAVE A REPLY

*