कर्जत-जामखेडमध्ये पालकमंत्र्यांचे वर्चस्व पणाला

0
कर्जत (प्रतिनिधी) – कर्जतमधील आठ ग्रामपंचायती तर जामखेडमधील ती ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये प्रत्यक्षात प्रचारात न उतरलेले पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या गुप्त खेळीने कोण सरपंच होणार याची जोरदार चर्चा मतदारांमध्ये आहे.
संपूर्ण निवडणुकीत पालकमंत्र्यांचा प्रत्यक्ष सहभाग जरी दुर्मिळ राहिला असला तरी त्यांच्याच अंतर्गत प्रचारातून प्रा.शिंदे यांचा अदृष्य हात कोणाच्या मागे आहेत व मतदार कितपत साथ देतात, याकडे दोनही तालुक्यांचे लक्ष लागले आहे.
यावर्षीपासून थेट जनतेमधून सरंपच निवड होत असून यावेळी ग्रामपंचायतीच्या प्रचाराचा नूरच बदललेला पाहावयास मिळत आहे. पूर्वीसारखे पॅनल असले तरी यावेळी कोण बनेगा सरंपच? यावरच जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी, तिरंगी लढती होत आहेत.
प्रत्येक केंद्रावर दोन मतपेट्या आहेत. यामध्ये एक सरंपच पदाची आहे. तर दुसरी सदस्य निवडीची आहे. यामुळे काही ठिकाणी अशिक्षित मतदारांची कसोटी लागणार आहे.
कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. यामध्ये सर्वच ग्रामपंचायती लक्षवेधी आणि राजकीयदृष्ट्या महत्वाच्या आहेत. यामध्ये कोपर्डी, बहिरोबावाडी, अळसुंदे, निंबे, कापरेवाडी, मुळेवाडी, कौडाणे, म्हाळंगी व जामखेड तालुक्यातील रत्नापूर, शिउर, राजुरी या तीन ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.

प्रचाराअगोदरच इच्छुकांनी नवरात्रोत्सव जोरदार साजरा केला. युवकांना नवरात्रोत्सवात मंडळस्थापनेसाठी योगदान दिले. तर काहींनी महिलांना उपवासाचे पदार्थ घरपोच केले. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राजकीय चिन्हाचा वापर होत नसला तरी प्रत्येक गावातील प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता निवडणुकीच्या प्रचारात उतरलेला दिसतो आहे.

LEAVE A REPLY

*