ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निरीक्षकांच्या नियुक्त्या

0

उपजिल्हाधिकारी दर्जाच्या आठ अधिकार्‍यांचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी) – ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेचे कामकाज योग्य पध्दतीने सुरू आहे की नाही, यावर करडी नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या आठ अधिकार्‍यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या निवडी करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर 2017 मध्ये या कालावधीत 205 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या निवडणुकीच्या प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या आठ अधिकार्‍यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. यात नगरच्या उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांची नगर तालुका, नेवासाच्या उपविभागीय अधिकारी आंबेकर यांची नेवासा तालुक्यासाठी,
पाथर्डीचे उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल यांची शेवगाव-पाथर्डी तालुक्यासाठी, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे यांची संगमनेर आणि अकोले तालुक्यांसाठी, श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांची राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यांसाठी, कर्जतच्या उपविभागीय अधिकारी अर्चना ने यांची कर्जत-जामखेडसाठी, श्रीगोंद्याचे उपविभागीय अधिकारी गोविंद दाणेज यांची श्रीगोंदा, पारनेरसाठी, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे यांची कोपरगाव-राहाता तालुक्यांतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*