राहुरी तालुक्यातील सडे गावातून हरकतींचा ‘सडा’

0

प्रभाग रचना अमान्य,23 हरकती प्राप्त

अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी प्रशासनाने 3 जुलैला जाहीर केलेल्या प्रारुप प्रभाग रचने विरोधात एकाच दिवसात 23 हरकती प्राप्त झाल्या आहे. यामध्ये राहुरीतील सडे गावच्या सर्वाधिक 12 हरकती असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागने दिली.

जिल्ह्यातील 273 ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. यापुर्वी ग्रामसभांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली प्रभाग रचना व आरक्षणाची प्रारुप यादी सोमवारी 3 जुलै रोजी प्रसिध्द करण्यात आली. त्यावर 11 जुलैपर्यत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, हरकती दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 4 जुलैला एकही हरकत प्राप्त नव्हती. दुसर्‍या दिवशी म्हणजे 5 जुलैला 23 हरकती प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये राहुरी-13, राहता व पाथर्डी प्रत्येकी-3, अकोले, संगमनेर, श्रीरामपूर व जामखेड प्रत्येकी 1 हरकत प्राप्त आहेत.अद्याप हरकती दाखल करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी असून मोठ्या प्रमाणात हरकती दाकल होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर प्राप्त हरकतीवर उपविभागीय अधिकारी 15 जुलैपर्यत सूनावणी घेणार आहेत. प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे प्राप्त झाल्यावर 31 जुलै रोजी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मंजुरी देण्यात येवून 3 ऑगस्टला प्रसिध्द करण्यात येणार आहे. ऑक्टोबर 2017 ते ङ्गेब्रवारी 2018 या कालावधीत नगर जिल्ह्यातील 273 ग्रामपंचायतींची निवडणुका होत आहे. प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने यापुर्वीच जाहीर केला आहे.

आयोगाच्या निर्देशानूसार 10 जूनपासून गावो-गावी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आला. तलाठी व ग्रामसेवकांनी स्थळ पाहणी करुन सिमा निश्‍चित केली.त्यानंतर अनुसूचित जाती, जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण जाहीर केले. त्यास संबधित तहसिलदार यांनी प्रारुप प्रभाग रचनेला मान्यता दिली.

दरम्यान 27 जून रोजी विशेष ग्रामसभा घेवून प्रारुप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढण्यात आली.बहुतेक ठिकाणी प्रभाग रचना व आरक्षणाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला होता. दरम्यान अधिकार्‍यांनी तक्रारी असल्यास विभागीय अधिकार्‍यांकडे मांडण्याचा सल्ला देवून सभेचे कामकाज पूर्ण करुन अहवाल जिल्हास्तरावर पाठविला. आता 11 जुलै पर्यत ग्रामस्थांना हरकती दाखल करण्यासाठी मूदत देण्यात आली असून जिल्ह्यातील 273 गावातून एकूण किती हरकती दाखल होतात.हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विषय एक, विषय एक, अर्जदार अनेक –

 राहुरी तालुक्यातील एकूण 17 ग्रामपंचायतींच्या ऑक्टोबर 2017 ते ङ्गेब्रवारी 2018 या कालावधीत निवडणूका होणार आहे. राहुरीतून दाखल 13 हरकतीपैकी 12 हरकती सडे गावच्या आहे.अर्ज अनेक असले तरी, सर्व अर्जदारांचा विषय प्रभाग रचना अमान्य असल्याचा आहे.तर, मानोरीतून एक हरकत प्राप्त असल्याची माहिती राहुरी तहसिल कार्यालयाने दिली.

LEAVE A REPLY

*