Type to search

Featured नाशिक

ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे

Share

डूबेरे :

ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्यावतीने आपल्या विविध मागण्यांसाठी उद्या (दि.२०) सकाळी 10 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नामदेव पावसे यांनी दिली.

गावविकासात ग्रामपंचायत हा महत्वाचा दुवा आहे. परंतु, गाव समस्यांवर मात करण्यास ग्रा.पं. कर्मचारी सहाय्यभूत ठरत असतो. गाव स्वच्छता, रस्ते, सांडपाणी नाल्या, पाणीपुरवठा दुरूस्ती-देखभाल, आठवडे बाजार साफसफाई, करवसुली अशी कित्येक कामे ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या तुटपूंज्या वेतनावर करीत आहे.

मात्र, या कर्मचाऱ्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून वेतनश्रेणी लागू न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. राज्यातील २७ हजार ९२० ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम करीत असलेल्या सुमारे साठ हजार कर्मचाऱ्यांचे वेतनाचे प्रश्न मागील वीस वर्षापासून प्रलंबित आहेत. अद्यापही शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही प्रकारच्या मागणी पूर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वर उपासमारीची वेळ आली आहे.

निवृत्ती वेतन श्रेणी सुधारित किमान वेतन अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष पावसे, उपाध्यक्ष रशीद कादरी, बाबा गिते, सुनील मोरे, संजय शिंदे, कृष्णा बावणे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!