ग्रामपंंचायत निवडणूक : 688 मतदान केंद्रांवर मतदान; तयारी पूर्ण

0
नाशिक । जिल्ह्यातील 171 ग्रामपंचायतींसाठी 7 ऑक्टोबरला 688 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. याकरिता निवडणूक विभागाने तयारी पूर्ण केली असून निवडणूक साहित्याचेही वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील 171 ग्रामपंचायतीतील 1 हजार 647 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत तब्बल 627 उमेदवारांची बिनविरोध वर्णी लागल्यानंतर आता 1 हजार 20 जागांसाठी 2 हजार 140 उमेदवारांनी निवडणूक रिंगणात शड्डू ठोकला आहे.

जिल्ह्यातील 171 ग्रामपंचायतींची मुदत ऑक्टोबर 2017 ला संपत असल्याने निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 7 सप्टेंबरला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर 15 ते 22 सप्टेंबरदरम्यान नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आले.

निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या एकूण 3 हजार 891 नामनिर्देशन पत्रांपैकी 3 हजार 787 नामनिर्देशन पत्रे वैध ठरवण्यात आली. त्यात 1 हजार 78 उमेदवारांनी माघार घेतली, तर 627 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आता 1 हजार 20 जागांसाठी 2 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. सिन्नर तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींमध्ये 22 उमेदवार बिनविरोध झाले असून तेथे आता 229 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.

तर पेठमध्ये एका ग्रामपंचायतीसाठी 2 उमेदवार बिनविरोध झाले असून 9 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. निफाडमध्ये 20 ग्रा.पं.मध्ये 57 उमेदवार बिनविरोध झाले असून 389 उमेदवार शिल्लक आहेत. कळवण तालुक्यातील 16 ग्रा.पं.मध्ये 80 उमेदवार बिनविरोध झाले असून 132 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

बागलाण तालुक्यातील सर्वाधिक 40 ग्रा.पं.मध्ये 207 उमेदवार बिनविरोध झाले. त्यामुळे आता या ठिकाणी 276 उमेदवार उरले आहेत. येवला तालुक्यातील 8 ग्रा.पं.साठी 27 उमेदवार बिनविरोध झाले असून 70 उमेदवार उरले आहेत. नाशिकच्या 9 ग्रा.पं.साठी 25 उमेदवार बिनविरोध झाल्याने 155 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

दिंडोरीच्या 17 ग्रा.पं.मध्ये 7 उमेदवार बिनविरोध, 78 शिल्लक. मालेगाव 11 ग्रा.पं.मध्ये 18 उमेदवार बिनविरोध, 196 शिल्लक, देवळा 12 ग्रा.पं. 44 उमेदवार बिनविरोध, 196 शिल्लक, त्र्यंबकेश्वर 1 ग्रा.पं.मध्ये 5 उमेदवार बिनविरोध, 10 शिल्लक तर चांदवडच्या 34 ग्रा.पं.मध्ये 132 उमेदवार बिनविरोध झाले असून 400 उमेदवार शिल्लक आहेत.

7 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. याकरिता 688 कंट्रोल युनिट, 1376 बॅलेट युनिटची आवश्यकता भासणार असून या मशीनची तपासणी करण्यात येऊन निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आले. निवडणुकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी पाच याप्रमाणे साडेतीन हजार कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*