Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार थांबला

ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार थांबला

नाशिक

. गेल्या आठ दिवसांपासून धडाडणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोफा आज थंडावल्या. आता शुक्रवारी (ता.१५) मतदान होणार आहे.

- Advertisement -

गेल्या आठ दिवसांपासून धडाडणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोफा आज थंडावल्या. आता शुक्रवारी (ता.१५) मतदान होणार आहे. दोन दिवस उमेदावार प्रचार न करता गाठीभेटींवर भर देणार आहे. तसेच जास्तीत जास्त मतदान मिळवण्यासाठी आता उमेदवारांनी सेटिंग्ज सुरू केली आहे.

कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच राज्यात ३४ जिल्ह्यांमधील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायतीचा मतदारसंघ अत्यंत छोटा असल्याने बहुतेक उमदेवारांनी घरोघरी जाऊन भेटीगाठी घेण्यावरच भर दिला. जळगाव जिल्ह्यात एकूण ११२५ ग्रामपंचायत आहेत. त्यापैकी ७८३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत. ९२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून यात २००३ सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ५ हजार ४६३ उमेदवारांनी अर्ज माघार घेतली आहे. त्यात ५ हजार ८९५ जागांपैकी तब्बल १ हजार ६२७ जागा अविरोध झाल्या आहेत. सर्वाधिक २३८ जागा सिन्नरमध्ये विरोध झाल्या अाहेत. आता ४ हजार २६८ जागांवर निवडणुक होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या