ग्रामपंचायत निवडणूक : भरारी व स्टॅटीक सर्वेलन्स पथकांची नेमणूक

0
अहमदनगर (प्रतिनिधी)– राज्य निवडणूक आयोगाने नगर तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम 1 सप्टेंबर 2017 रोजी जाहीर केला आहे.
सदर ग्रामपंचायतीचे निवडणूक कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या हेतूने भरारी पथक, छायाचित्रण पथक, स्टॅटीक सर्वेलन्स पथक, व्हिडिओ व्हिव्हिंग पथक इत्यादी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे.
भरारी पथकामध्ये यामध्ये कार्यकारी दंडाधिकारी म्हणून एस एस दुगम मो. 8446718757, एल बी गोरड मो. 8975442405 व ए एन सोनवणे मो. 8275191642 यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. तसेच स्टॅटीक सर्वेलन्स पथकामध्ये पी. डी साळवे मो.7588092973 (स्थान व पद सोलापूर नाका) व कुमार व्ही खांदवे मो. 9096068034,  दत्तात्रय तुळशीराम जावळे (स्थान व पद जेऊन टोलनाका) यांच्या नेमणुक करण्यात आलेल्या आहेत.
नागरिकांना ग्रामपंचायत निवडणुकीचे अनुषंगाने काही तक्रार असल्यास कार्यक्रारी दंडाधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे नगर तहसीलदार सुधीर पाटील यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

LEAVE A REPLY

*