विरोधक आणि सामान्यांच्या नाराजीमुळे सरकार करणार जीएसटीमध्ये आणखी बदल ?

0

नवी दिल्ली, ता. १४ : नुकत्याच झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत सरकारने २०० वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला. आता लवकरच आगामी काळात जीएसटीमध्ये आणखी बदल करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून विरोधक आणि सामान्य जनतेच्या टिकेला वारंवार केंद्रसरकारला सामोरे जावे लागत आहे. त्यातच तोंडावर आलेली हिमाचल आणि गुजरातची निवडणूक आणि  येऊ घातलेली मध्यप्रदेश, राजस्थानच्या निवडणूकीत सत्ताधारी भाजपाला कठिण स्थितीचा सामना करावा लागण्याचे संकेत मिळाल्याने जीएसटीबाबत केंद्र सरकार आता काही पाऊले मागे सरकली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या काळात जीएसटीमध्ये बदल करण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत.

सरकारच्या महसूलाची स्थिती जाणून घेऊन जीएसटीमध्ये बदल करण्याचे संकेत जेटलींनी दिले. मात्र गुजरात निवडणूक आणि नुकतेच कमी केलेले जीएसटी दर यावरून काही जण वेगळा अर्थ काढून राजकारण करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

LEAVE A REPLY

*