Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशतरुणांना सैन्यदलात काम करण्याची संधी! संरक्षण मंत्र्याकडून ‘अग्निपथ योजने’ची घोषणा

तरुणांना सैन्यदलात काम करण्याची संधी! संरक्षण मंत्र्याकडून ‘अग्निपथ योजने’ची घोषणा

दिल्ली | Delhi

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्य भरतीशी निगडीत अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत भरती झालेल्या तरुणांना अग्नीवीर असे संबोधले जाणार आहे. या याजनेमुळे रोजगासुद्धा वाढणार असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

- Advertisement -

या योजनेअंतर्गत, तरुण चार वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यात भरती होतील आणि देशाची सेवा करतील. ही योजना संरक्षण दलांचा खर्च आणि वय कमी करण्याच्या दिशेने सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

चार वर्षांच्या शेवटी, सुमारे ऐंशी टक्के सैनिकांना कर्तव्यातून मुक्त केले जाईल आणि त्यांना पुढील रोजगाराच्या संधींसाठी सशस्त्र दलांकडून मदत मिळेल. देशसेवा केलेल्या प्रशिक्षित आणि शिस्तप्रिय तरुणांसाठी नोकऱ्या आरक्षित करण्यातही अनेक कॉर्पोरेशन इच्छुक असतील.

या योजनेच्या माध्यमातून सैन्याचा भाग बनलेल्या सैनिकांना दरमहा ३० हजार ते ४० हजार रुपये पगार मिळणार आहे. यासोबतच त्यांना ४८ लाख रुपयांचा विमा मिळणार आहे.

दरम्यान अग्निवीरने सेवेदरम्यान सर्वोच्च बलिदान दिले तर त्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. याशिवाय अपंगत्व आल्यास ४८ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या