राज्यपाल सी. विद्यासागर राव साईचरणी लीन

0
शिर्डी (प्रतिनिधी)- राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे सपत्निक दर्शन घेतले. यावेळी साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्‍वस्त भाऊसाहेब वाकचौरे, नगराध्यक्षा योगीता शेळके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे, उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते. दरम्यान सकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे शिर्डी विमानतळावर स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यपाल यांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश केकाणे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*