शेतमालाची साठवणूक करण्यासाठी रेल्वेच्या सहकार्‍यातून महाराष्ट्रात सर्वाधिक शीतगृह उभारणार – मुख्यमंत्री

0
लासलगाव |  शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव, जवळ बाजार पेठ व शेतमाल टिकविण्यासाठी देशभरात रेल्वे प्रशासन व कॉनकॉर्न  यांच्या माध्यमातून देशात उभारण्यात येणाऱ्या २२७ पेकी ५२ शितगृह महाराष्ट्रात उभारले जात आहे. त्यापैकी 25 पूर्ण झाले असून उर्वरित लवकरच पूर्ण होतील.
त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेते महाराष्ट्रात सर्वाधिक  शितगृह निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज दिली. लासलगांव येथे रेल्वे प्रशासन व खरेदी विक्री संघ यांच्या समन्वयातुन उभारण्यात येत असलेल्या अडीच हजार मेट्रिक टन क्षमता असलेल्या बहुउद्देशीय शितगृहाचे भूमिपूजन करण्यात आले.

रेल्वे मंत्री सुरेश प्रभु, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, खा.हरिषचंद्र चव्हाण, पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, आमदार सीमा हिरे, आमदार स्नेहलता कोल्हे, भाजपचे  सुरेश बाबा पाटिल, जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, नाफ़ेडचे संचालक नानासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य डी.के.जगताप, भाजप प्रदेश पदाधिकारी सुनील बागुल याच्यासह मोठ्या प्रमाणात मान्यवर शेतकरी वर्ग उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस पुढे म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हा मेहनती व शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून शेती करतो. त्यामुळे नाशिक जिल्हा हा शेतमाल पिकविण्यासाठी अग्रेसर असा जिल्हा असून येथील शेतकर्‍यांना त्यांचा माल साठवून ठेवून योग्य वेळी विकता यावा यासाठी शितगृहांची निर्मिती करण्यात येत आहे. शेतीच्या दृष्टीने हे क्रांतिकारी पाऊल ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शीतगृह चालविण्यासाठी लागणारी विजेत अधिकाधिक सवलत देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. राज्यातील पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी रेल्वे व महाराष्ट्र शासन यांच्या भागिदारीतून मराठवाड्यात १९ हजार, उत्तर महाराष्ट्र २२ हजार तर महाराष्ट्रात एकूण १ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहे. तसेच शेतकर्‍याला सक्षम करण्यासाठी सरकार वाटचाल करत असल्याचे त्यांनी संगितले.

 

LEAVE A REPLY

*