Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

‘या’ महाविद्यालयांना 100 टक्के अनुदान मिळावे यासाठी शासन सकारात्मक – सुभाष देसाई

Share

नागपूर | वृत्तसंस्था 

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या चित्रकला व फार्मसी महाविद्यालयांना शंभर टक्के वेतन अनुदान देण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगासंदर्भात काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिली.

विधानपरिषदेत सदस्य सर्वश्री विक्रम काळे, सतीश चव्हाण, डॉ. सुधीर तांबे, बाळाराम पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर श्री. देसाई बोलत होते.

श्री. देसाई म्हणाले, चित्रकला व फार्मसी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी सध्या 90 टक्के अनुदान देण्यात येते. हे अनुदान शंभर टक्के देण्यासंदर्भात शासन सकारात्मक आहे. कायम विनाअनुदानित तत्त्वावरील महाविद्यालयांचा कायम हा शब्द काढण्यासाठी बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!