Type to search

Breaking News Featured maharashtra देश विदेश नाशिक मुख्य बातम्या

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; उत्पादन वाढीमुळे निर्यातीचा केंद्राचा निर्णय

Share

नाशिक | प्रतिनिधी 

देशांतर्गत कांद्याचे दर गगनाला भिडल्यानंतर केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी केली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ४० टक्के अधिक उत्पादन वाढल्यामुळे कांद्यावर असलेली निर्यातबंदी मागे घेण्यात आल्याची माहिती आज केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरद्वारे दिली. कांद्याची निर्यात सुरु झाल्यामुळे दर स्थिर राहणार असून परिणामी शेतकऱ्याला चांगला बाजारभाव काढण्याला मिळणार असल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात उन्हाळी कांद्याचे वाढल्यामुळे तसेच आवक घटल्यामुळे कांद्याचे दर गगनाला भिडले होते. कांदा दर आवाक्यात राहावे यामुळे निर्यात शुल्क वाढवत निर्यातीवर बंदी केंद्र सरकारकडून घालण्यात आली होती. यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापासून सुरु झालेला लाल आणि रांगडा कांदादेखील यामुळे भाव खात होता.

दरम्यान, अलीकडे शेतकऱ्यांनी पावसाळी कांद्याची भरमसाट लागवड केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्न अधिक वाढले असल्याचा दावा पासवान यांनी करत निर्यातबंदी उठविण्यात येत असल्याचे ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणाले की, देशभरात कांद्याचे गेल्या वर्षीपेक्षा अधिक उत्पादन झाले आहे. सरकारकडून आटोक्यात आलेल्या कांद्याच्या किंमती लक्षात घेता आजपासून निर्यातबंदी हटविण्यात आली आहे.

गेल्या वर्षी २८.४ लाख टन उत्पादन झाले होते त्यामानाने यंदा यात ४० टक्क्यांनी भर पडली असून हे उत्पन्न ४० लाख टनांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे कांद्याची निर्यात सुरु होणार असून दर वाढण्यासदेखील मदत होणार आहे.

केंद्राकारून निर्यातबंदी उठविण्यात आली असली तरी निर्यातशुल्क कमी करण्यात आलेले नसल्याने कांद्याच्या निर्यातीला व्यापारी धजावतील की नाही याबाबत मात्र शंकाच असल्याचे एकूण चित्र असून अद्याप व्यापारी वर्गाकडून कुठलीही प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!