शहिद मिलिंद खैरनार यांच्या पत्नीला मिळणार सरकारी नोकरी

0
नाशिक | जम्मु काश्मिरच्या बांधीपूर जवळ एका गावातील घरात अतिरेकी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यांना शोधण्यासाठी आर्मी व एअर कमांडो यांचे एकत्रीत ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील     जवान मिलिंद खैरनार शहीद झाला.
त्यांच्या  घरी आपण उद्या भेट देणार आहोत. तसेच    पत्नीला सरकारी नोकरी देण्यात येणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री खा. सुभाष भामरे यांनी दिली. ते नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

काश्मीरमध्ये शोधमोहीम सुरु असतांना एका घराजवळ अतिरेक्यांना जवानांचा सुगावा लागला. त्यावेळी त्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात मिलिंद खैरनार व एक बिहारचा जवान शहिद झाला. यावेळी अतिरेक्यांना ठार मारण्यात आपण यशस्वी झालो.

मात्र मिलिंदला गमावले. याचे मोठे दुःख आहे. उद्या मी मिलिंदच्या राहत्या घरी जाऊन त्याच्या कुटुबियांची भेट घेणार आहे.

लष्कराच्या माध्यमातून जी विविध हेडखाली मदत होते ती सर्व त्यांना देऊच. त्याचा पगार त्याच्या पत्नीला कायम मिळत राहिल तसेच त्याच्या पत्नीने मागणी केली तर तीला नोकरीही आम्ही देऊ असे भामरे यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

*