प्रशासनाला रस्ते सापडेना!

0

केवळ 98 रस्ते खुले करण्यात यश

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमित व बंद झालेल्या बहुतांश रस्त्यांचा श्‍वास मोकळा करण्यात महसूल विभागाला अपयश आले आहे. पाणंद व शिवरस्ते खुले करण्यासंदर्भात प्रत्येक तालुक्यातून मोठी मागणी असताना प्रशासनाची कार्यवाही कासवगतीने सुरु असल्याचे दिसून येत आहे.
बहुतेक गावामध्ये सामुहिक वहिवाटीच्या रस्त्यावरुन वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत.वादाची थिणगी अधिक वाढून गावातील कायदा व सुव्यस्था कोलमडतो.दोन गावाच्या सिमेवर असणार्‍या अनेक शेतकर्‍यांना स्वत:च्या मालकीच्या जमिनीतून शेतमाल बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागते.
पूर्वी वापरात असलेले अनेक शिवरस्ते अतिक्रमणामुळे हरवलेली आहे. ते मोकळे करण्यासाठी गावो-गावी लोकांकडूप प्रशासनाकडे मागणी केली जात आहे.दरम्यान या पार्श्‍वभूमिवर शासनाने महाराजस्व अभियान सुरु केले असून त्या माध्यमातून रस्ते खुले करण्याचे काम सुरु करण्यात आले. मात्र, अभियानाचा सुरवातीला झालेला मोठा गाजा-वाजा सध्या मात्र, थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षात 31 जुलै 2016 अखेर 27 हजार 773 लांबी असणारे 197 रस्त्यापैकी 11 हजार 667 लांबीचे केवळ 98 रस्ते खुले करण्यात महसुल विभागाला यश आले आहे.

197 अतिक्रमित रस्ते
महसुल प्रशासनाकडील 31 जुलै 2016 अखेरच्या आकडेवारीनूसार जिल्ह्यात 197 अतिक्रमीत रस्ते होते. तालुकानिहाय संख्या- नगर-44, नेवासा-27, श्रीरामपूर-4, राहुरी-22, संगमनेर-6, अकोले व जामखेड प्रत्येकी -5, कर्जत-17, पाथडीॅ-12, शेवगाव-3, राहाता-12, कोपरगाव-25, श्रीगोंदा-15 आदी.

राहुरी:सर्वाधिक रस्ते खुले
1 ऑगस्ट 2016 पासून जिल्ह्यातील एकूण 98 रस्त्यांचे अतिक्रमण काढण्यात आले आहे. यामध्ये नगर, कोपरगांव प्रत्येकी-10, नेवासा, जामखेड प्रत्येकी-5, श्रीरामपूर, श्रीगोंदा-6, राहुरी, कर्जत प्रत्येकी -17, संगमनेर-10, अकोले, पाथर्डी प्रत्येकी-4,शेवगाव,राहाता प्रत्येकी-2 आदी.

पारनेरमध्ये रस्ताच नाही
क्षेत्रफळाने राज्यात सर्वात मोठा जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याची ओळख आहे. प्रत्येक तालुक्याच्या या त्या कोपर्‍यात शिवरस्ते, पाणंद रस्ते अतिक्रमीत असताना पारनेर तालुक्यात मात्र एकही रस्ता नसल्याचा अहवाल प्रशासनाकडून प्राप्त झाला आहे. एखादा तालुका शंभर टक्के रस्ते अतिक्रमण मुक्त असणे कौतुकास्पद आहे.त्या तुलनेत इतर तालुके का? नाही असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

*