Type to search

मुंडे भगिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

मुंडे भगिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Share

मुंबई | प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच बहिण बीडच्या नवनिर्वाचित खासदार डाॅ प्रितम मुंडे यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांची भेट घेतली.

गोपीनाथ मुंढे यांचे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी स्नेहाचे नाते होते. मुंढे यांचे निधन झाल्यानंतर या आपुलकीच्या नात्याचा वारसा उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंढे या पिढीनेदेखील कायम ठेवला आहे.

मुंढे यांचे निधन झाल्यानंतर बीडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी मोठ्या भावाची भूमिका घेत उमेदवार न देता याठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत ठामपणे मुंढे भगिनीच्या पाठीशी उभे राहिले होते.

राजकीय जेष्ठत्व, कौटुंबिक जिव्हाळा आणि आपुलकीच्या नात्याने मार्गदर्शन करणारे मोठे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना युतीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाच्या शुभेच्छा देवून आशीर्वाद घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!