Type to search

Breaking News मुख्य बातम्या सेल्फी

Fathers day : फादर्स डे निमित्ताने गुगलचे खास ऍनिमेटेड डुडल

Share

नाशिक : आज जगभरात जूनचा तिसरा रविवार फादर्स डे म्हणून साजरा करण्यात येत आहे. सोशलमिडीयावर अनेक फोटोस, विचार व्हायरल होत आहेत. दरम्यान गुगलही याबाबतीत मागे नसून फादर्स डेच्या निमित्ताने विशेष डुडल बनवले आहे.

जगभरातील ‘बाप’ माणसांना गुगलने खास ऍनिमेटेड डुडल बनवलं आहे. गोंडस बदक आणि त्याच्या अवती भवती त्याची लहान पिल्ले अशा स्वरूपात हे डुडल साकारण्यात आलं आहे. यामध्ये तीन वेगवेगळ्या अ‍ॅनिमेशनचा वापर करून कुटुंबसंस्थेतील वडीलांच्या स्थानाला अधोरेखित करण्यात आलं आहे.

दरम्यान सोशलमिडीयावर या गुगल डुडलचे कौतुक होत आहे. यंदाचे ‘फादर्स डे’ चं औचित्य साधत जगभरात गुगलचे हे हटके डुडल होमपेज वर झळकत आहे.

वडील हे कळत नकळत घरातल्या प्रत्येकाच्या सुखासाठी झटत असतात. आपली संस्कृती पुरुषप्रधान असूनही त्याला मोकळेपणाने ‘थँक्स’ बोलून फादर्स डे साजरा करा.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!