Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

श्रीरामपुरात ‘गुगल पे’ च्या नावाखाली फसवणूक ; 96 हजार लंपास

Share

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – प्लायवूड खरेदी करण्याचे आमिष दाखवून मोबाईलवर ‘गुगल पे’ अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगून रिक्वेस्ट स्वीकारायला लावली. त्यानंतर खात्यातून 96 हजार 500 रुपये काढून घेण्याचा प्रकार घडला आहे.

याबाबत येथील विपुल ट्रेडर्सचे प्रेमचंद कन्हैयालाल नारा (रा. दशमेशनगर, श्रीरामपूर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे, आपणाला 8923558394 या मोबाईल नंबरवरून फोन आला. त्याने त्याचे नाव राहुल शर्मा असे सांगितले. आपल्याला प्लायवूड घ्यायचे आहे असे गोड गोड बोलून विश्वास संपादन केला. पैसे अदा करण्यासाठी ‘गुगल पे’ अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले.

त्यावर रिक्वेस्ट पाठवून तिचा नारा यांना स्वीकार करायला लावला. नारा यांनी ही रिक्वेस्ट स्वीकारताच आरोपीने त्यांच्या खात्यातून 96 हजार 500 रुपये काढून घेतले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सायबर ब्रँचकडून होणार आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!