Type to search

ब्लॉग सार्वमत

मिडरेंज पिक्सल?…बात हजम ना हुई!

Share
गुगलने pixel 3a, pixel 3a xl हे दोन नवे स्मार्टफोन फोन भारतात लाँच केले आहेत. आतापर्यंतचे सर्वात स्वस्त पिक्सल फोन असल्याचा दावा गुगलेने केला आहे. भारतात pixel 3a ची किंमत 39,999 रुपये तर pixel 3a xl किंमत 44,999 रुपये आहे. यापूर्वी लाँच झालेल्या pixel 3a  ची किंमत 71,000 रुपये होती तर pixel 3a xl ची किंमत 92,000 रुपये इतकी होती. आता आधी बाजारात आलेल्या पिक्सल फोनच्या तुलनेत हे फोन स्वस्त आहेत, यात वाद नाही. पण गुगलेने या नव्या सिरीजची ब्रॅण्डींग मिडरेंज अशी केली आहे.

भारतात 40 हजारांचा स्मार्टफोन मिडरेंज असतो, असा शोध गुगलने लावला याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे. गुगलच्या या मिडरेंजने भारतीय स्मार्टफोन चाहत्यांना तसा धक्काच दिला. या किंमतीत स्टर्डी बिल्ड क्वालिटीपासून भन्नाट मल्टीटास्कींगची सोय असलेले अन्य ब्रॅण्डचे प्रिमीयम स्मार्टफोन बाजारात असताना भारतीयांनी गुगलवर उड्या माराव्यात असे त्यांना का वाटते, हेच कळेना. गंमत म्हणजे अमेरिकन बाजार आणि भारतीय बाजारात पिक्सलच्या किंमतीत मोठी तफावत आहे. पिक्सल 3र तेथे 399 डॉलरला मिळतो. भारतीय रूपयांत त्याचे 24 ते 25 हजार होतात. तरिही भारतीयांना मिडरेंज पिक्सल 40 हजारांत घ्यावा? आयात शुल्क लागते, हे मान्य.

म्हणून भारतीय स्मार्टफोन चाहत्यांनी खिसा रिकामा करावा? यह बात कुछ हजम नही हुई! मुळातच भारतात पिक्सल फोनला डिमांड नाही. वनप्लस, सॅमसंग, हुवई आधीपासूनच या सेगमेंटमध्ये स्थान पटकावून आहेत. आगामी काळात एक्स सिरीजसह रिअलमी आणि रेडमी या सेगमेंटमध्ये आव्हान देणार आहे. तेव्हा पिक्सलचे हे चाळीस हजारी मिडरेंज स्मार्टफोन फक्त फोटोग्राफीसाठी भारतीयांना भुरळ घालू शकतील का, हे पहायचे.

काय आहे मिडरेंज पिक्सलमध्ये…
गुगल पिक्सलमध्ये फुल एचडी ओलेड डिस्प्ले देण्यात आली आहे. चांगल्या कस्टमायझेशनमुळे बॅटरी लाइफ चांगली मिळेल. पॉलिकॉब्रीनेट बॉडी देण्यात आहे. स्पर्धेतील बहुतांश स्मार्टफोन सध्या ग्लास किंवा मेटल बिल्डचे असतात.

डिस्प्ले – pixel 3a ची स्क्रीन 5.6 इंचाची आहे, ज्याचे रिझोल्युशन 2220×1080 पिक्सल आहे. तर pixel 3a xl मध्ये 6 इंचाची एचडी ओलेड स्क्रीन देण्यात आली असून याचे रिझोल्युशन 2160×1080 पिक्सल आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी ड्रॅगनट्रेल ग्लास देण्यात आला आहे.

हार्डवेअर- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 670 हा ऑक्टॉकोर प्रोसेसर वापरण्यात आला असून 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. या दोनही फोनला लवकरच गुगलची लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉईड क्यू अपडेट मिळणार आहे. बाजारात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 ते प्रिमीयम सेगमेंटमधील क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर असलेले स्मार्टफोन 14 हजार ते 35 हजारांत उपलब्ध आहेत.

बॅटरी- या फोनमध्ये 3 हजार मिलिअ‍ॅम्पायर क्षमतेची बॅटरी आहे. बॅटरी पूर्ण चार्ज केल्यास 30 तासांपर्यंत बॅकअप देणार, असा गुगलचा दावा आहे. तसेच 15 मिनिटे चार्ज केल्यास हा फोन 7 तास चालेल, असेही कंपनीने म्हटले आहे.

कॅमेरा- या दोनही फोनच्या कॅमेर्‍याबाबत अनेकांना उत्सूकता आहे. दोन्ही फोनमध्ये 12.2 मेगापिक्सलचा ड्युअल पिक्सल सोनी imx363 सेंसर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच नाइट साइट, पोर्ट्रेट मोड सारखे फिचर्सही देण्यात आले आहेत. सध्यातरी कॅमेरा हाच या फोनचा युएसपी ठरला आहे.

15 मेपासून हा फोन ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. सध्या फोनची प्री-बुकिंग सुरु आहे.

– संतोष तांबे,

9511516363

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!