Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशगुगलच्या अनेक सेवा अर्धा तास खंडीत : जीमेल, युट्यूब झाले बंद

गुगलच्या अनेक सेवा अर्धा तास खंडीत : जीमेल, युट्यूब झाले बंद

गुगलच्या अनेक सेवा आज संध्याकाळी खंडीत झाल्या. यामुळे तमाम नेटिजन्समध्ये यासंदर्भात चर्चा रंगू लागली.

आज संध्याकाळी ५.२० मिनिटांनी गुगलची जीमेल सेवा, युट्यूब व हैंगआउटसह अनेक सेवा ठप्प झाली. परंतु गुगल सर्च इंजन सुरु आहे. कंपनीकडून या सेवा खंडीत झाल्याबद्दल काहीच स्पष्टीकरण दिले गेले नाही. गुगलच्या सेवा खंडीत झाल्याचा फटका लाखो लोकांना बसला.

- Advertisement -

दरम्यान सांयकाळी सहा वाजेनंतर या सर्व सेवा पुन्हा सुरु झाल्यात.

३८० कोटी युजर

जीमेल व युट्यूबचे मिळून जगभरात ३८० कोटी युजर आहेत. जगभरात जीमेलचे जवळपास १८० कोटीपेक्षा जास्त युजर आहेत. जीमेलकडे ४३ टक्के मार्केट शेअर आहे. युट्यूबचे २०० कोटीपेक्षा जास्त युजर आहेत.

या सेवा ठप्प

जीमेल, यूट्यूब, कैलेंडर, ड्राइव, डॉक्स, शीट्स, स्लाइड्स, साइट्स, ग्रुप्स, हैंगआउट्स, चैट, मीट, वॉल्ट, करन्ट्स, फॉर्म्स, क्लाउड सर्च, कीप, टास्क, वॉइस

या सेवा सुरु

गूगल सर्च इंजन,मैप

- Advertisment -

ताज्या बातम्या